आवळा एक सुप्रसिद्ध घरगुती नाव आणि भारतातील सर्वांत जुन्या आयुर्वेदिक औषधांपैकी एक आहे. भारतात या लहानशा हिरव्या फळाची माहिती असलेली व्यक्ती मिळणें कठीण आहे आणि जगभर त्याला इंडिअन गूझबॅरी म्हणून ओळखले जाते.
तुम्ही वनस्पतीप्रेमी असल्यास किंवा तुम्हाला घरगुती उपायांची आवड असल्यास, तुम्ही कधीतरी त्याच्या उपचारात्मक लाभकारी गुणाचा फायदा तुम्हाला झाला असेलच. अशा प्रतिजैविक आणि पोषक चांगुलपणापासून लांब राहणें अवघड आहे, जेव्हा ते एवढे सहज उपलब्ध आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे की ते एंटीऑक्सिडेंट आणि पोषणाचे सर्वांत प्रचुर स्त्रोत आहे. वास्तविक, आमलकीचे अर्थ “आई” आणि “सांभाळणें” आहे, जे त्याच्या उपचारात्मक आणि संगोपनात्मक गुणधर्मांकडे इंगित करते.
अधिकतम महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुज्जीवक वनस्पती हे नाव दिले होते. हेच नसून, या फळाचे भारतीय धर्मशास्त्रांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, जिथे त्याला भगवान विष्णूंचे अश्रू म्हटले गेले आहे आणि वैष्णव तसेच शैव परंपरांमध्ये त्याच तोलाचे महत्त्व आहे. आवळ्याचे झाड आणि फळाची भारतात पूजा केली जाते. यामागील खूप जुन्या परंपरा आणि कारणे आहेत, पण आवळ्याचे लाभ आणि चांगले गुण बघितल्यास मला परत विचार करावेसा वाटतो.
आवळ्याचे काही मूळभूत गुणधर्म:
- जीवशास्त्रीय नांव: फिलॅंथस एंब्लिका किंवा एंब्लिका ऑफिसिनॅलिस
- कुटुंब: फाइलॅंथेस; यूफॉर्बियासेस
- सामान्य नांव: भारतीय गूझबॅरी, आवळा
- संस्कृत नांव: धात्री, आमलक, आमलकी
- वापरले जाणारे भाग: फळ (दोन्ही ताजे आणि सुकवलेले), बिया, देठ, पाने, फुले.
- स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: आवळा भारताचे स्थानिक फळ आहे, पण ते चीन आणि मलेशियामध्येही वाढवले जाते.
- तासीर: आवळ्यामुळे शरिरातील सगळे तीन दोष कफ, पित्त आणि वात शमतात, असे मानले जाते. पण, आयुर्वेदिक वैद्यांचा दावा आहे की त्याचे एक निश्चित थंड करणारे कार्य आहे आणि घेतल्यास पोटात हलकेपणाच्या संवेदना जाणवतात आणि कोरडा प्रभाव पडतो.