पोटफुगी टाळण्यासाठी तुम्ही अनेक आहारात्मक व जीवनशैली परिवर्तन अवलंब करू शकता आणि एक निरोगी पुष्ट उदर कमावू शकता. ढेरी विकसित होणें टाळण्यास तुम्हाला मदत करणार्र्या काही बाबींची सूची इथे दिलेली आहे.
धूम्रपान थांबवा
धूम्रपान आणि गॅस्ट्रोइंटेस्टिइनल विकारांवर त्याच्या प्रभावांबद्दल झालेले एक हल्लीचे अभ्यास सुचवते की धूम्रपान पोटफुगी आणि इतर संबंधित समस्या उदा. पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेशी संबंधित आहे. म्हणून, तुम्ही सिगारेट सोडले पाहिजे आणि निरोगी जीवन व सुरेख पोट कमवले पाहिजे.
मद्यपानाला मर्यादा करा
"राष्ट्रीय मद्यपान आणि अल्कोहल दुर्व्यसन संस्थान" याचे एक लेख म्हणते की अल्कोहल शरिराच्या पचनात्मक व इतर चयापचय कार्यांमध्ये हस्तक्षेप करतो ज्यामध्ये स्वादुपिंड आणि यकृताचे कार्य सामील आहेत. परिणामी, अन्न योग्यरित्या पचत नाही आणि यकृताच्या आत व बाहेर वसा साचण्याचा धोका असतो, ज्याने पोटफुगी आणि इतर गंभीर वैद्यकीय गुंतागुंती उद्भवू शकतात. म्हणून, दुख करत बसण्यापेक्षा सुरक्षित राहिलेले आणि माफक मात्रेत मद्यपान केलेले बरे, ज्याने कोणत्याही शारीरिक विकारापासून तुमचे संरक्षण होईल.
जंक फूड आणि वसायुक्त आहाराला मर्यादा करा
जंक फूडमध्ये अनेक रोगपूर्ण घटक उदा. ट्रांस-फॅट, प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रिम एडिटिव्ह, साखर इ. असतात ज्यामध्ये प्रचुर मात्रेत कॅलॉरी असतात. त्यांना पूर्णपणें पचण्यास खूप वेळ लागू शकतो आणि प्रणालीतून बाहेर निघण्यासाठी अजून जास्त वेळ लागू शकतो. म्हणून, शक्य तेवढे बाहेरील जंक फूडपासून लांब राहून पोटफुगी टाळलेले बरे.
प्रचुर मात्रेत वसा असलेल्या खाद्यपदार्थांमुळे पोटात वसा विशेष करून ट्रांस फॅट जमा होण्यास कारण होतात, जे वनस्पती खाद्य तेलामध्ये असतातच. म्हणून, शक्य तेवढे वसायुक्त आहारापासून लांब राहून पोटफुगी टाळलेले बरे
जेवणाबरोबर पाणी पिणें टाळा
जेवणाबरोबर घोटभर पाणी एक ते दोन वेळा पिणें काही मोठी समस्या नाही, पण एक किंवा दोन पेले पाणी पिल्याने वास्तविक पचन प्रक्रियेस अडथळा निर्माण होऊन पोटफुगी होऊ शकते. म्हणून, तुमच्या पोटातील पचनात्मक रस विरळ होणें टाळण्यासाठी पाणी पिणें टाळलेले बरे.
दुग्ध उत्पादने टाळा
काही लोकांना माहीत नसूनही ते लॅक्टोझला संवेदनशील असतात म्हणजेच दूध आणि दुधाची उत्पादने पचवण्यास त्यांना कठिन जाऊ शकते, जे पोटफुगीचे कारण असू शकते. म्हणून, दुधाची उत्पादने घेतल्यानंतर पोटात कसे वाटते याकडे लक्ष द्या. तुम्ही काही आठवड्यांनंतर त्यांना आहारातून कमी करू शकता आणि तुम्हाला त्यातील अंतर स्वतः कळेल.
तणाव टाळा
जसे की आम्ही आधीच नमूद केलेले आहे, तणाव अमाशयाच्या अनेक समस्यांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे, ज्यामध्ये पोटफुगी सामील आहे. म्हणून, तुमच्यासाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्या मनाला विश्रांती द्या. एक निरोगी मन निरोगी शरीर आणि एक शक्तिशाली प्रतिकार प्रणाली असण्यात खूप मोठी भूमिका बजावते. खूष रहा आणि पोटफुगीला सामोरे जा.
नियमित व्यायाम करा
हे सांगण्यची गरज नाही की नियमित व्यायाम केल्याने तुम्ही वजन निरोगी राखून ठेवू शकता आणि तुमच्या रक्ताभिसरणातही सुधारणा करू शकता. म्हणून, पोटफुगीपासून लांब राहण्यासाठी, तुम्ही शारीरिकरीत्या सक्रिय राहावे आणि त्या स्नायूंना नियमितपणें ताण द्यावा व एब्स करावेत.
भरपूर पाणी प्या
आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणें, पाणी विषारी पदार्थ, अतिरिक्त साखर, अतिरिक्त मीठ आपल्या शरिरातून बाहेर काढतो आणि पोटात वसा संचय होणेंही टाळतो. म्हणून, पाण्याबरोबर मित्रता करावी आणि निरोगी पोट व चकाकदार त्वचा असण्यासाठी न चुकता प्रचुर मात्रेत पाणी प्यावे.
साखर व मीठ वापरण्यावर मर्यादा आणा
साखर व मीठ वापरण्यावर मर्यादा आणल्यास न केवळ जलसंचय टाळले जाऊन पोटफुगीच्या निवारणास मदत होईल, तर दीर्घकाळाच्या दृष्टीने, तुमच्या शरिराच्या एकूण आरोग्यासाठी ते एक चांगले निर्णय असेल.
कार्बोनेटेड पेय टाळा
फ्लेवर सोडा आणि बिअरसारख्या कार्बोनेटेड पेय यांमध्ये कार्बन डाइऑक्साइड असतो, जे तुमच्या आतड्यांमध्ये व कॉलॉनमध्ये जमा होतो आणि तुमच्या पोटातील ताणास कारण होतो. त्यामध्ये साखर व अल्कोहलही असते (बिअरमध्ये) , जे पोटफुगी टाळण्यासाठी माफक मात्रेत घेतले पाहिजे.
निरोगी जेवण घ्या
निरोगी जेवणामुळे निरोगी व प्रफुल्लित अमाशय राखला जातो. प्रचुर तंतू असलेल्या भाज्या आणि फळे खा, जंक फूड टाळा, फळ आणि भाज्यांचे रस प्या, हिरव्या पालेदार भाज्या खा, दुधापेक्षा अधिक दुधाची उत्पादने विशेषकरून ताक घ्या, कारण त्यामध्ये निरोगी जिवाणू असतात. याने तुमचे सर्वांगीण आरोग्य राखले जाईल.
अधिक जेवणें टाळा
कधी कधी आपण मन भरून जेवतो, जे आपल्या पोटाच्या क्षमतेच्या पलीकडे जाते. यालाच आपण अधिक जेवणें म्हणतो. अधिक जेवल्याने तुम्हाला आरामशीर वाटणार नाही, आणि थोडा वेळ असेच चालू राहिल्यास, त्याच्या परिणामी पोटावर ताण पडेल. म्हणून, तुम्ही थोडे आणि वारंवार जेवले पाहिजे.