शिलाजित काय आहे?
शिलाजित भारतीय उपमहाद्वीपाच्या हिमालय व हिंदुकुश घाटींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज पदार्थ आहे. रोप आणि रोप पदार्थांच्या हजारो वर्ष विघटन झाल्याने बनलेले एक दुर्लभ रेसिन आहे. हे अडकलेले रोप पदार्थ खडकांच्या बाहेर येऊन तपकिरीसदृश ते काळे चिकट डिंकासारखे पदार्थ बनवते. भारतीय पारंपरिक औषध प्रणाली म्हणजेच आयुर्वेदात हजारो वर्ष त्याच्या आरोग्य निर्माण गुणधर्मांसाठी शिलाजितचे वापर होत आले आहे. आयुर्वेदाचे उल्लेख चरकसंहिता आणि सुश्रुतसंहितेत आढळते, जिथे त्याला “सोन्यासारखे धातूचे खडे” आणि जिलेटेन पदार्थ म्हटले गेले आहे. आयुर्वेदामध्ये, शिलाजितला रसायन म्हटले गेले आहे, ज्याचे अर्थ सर्वांगीण आरोग्यास वाव देण्यात शिलाजितच्या फायद्यांशी आहे. वास्तविक पाहता, शिलाजित या नावाचे अर्थ “डोंगराचे विजेते आणि अशक्ततेचे उन्मूलक” असे आहे. दुर्दैवाने, आधुनिक विज्ञान या नैसर्गिक आश्चर्याचे अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे.
तुम्हाला माहीत होते का?
आयुर्वेदिक डॉक्टरांप्रमाणें, शिलाजितचे गंध गोमूत्रासारखे असते. लोककथांमध्ये दावा केला गेला आहे की अशुद्ध स्वरूपात घेतल्यास ते स्त्री आणि पुरुष दोघांना खूप लाभकारी आहे.
शिलाजितबद्धल काही मूळभूत तथ्य:
- लॅटिन नांव: आस्फाल्टम पंजाबिएनम
- सामान्य नांव: आस्फाल्ट, मिनरल पिच, मिनरल वॅक्स, शिलाजित
- संस्कृत नांव: शिलाजित, शिलाजिता
- भौगोलिक वितरण: शिलाजित हिमालयात सामान्यपणें आढळते आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये सर्वात प्रचुर साठा भरलेला आहे. ते चीन, नेपाळ, पाकिस्तान, तिबेट आणि अफगाणिस्तान येथे आढळते.