अंजीर सर्वात प्रसिद्ध “वन्य” फळांपैकी आहे, ज्याला जगभर त्याच्या पाककृतीतील आणि रोगनाशक गुणांसाठी मानले जाते. हे मधुर आणि कुरकुरीत फळ केवळ त्याच्या चवीसाठीच प्रसिद्ध नसून, हजारो वर्ष त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी पिकवले आणि वापरले जात आहे. वास्तविक पाहता, अंजीर मानवाद्वारे पिकवलेल्या सर्वांत प्राचीन फळांपैकी असून, या फळाचे उल्लेख बायबलमध्येही मिळते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की या फळाचे सर्वांत जुने नमुने निओलिथिक युगामधील आहेत.

ग्रीकांनी याला एवढे मौल्यवान मानले की ते त्यांना निर्यात होऊ देत नसत आणि अंजिराच्या फळाला कोणत्याही स्पर्धेतील विजेत्याला मान म्हणून दिले जात असत. हेच नाही, तर रोमन शास्त्रांनुसार रोमचे संस्थापक रेमस आणि रोम्युलस यांचा चावा अंजिराच्या झाडाखालीच मादा लांडग्याने घेतला होता. रोमन शास्त्रांमध्ये या फळाच्या प्रजननोद्दीपक गुणधर्मांबद्दलही सांगितले आहे. या चमत्कारिक फळाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

अंजिराबद्दल काही मूळभूत तथ्य:

  • जीवशास्त्रीय नावफिकसकॅरिका
  • कुटुंब: मोरॅसिआ/मलबरी कुटुंब
  • सामान्य नांव: फिग, कॉमन फिग, अंजीर/अंजिर
  • संस्कॄत नांवअंजिर, अंजीरा
  • वापरले जाणारे भाग: फळ, पाने, तणा, आणि मुळे
  • स्थानीय क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: अंजिराचे झाड भूमध्य क्षेत्र आणि आशियाचे पश्चिमी भाग समजले जाते, तरी त्यांना जगाचे सर्वांत उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये पिकवले जाते जसे की भारत, चीन आणि आफ्रिका. अंजिराला अमेरिका आणि युरोपच्या भागांमध्येही पिकवले जाते. टर्की जगात अंजिराचा सर्वांत मोठा उत्पादक आहे.
  • तासीर: थंड

अंजिराचे झाड:

अंजीर एक पर्णपाती झाड आहे (वर्षातून एकदा पाने झडतात)   आणि विशाल जेनस फिकसचे सदस्य आहे, ज्यामध्ये मलबरी, वटवृक्ष आणि “पिंपळा”सारख्या झाडांचा समावेश आहे.

तुम्हाला माहीत होते का?

अंजीर वास्तविक फळाच्या ऐवजी उलटलेली फुले असतात, जी कुणी ही अंजिराच्या झाडामध्ये फुले पाहू शकतो. अंजिराचे झाड वाढवण्यास खूप सुंदर असतात आणि एकदा लावल्यास ते आजूबाजूच्या झाडांमध्ये खूप पटकन निरखून दिसून येतात. वास्तविक पाहता, त्याला “ग्लोबल कंपेडिअम ऑफ वीड्स”मध्ये अपायकारक तण म्हणून स्थान दिले गेले आहे. सामान्यपणें, एक फिकस झाड  20-30 फीटच्या उंचीपर्यंत आणि तेवढेच रुंद वाढू शकते. पानांना पाळ आलेली असते आणि फिकस ( एका झाडाचे समूह ज्यामध्ये अंजीर आणि मलबरी सोडून इतर झाडेही सामील आहेत)   च्या विविध प्रजातींमध्ये फरक करत असतांना ते एक निकष ठरू शकते.

  1. अंजिराचे आरोग्य फायदे - Health benefits of Anjeer in Marathi
  2. अंजीर कसे खावे - How to eat Anjeer in Marathi
  3. एका दिवसात किती अंजीर घ्यावेत - How many figs (Anjeer) to take per day in Marathi
  4. अंजिरांचे सहप्रभाव - Side effects of Anjeer (Figs) in Marathi

अंजिरांना स्वयंपाकघर आणि शीतपेट्यांमध्ये स्थान मिळालेलेच आहे. तरी कोणत्याही गोड पदार्थामध्ये या फळाचा गोड कुरकुरीतपणा आणल्यास, ते आरोग्यकारक असते आणि त्याचे फायदे या फळामध्ये जुडतात. या लेखामध्ये, आम्ही सांगू की अंजीर तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक का आहे.

  • बद्धकोष्ठतेतून आराम: अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणात आहारजन्य तंतू असतात. हे तंतू तुमच्या आतड्यांतील अन्नामध्ये समाविष्ट होतात आणि मळाला मऊ करतात, ज्यामुळे शरिरातून त्यांचे सहजरीत्या निःसारण होते. ते शौचाच्या विधा नियमित ही करतात, जे बद्धकोष्ठतेच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
  • वजन कमी करणेंअंजीर प्रचुर तंतू आणि कमी कॅलॉरी असलेली फळे आहेत, ज्यामुळे तुमचे एकूण कॅलॉरी काउंट वाढू न देता तुम्हाला अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते. चांगल्या वजन कमी करण्याच्या खाद्यपदार्थासाठी तुम्हाला अजून काय हवे आहे? तथापी, दुधाबरोबर घेतल्याने, त्याने त्या ऐवजी वजन वाढू शकते.
  • डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणे: अंजिरामध्ये प्रचुर मात्रेमध्ये विटामिन ए असतो, जो दृष्टी राखून ठेवणें आणि डोळ्यांच्या शक्तीची हानी टाळण्यासाठी जवाबदार आहे. हेच नाही, तर यामुळे ह्रासात्मक नेत्रविकारांचा धोका कमी होतो असा समज आहे, ज्यांवर सांप्रत कोणतेही उपचार उपलब्ध नाही. अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेंच सर्वोत्तम आहे.
  • यामुळे रात्री चांगली झोप लागते: संशोधनाच्या प्रमाणांचा समज आहे की अंजिरांमुळे शरिरातील मेलॅटॉनिनच्या उत्सर्गास वाव मिळतो, ज्यामुळे तुमच्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या चक्राचे नियामन होते आणि निद्रानाश व्यवस्थापनामध्येही मदत मिळते. ते तुमच्या मेंदूमधेल सेरॅटॉनिन स्तराला ही वाढवते. ते प्लेझर हार्मोन आहे, जे तणाव व चिंता यांना कमी करते, ज्यामुळे तुम्ही शांतपणें झोपू शकता.
  • मूळव्याधामधून तुम्हाला आराम मिळते: शौचाची प्रणाली नियमित करून आणि बद्धकोष्ठतेमधून आराम मिळून, अंजिरांमुळे तुमच्या हॅमॅरॉयड तंतूंवर आलेले अतिरिक्त दाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे मळ मऊ पडते आणि त्यांचे निःसारण सुकर होते. त्यामुळे तुमचे रेक्टम आणि एनस यांना ही त्रास होत नसल्यामुळे, मूळव्याधामधून आराम मिळते.
  • यकृताचे कार्य सुधारते: अंजिरांमध्ये एंटीऑक्सिडॅंट आणि पोषक यौगिकांच्या रिपॉझिटरीचे समावेश असते. पूर्ववैद्यकीय अभ्यास सुचवतात की या यौगिकांमुळे, यकृताची क्षती टळते आणि यकृताची विषहारक योग्यता वाढते. तरी मात्रा आणि माणसांवरील प्रभावाची पुष्टी करण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.
  • उत्कृष्ट एंटीऑक्सिडॅंट: एंटिऑक्सिडॅंट असे यौगिक असतात, जे फ्री रॅडिकलची हानी टाळतात आणि वय वाढ कमी करतात. प्राकृतिक एंटीऑक्सिडॅंट म्हणून, अंजीर अवयवाच्या कार्याची संबंधित आयुसंबंधी हानी टाळतात, आणि त्याच वेळी बारीक रेषा आणि डार्क स्पॉट्ससारखे वयवाढीची चिन्हे कमी करतात.
  • रक्तक्षय झालेल्यांसाठी लाभकारक: अंजीर लौहाचे चांगले स्त्रोत आहेत. नियमित अंजीर वापरणें लौहाच्या कमतरतेमुळे झालेले रक्तक्षय टाळतात आणि तुमच्या शरिरातील हॅमोग्लोबिन आणि लाल रक्तकोशिकांचे प्रमाण कमी करतात.
  • रक्तशर्करा स्तरांना नियंत्रित करते: संशोधन अभ्यासांमध्ये अंजीराच्या हायपोग्लीसिमिक ( रक्तशर्करा कमी करणारे)   कार्य दिसून आले आहे. ते इंसुलिन संवेदनशीलता वाढवते आणि तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर ग्रहण कमी करते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन होते.
  • त्वचेसाठी लाभकारक: अंजीर तुमच्या त्वचेसाठी पोषण आणि प्राकृतिक एंटीऑक्सिडॅंटचे चांगले स्त्रोत असतात. त्याने फ्री रॅडिकलची हानी कमी होते आणि तुमची त्वचा अधिक लवचिक व तारुण्यपूर्ण बनते. हे सुचवले गेले आहे की अंजिराचे लॅटॅक्स वापरणें चामखीळ काढण्यात क्रायोजेनिक उपचाराएवढेच चांगले असते.
  • केसांची हानी टळते: तुमच्या त्वचेसारखेच, अंजीर तुमच्या डोक्याच्या कातडीलाही पोषण देते. व्हिटामिन ई आणि के यांचे चांगले स्त्रोत असल्याखेरीज, ते तुमच्या केसांची नैसर्गिक चकाकी राखून ठेवते, केसांना पांढरे होण्यापासून वाचवते आणि अतिरिक्त केसांची गळती कमी करते.
  • खोकला आणि पडसेवरील उपाय: पारंपरिकरीत्या, अंजीर खोकला आणि पडसे यांसाठी उत्कृष्ट उपाय समजले जाते. ते न केवळ तुमच्या फुफ्फुसे आणि हवेच्या वाटांमधील म्युकस बाहेर काढण्यास मदत करते, तर घशाच्या स्नायूंना ही बळकट करते, ज्याने समस्येची पुनरावृत्ती टाळली जाते.
  • रक्तदाबाला नियामित करते: अभ्यासांमधून दिसून आले आहे की अंजिराच्या वापराचे रक्तदाबावर सकारात्मक प्रभाव होतात. अंजिरामध्ये पोटॅशिअमचे भरपूर प्रमाण असते, जो तुमच्या हॄदयावरील सोडिअमचे नकारात्मक प्रभाव संतुलन करण्यास मदत करते आणि हृदयाचे कार्य योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • मूत्रपिंडांचे कार्य सुधारते: अंजिरामध्ये डाययुरेटिक गुणधर्म असतात. मूत्रनिःसारण अजून होऊन, ते तुमच्या शरिरातील अतिरिक्त विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, जे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी लाभकारक आहे.
  • ताप कमी करते: वैद्यकीय अभ्यासाद्वारे सुचवण्यात आलेले आहे  की, अंजिराच्या पानांचे एथनॉलिक साराचे शक्तिशाली एंटिपायरेटिक कार्य असतात. ५ तासांपेक्षा अधिक वेळ सक्रिय राहिल्याने, त्याचे कार्य अधिकतम व्यावसायिक एंटीपायरेटिक्सपेक्षा अधिक प्रभावी समजले जाते.
  • चांगल्या हाडांसाठी अंजीर: अंजिरामध्ये हाडांचा ढाचा सांभाळून ठेवण्यासाठी जवाबदार 3 सर्वाधिक महत्वपूर्ण खनिज  आहेत कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि मॅग्नीशिअम. अंजिर नियमित वापरल्याने तुमची हाडे मजबूत होतात आणि अस्थिभंगाचा धोका कमी होतो.
  • गरोदर महिलांसाठी लाभदायक: अंजिराचे पोषक गुणधर्म गरोदर महिलांसाठी एक अचूक आहारात्मक पूरक पदार्थ बनवतात. या फळामध्ये उपस्थित विटामिन बीचे गरोदरपणाच्या पूर्वकाळात मॉर्निंग सिकनेसमधून आराम मिळते आणि त्याचे कॅल्शिअम आईच्या हाडांना अशक्त होण्यापासून वाचवते, आणि भ्रूणाच्या विकासामध्येही साहाय्य करते.

एंटीऑक्सिडेंट म्हणून अंजीर - Figs (Anjeer) as antioxidant in Marathi

तुम्ही अशा लोकांपैकी असल्यास, ज्यांना तरुण आणि तेजस्वी दिसायचे आहे, तर तुम्हाला एंटीऑक्सिडेंट्सबद्दल माहिती असावी. ते न केवळ तुमच्या शरिरातील सर्व मुक्त रेडिकल ( शरिरासाठी विषारी असलेला प्राणवायू)   काढण्यास मदत करतात, तर ते हृदय आणि यकृतासारख्या विविध अंगांचे आरोग्य राखून ठेवण्यातही लाभकारी असतात. शास्त्रज्ञ सुचवतात की अंजिरांमधील फेनॉल आणि फ्लॅव्हॅनॉयड ( नैसर्गिकरीत्या संभवणारे रासायनिक यौगिक) त्याला एक दिमाखदार एंटीऑक्सिडेंट बनवतात. तसेच, शरिरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि वेळेपूर्वी वयवाढीसारख्या वयाशी संबंधित समस्याही कमी करतात.

 (अजून वाचा: एंटीऑक्सिडेंट प्रचुर खाद्यपदार्थ

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

गरोदरपणासाठी अंजीर - Anjeer for pregnancy in Marathi

अंजीरांचे अत्यधिक पोषक गुण त्याला गरोदर महिलांसाठी सल्ला देण्याजोगे पदार्थ बनवतात. त्यांमुळे यावेळी अनेक महिला आपल्या विटामिन आणि मिनरल गरजा पूर्ण करू शकतात. प्रथम, अंजीर कॅल्शिअमचे एक चांगले स्त्रोत आहे, जे भ्रूण विकासात अत्यधिक गरज असलेले खनिज आहे आणि मातेचे हाड निरोगी ठेवते. मग, फळामधील विटामिन बी त्यांना गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये मॉर्निंग सिकनेसला सामोरे जाण्यास साहाय्य करते. तथापी, अधिक खाणें टाळले पाहिजे आणि अंजीर एक औषध आणि टॉनिक म्हणून घेत असल्यास योग्य मात्रेसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणें नेहमीच चांगले असते.

हाडांसाठी अंजीर - Anjeer for bones in Marathi

हाडे शरिराचे आधारभूत समर्थन ढाचा बनवतात आणि तुम्ही मान्य कराल की चांगल्या हाडाचे आरोग्य राखून ठेवणें जीवनातील सर्वांत मूलभूत आवश्यकतांपैकी एक आहे. दुर्दैवाने, आपले वय वाढण्यासोबतच, हाडांमधील कॅल्शिअमचे नैसर्गिक क्षरण होते. अशा प्रकारे, शरिराच्या नैसर्गिक चक्रांमुळे हाडे अजून अशकत होतात आणि त्यांची अजून झीज होते. परिणामी, आपल्याला अधिक वयात सहजच हाडांच्या अस्थिभंग होते आणि ऑस्टिओपोरोसिससारखे रोग होतात. सुदैवाने, आपण आपल्या शरिरातील कॅल्शिअम पूरक तत्त्व घेऊन वयवाढीपासून आपल्या हाडांना वाचवू शकतो. बाजारात सगळीकडे व्यावसायिक कॅल्शिअम पूरक तत्त्व उपलब्ध असले, तरी शरिरातील अधिक कॅल्शिअम जमा झाल्याने आणि खडे बनण्याच्या शक्यतेमध्ये काही लहान सहप्रभाव आहेत. अंजीर कॅल्शिअमचे एक नैसर्गिक स्त्रोत असल्याने तुमची हाडे आणि दात अधिक वेळ निरोगी ठेवण्यासाठी आहारात घेणें लाभकारक असेल. अंजिरामधील कॅल्शिअम स्किम्ड दुधाएवढी मानली जाते (अंदाजे  28 ग्रॅम अंजिरांमुळे तुमच्या दैनंदिन कॅल्शिअम गरजेची जवळपास 5% पूर्तता होते)  . कॅल्शिअमसोबत, अंजीरमध्ये मॅग्नीशिअम आणि फॉस्फोरस ही प्रचुर प्रमाणात असतात आणि हे दोघे हाडांना सघन करणारी खनिजे आहेत.

अंजीर ताप कमी करतो - Anjeer reduces fever in Marathi

अंजिराची पाने आयुर्वेदामध्ये तापशामक (शरिराचे तापमान आणि ताप कमी करणारे)   मानले गेले आहे। हल्लीचे वैद्यकीय अभ्यास सुचवतात की अंजिराच्या पानांचे एथनॉल सारामध्ये शक्तिशाली तापशामक गुणधर्म असतात, जे साराच्या मात्रेवर अवलंबून असतात. हे प्रभाव जवळपास पाच तास टिकल्याचे दिसून आले आहे, जे सर्वांत सामान्य व्यावसायिक तापशामकापेक्षाही अधिक कार्यक्षम आहे.

 (अजून वाचा: तापाची कारणे आणि उपचार

मूत्रपिंडांसाठी अंजीरचे फायदे - Anjeer benefits for kidneys in Marathi

अंजिरांना नैसर्गिक डाययुरेटिक म्हटले जाते, ज्याच्या अर्थ आहे की ते शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि मूत्रपिंडांतील  अतिरिक्त लवण आणि पाणी बाहेर काढून मूत्रपिंड निरोगी आणि शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त ठेवतात. विषारी पदार्थमुक्त शरीर न केवळ चांगले कार्य करते, तर सौम्यपणें त्याची वयवाढ होते.

रक्तदाबासाठी अंजीर - Anjeer for blood pressure in Marathi

उच्च रक्तदाब आजकाळच्या जगामध्ये तुम्ही सामोरे जात असलेल्या सर्वांत सामान्य समस्यांपैकी एक आहे. एकेकाळी मध्यम वयासाठी असलेली समस्या, आज जगभरातील सर्व वयोगट आणि लिंगांमध्ये प्रचलित असलेली समस्या बनली आहे. अधिकतर लोकांमध्ये मानसिक तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकते; जीवनशैली समस्या, लठ्ठपणा आणि आहार निवडींचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे, मीठयुक्त आणि आंबट जेवण नियमितपणें घेतल्याने शरिरातील सोडिअमचे प्रमाण वाढते आणि शरिरातील मीठ स्तरांमध्ये असंतुलन निर्माण होते. शरिरातील सोडिअम स्तरांना संतुलित करणारे लवण म्हणजे पॉटॅशिअम असते. अभ्यास दर्शवतात की नियमितपणें अंजीर घेणें पॉटॅशिअमचे चांगले स्त्रोत आहे. हे रक्तदाब कमी करण्यासाठी खूप लाभकारी आहे. पॉटॅशिअम प्रचुर असलेले फळ ते आहे, जे शरिरातील रक्तदाब सामान्य राखण्यात खूप महत्त्वपूर्ण आहे.

फुफ्फुसांच्या समस्यांसाठी अंजीर - Anjeer for lung problems in Marathi

अंजिराचे रस खोकला आणि पडसे यांच्याविरुद्ध असलेले एक ज्ञात उपाय आहे. आयुर्वेदामध्ये, अंजिराच्या फळाच्या वापराने घशातून अतिरिक्त म्युकस नष्ट होण्याचे आणि घशाच्या मांसपेशींना पोषण मिळत असण्याचे सांगितले आहे. म्हणून, अंजीर न केवळ घसेदुखी बरी करतो, तर अशा समस्येची पुनरावृत्ती टाळण्याएवढे घशाला बळकटही करतो. एकत्रितपणें, हे गुणधर्म अंजिरांना आत्यंतिक खोकल आणि इतर सामान्य श्वसनात्मक समस्यांविरुद्ध खूप शक्तिशाली पदार्थ बनवतात.

केसगळतीसाठी अंजीर - Anjeer for hair loss in Marathi

अंजिरांचे पोषक आणि एंटीऑक्सिडेंट प्रभाव न केवळ अधिकतर डोक्याच्या कातडीच्या समस्यांसाठी लाभकारक आहे, तर ते केसांना पोषण देते व कंडिशन देते. अंजिराच्या बियांचे तेल वापरल्याने सामान्यपणें केसांना विटामिन ई आणि विटामिन के यांची ती मात्रा मिळते, जी नैसर्गिक चकाकी राखून ठेवणें आणि केसांची गळती टाळण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

त्वचेसाठी अंजिराचे फायदे - Anjeer benefits for skin in Marathi

सोरिअसिस, पुरळ आणि एक्झेमासारखे त्वचेचे रोग यांचा उपचार करण्यात अजिराचे लाभ होत असल्याने पारंपरिक आणि लोक औषध प्रणालींमध्ये त्यांचे वापर केले जाते. स्थानिकरित्या लावल्याने, त्यांचे त्वचेवर पोषक आणि एंटीऑक्सिडेंट प्रभाव पडते. ईराणमध्ये झालेले अभ्यास दाखवते की अंजिराच्या फळाच्या लेटेक्सचे स्थानिक वापर क्रायोजेनिक उपचाराइतकेच ( खूप कमी तापमानापर्यंत गारठवणें आणि मग ते थांबवणें)   डागांवर उपचार करण्यात प्रभावी आहे. प्रक्रियेची वास्तविक पद्धती अज्ञात आहे, पण शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की अंजिराच्या लॅटेक्समुळे काही प्रोटिओलायटिक ( प्रथिने तोडणारे)   गतिविधी होते, ज्यांच्या परिणामी एवढ्या प्रभावीपणें डाग निघून जातात

मधुमेहासाठी अंजीर - Anjeer for diabetes in Marathi

अभ्यास सुचवतात की अंजिराचे फळ घेतल्याने रक्तशर्करेचे प्रमाण कमी करण्यातही मदत मिळते. अंजिरांवर झालेल्या एका संशोधनात या गोष्टीवर प्रकाश पडले आहे की या फळाचे नियमित वापर केल्याने ग्लूकोझची इंसुलिन संवेदनशीलता वाढून रक्तातील अधिक शर्करा बाहेर पडते. तथापी, तुम्हाला मधुमेहाचा त्रास असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेंच सर्वोत्तम राहील.

रक्तक्षयासाठी अंजीर - Anjeer for anemia in Marathi

हल्लीच्या संशोधनानुसार, भारतातील 15-50 वयोगटातील  अंदाजे 51% स्त्रियांना रक्तक्षयाची समस्या आहे. या समस्येसाठी जवाबदार असलेल्या प्रमुख घटकांपैकी आहारात लौहाची कमतरता आहे. अंजीर लौहाचे एक प्रचुर स्त्रोत आहे, जे हेमोग्लोबिनचे (शरिरातील प्राणवायूच्या हस्तांतरणामध्ये मदत करणारे रक्तकोशिकांमधील एक यौगिक)   एक निकराचे घटक आहे. अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की अंजीर घेतल्याने रक्तातील हेमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि रक्तकोशिकांच्या संख्येत सामान्य वाढ होते. फळातील प्रथिन आणि व्हिटॅमिन बीचे प्रमाणसुद्धा रक्तातील लाल कोशिकांची संख्या वाढवण्यात प्रमुख भूमिका बजावते.

(अधिक वाचा: रक्तक्षयाचे प्रकार

निरोगी यकृतासाठी अंजीर - Anjeer for a healthy liver in Marathi

अंजीर एंटीऑक्सिडेंटचे एक चांगले स्त्रोत आहे, जे शरिरातील ऑक्सिडेटिव्ह क्षतीविरुद्ध शरिराची सर्वोत्तम संरक्षणपद्धती आहे. त्याच्या पोषक गुणधर्मांसह, अंजीर यकृतातून विषारी पदार्थ काढण्यास साहाय्य करतो आणि एकूण यकॄताच्या आरोग्याला सुधारतो. जनावरांवर केलेल्या अभ्यासांतून या फळामध्ये सर्वांगीण सुरक्षादायक क्षमता झाल्याचे सिद्ध झाले आहे, पण यकॄतावरील त्याच्या प्रभावाचे अद्याप काहीही पुरावा नाही. म्हणून तुमच्या यकृतावरील अंजिराचे सहप्रभावांबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारणें सल्लेशीर आहे.

मूळव्याधासाठी अंजीर - Anjeer for piles in Marathi

मूळव्याध गुदद्वारात किंवा आजूबाजूला दाह असल्याचे वैशिष्ट्य असलेली स्थिती आहे, ज्यामुळे मलनिःसारण करत असतांना वेदना आणि रक्तस्राव होतात. या समस्येचे वास्तविक कारण अस्पष्ट आहे, पण याचे खूप सामान्य कारण म्हणजे कमी तंतू असलेले आहार आणि अनुचित शौच प्रक्रिया हे असतात. अंजिराच्या फळामध्ये दोघांचेच समाधान आहे. अंजिरामधील प्रचुर तंतू समाविष्ट असल्याने शौच प्रक्रियेचे नियामन आणि मल मऊ होण्यास साहाय्य मिळते, जेणेकरून ते गुदद्वारातून सहज निघू शकते. रेक्टमवर टाकले जाणारे दाबही कमी होते.

झोपेसाठी अंजीर - Anjeer fo sleep in Marathi

रात्री झोप येत नाही? तुम्हाला झोप न येणें (निद्रानाश) हा विकार झाला आहे का? अभ्यासांप्रमाणें मेलॅटॉनिन ( ए टाइप हॉर्मोन)   आपल्या शरिरातील झोपण्याच्या आणि जागण्याच्या लयांना राखून ठेवण्यासाठी जवाबदार आहे. या हार्मोनमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास न केवळ झोपेची संरचना अस्तव्यस्त होते, तर चिंता वाढते आणि सहजच चिडचिड होते. अंजीर एमिनो एसिड ट्रायटोफॅंनचे चांगले स्त्रोत आहे, ज्याचे शरिरातील मेलॅटॉनिन स्तर वाढण्यावर थेट प्रभाव होते. अभ्यास सुचवतात की अंजीर नियमित वापरल्याने शरिरातील ट्रायटोफॅन स्तर वाढतात आणि शरिरातील मॅलॅटॉनिन वेळेवर उत्सर्जित होते, ज्याने योग्यपणें “ स्लीप हार्मोन ” असे म्हटले जाते. अनेक संशोधकांचा दावा आहे की बरोबर झोपेपूर्वी ट्रायटोफॅन घेतल्याने मॅलॅटॉनिनच्या संतुलनामध्ये मदत होते, ज्याने तुम्हाला अधिक सहजरित्या झोप येते.

तसेच, अंजीर मॅग्निशिअमचे चांगले स्त्रोत आहे आणि डॉक्टरांच्या दृष्टीने, मॅग्निशिअम खूप वेळ आणि बेहत्तर झोप तुम्हाला मिळण्यासाठी सहायक असते. तुम्हाला असे वाटल्यास की हेच सर्व काही आहे, ट्रायटोफॅन सॅरॉटॉनिन नावाचे अजून एक मूड बरे करणार्र्या हार्मोनसाठी संप्रेरक म्हणून कार्य करते, जे तुमच्या मेंदूवर थेट परिणाम करून तुम्हाला शांती आणि सुखाची जाणीव करून देते.

तसेच, अंजिराचे फळ नैसर्गिक शर्करेमध्ये प्रचुर आहे, ज्याला डॉक्टरांद्वारे मूड बरे करणारे यौगिक समजले जाते. सॅरॉटॉनिन चांगल्या मात्रेत घेतल्याने चिडचिड आणि अवसादासारख्या मज्जातंत्रीय समस्या ही टळू शकतात.

डोळ्यांसाठी अंजीरचे फायदे - Anjeer benefits for eyes in Marathi

अंजीर विटामिन एचे चांगले स्त्रोत आहेत, जे डोळ्यांची नजर सांभाळून ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व असून डोळ्यांना निरोगी ठेवते. अंजिराचे नियमित वापर न केवळ डोळ्यांसाठी चांगले आहे, तर ते वयसंबंधी नेत्रविकार उदा. मॅक्युलर डिजनरेशन इ. ना प्रलंबित ठेवण्यात मदत करते, जे डोळ्यांच्या रेटिनाच्या मरत असलेल्या कोशिकांना झालेल्या स्तरबद्ध दृष्टिदोष आहे आणि सांप्रत त्याला बरे करता येत नाही.

वजन कमी करण्यासाठी अंजीर - Anjeer for weight loss in Marathi

अंजिराच्या फळांमधील तंतूंचे उच्च स्तर आतड्यांना सुदृढ बनवेल आणि तुम्हाला अधिक वेळेसाठी पोट भरल्यासारखे वाटेल. याने तुमच्या आहारामधील वेळ वाढेल आणि तुम्हाला कमी खाण्यास मदत होईल. तसेच, अंजीरमध्ये कॅलॉरीही कमी असतात, म्हणून, तुमचे पोट भरल्यासारखे वाटून सुद्धा, ते तुमचे कॅलॉरी काउंट वाढवत नाही. आम्हा सर्वांनाच अशा जेवणाची आवड नाही का, ज्याची चव चांगली असेल आणि रात्री झोपतांना तुम्हाला कपडे घट्ट होणार नाहीत. तरीही, अंजीर खूप पोषक आहे आणि दुधाबरोबर घेतल्यास त्याने वजनही वाढू शकते. विशेषकरून तुमचे वजन अधिक असल्यास, अंजीर वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टराबरोबर तपासून घेणें चांगले आहे.

(अधिक वाचा: वजन कमी करण्यासाठी डायट चार्ट

बद्धकोष्ठतेसाठी अंजीर - Anjeer for constipation in Marathi

अंजीर आहारातील तंतूचे खूप चांगले स्त्रोत आहे आणि प्रचुर तंतूंच्या आहाराचा सर्वांत मोठा फायदा असा की तो आहारामध्ये बल्क जोडतो आणि मळाला मऊ करतो, ज्याने शरिरातून मळनिःसारण सोपे होते. म्हणून, नाष्ट्यासाठी अंजिराचे एक बाउल सॅलॅड ठेवून तुम्ही बद्धकोष्ठतेच्या त्रासांपासून मैलभर लांब राहू शकता.

अंजीर कसे वापरले जातात?

अंजीर झाडापासून तोडल्यानंर ताजेच वापरले जाऊ शकतात. पण ताज्या अंजिरांची उपलब्धता आणि साठवणूक एवढी सामान्य नव्हे. म्हणून अधिकतर त्याचे साठवलेले किंवा कोरडेच वापरले जातात.

ताज्या फळामध्ये थोडे रस असते. सुका मेवा गोड, चावण्यासारखा असतो आणि त्याच्या बियांमध्ये एक वेगळेच क्रंच असते, ज्याने त्याचा प्रत्येक चावा विशेष बनतो. औषधीय गुण असलेल्या फळाच्या चविष्ट मात्रेपेक्षा चांगले काय असू शकते। तुमच्या दैनंदिन जेवणात अंजीर ठेवण्याच्या पद्धती तुम्ही शोधत असल्यास, तुम्हाला जाणून आनंद होईल की अंजीर स्वतंत्रपणें किंवा सॅलॅड किंवा सकाळचे धान्य आणि कॉर्नफ्लेक्सबरोबरही घेतले जाऊ शकतात. त्याला दूध किंवा अन्य दुधांबरोबर जोडून स्मूथीझ किंवा मिल्कशेक बनवले जाऊ शकते, किंवा शिरा, केक्स, ब्रेड, पुडिंग इ. मध्ये ठेवली जाऊ शकते. ती बाजारात अनेक गोड पदार्थांच्या रूपात उपलब्ध आहे आणि तुम्हाला तुमच्या अत्यधिक कॉफीला पर्याय म्हणून वापरायचे असल्यास, ते व्यावसायिकरीत्या इंस्टॅंट कॉफी पॅक्सच्या रूपात उपलब्ध आहे. अंजिरांच्या गोड चवीमुळे गोड पदार्थांना ती प्राकृतिक गोडवा देण्यासाठी विशेष असते. तथापी, तुम्ही बाजारातून अंजीर घेत असल्यास, लेबल नीट वाचलेले असल्याची खात्री करा आणि एक्सपायरी डेट व प्रेझर्व्हेटिव्हबद्दलही खबरदार रहा.

सुकवलेले की ताजे अंजीर?

पाणी आणि पाण्यामध्ये विरघळता येणार्र्या काही पोषक तत्त्वांच्या हानीला सोडले, तर सुकवलेल्या आणि ताज्या अंजिराच्या पोषक गुणांमध्ये बरेच काही फरक नव्हे. वास्तविक, अंजीर सुक्या रूपात घेतल्याने बेहत्तर पोषक पूरक तत्त्व म्हणून वापरले जाते. सुक्या अंजिरांमधील फेनॉलिक सामग्री आणि एंटीऑक्सिडेंत गुण ताज्या अंजिरापेक्षा जास्त असतात.

ताजे अंजीर विकत घेणें:

तुम्ही बाझारातून ताजे अंजीर विकत घेणार असल्यास, पूर्ण अंजिरामध्ये काहीही खरचटलेले असू नये आणि असे अंजीर निवडा, ज्यांचा रंग चकाकत असेल. ताज्या अंजीरामध्ये खूप शर्करा असतात, म्हणून विकत घेण्याच्या 2 दिवसांनंतर ते वापरणें बरे असते. तुम्हाला कडवट चव किंवा मोड वाढलेली दिसल्यास अंजीर खाऊ नका. ताजे अंजीर सुरक्षित ठेवणें महत्त्वपूर्ण आहे, कारण ते खूप जटील असतात आणि सहजच खरचटतात.

तुम्ही कच्चे अंजीरही विकत घेऊ शकता आणि खाण्यापूर्वी कक्ष तापमानावर प्राकृतिकपणें ते पिकवू शकतात. पाण्याचा प्रमाण कमी असल्यामुळे, सुकवलेले अंजीर कक्ष तापमानावर थंड आणि कोरड्या जागेवर भंडारित ठेवल्यास कच्च्या अंजिरांपेक्षा अधिक वेळ टिकतात. तुम्ही गरम आणि आर्द्र हवामानात राहत असल्यास, सुके अंजीर शीतपेटीत ठेवणें बेहत्तर असते, जिथे ते  6-8 महिन्यांपर्यंत टिकू शकतात. तथापी, तुम्हाला दुर्गंधी किंवा मोड वाढलेली दिसल्यास, त्यांना फेकून देणें बेहत्तर असते.

आदर्शरित्या, 3-5  किंवा 40 ग्रॅम अंजीर सहप्रभाव न होता घेतले जाऊ शकतात, पण तुमच्या शरिराचे प्रकार, वय आणि लिंग यांप्रमाणें आदर्श मात्रेसाठी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारणें योग्य असेल.

ताजीतवाणी आणि अधिक स्वस्थ दिसणारी त्वचा मिळण्यासाठी ताक आणि अंजिरांचे पेस्ट स्थानिकरीत्या लावता येऊ शकते.

  • काही लोकांना अंजिराशी नैसर्गिक अलर्जी असते. अंजीर त्याच्या पचनात्मक प्रभावांमुळे बद्धकोष्ठतेच्या उपचारामध्ये खूप प्रभावी आहे, पण अत्यधिक प्रमाणात अंजीर घेतल्याने अतिसार होऊ शकते.
  • तुम्ही कोणत्याही रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास, तुमच्या आहारात कोणत्याही प्रमाणात तुमच्या डॉक्टरांशी तपासणी करणें सल्लेशीर आहे, कारण अंजिरांमधील विटामिन के एक नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहे आणि औषधांच्या प्रभावांना जुडून येऊन रक्त अजून पातळ होऊ शकतो.
  • स्थानिकरीत्या लावल्याने अंजिराच्या पानाने त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते. सूर्यामध्ये बाहेर येण्यापूर्वी त्वचेवर अंजिरांच्या पानांचे पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जात नाही।
  • अंजीर तुमच्या शरिरातील रक्तशर्करा कमी करते, म्हणून तुम्हाला मधुमेह असल्यास आणि तुम्ही रक्तशर्करा कमी करण्यासाठी औषधे घेत असल्यास; अंजिराचा उपभोग करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणें उचित राहील.
  • अंजीर नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहे, म्हणून तुम्ही शस्त्रक्रिया करणार असल्यास किंवा हल्लीच शस्त्रक्रिया झालेली असल्यास, दोन आठवड्यांसाठी अंजीर न घेतलेले चांगले आहे. तुम्ही शस्त्रक्रियांनंतर अंजीर घेणें परत चालू करत शकत असल्याबद्दल डॉक्टरांना विचारावे. मूत्रपिंडातून अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अंजिराचे फळ खूप चांगले आहे, ते ऑक्सेलेट्समध्ये प्रचुर आहे (नैसर्गिकरीत्या होणारे एक प्रकारचे जैवशास्त्रीय यौगिक)  । हे ऑक्सेलेट शरिरातील कॅल्शिअम बांधून ठेवतात, जे मूत्रपिंड आणि अमाशयामधील खड्यांमागील मुख्य कारण असते. म्हणून, अंजीर घेत असतांना मॉडरेशनचे पालन केले पाहिजे.

Medicines / Products that contain Figs

संदर्भ

  1. Russo F1, Caporaso N, Paduano A, Sacchi R. Phenolic compounds in fresh and dried figs from Cilento (Italy), by considering breba crop and full crop, in comparison to Turkish and Greek dried figs.. J Food Sci. 2014 Jul;79(7):C1278-84. PMID: 24888706
  2. Sergio D. Paredes, et al. Melatonin and Tryptophan Affect the Activity–Rest Rhythm, Core and Peripheral Temperatures, and Interleukin Levels in the Ringdove: Changes With Age. J Gerontol A Biol Sci Med Sci. 2009 Mar; 64A(3): 340–350. PMID: 19211547
  3. Glenda Lindseth, Brian Helland, Julie Caspers. The Effects of Dietary Tryptophan on Affective Disorders. Arch Psychiatr Nurs. 2015 Apr; 29(2): 102–107. PMID: 25858202
  4. Simon N. Young. How to increase serotonin in the human brain without drugs. J Psychiatry Neurosci. 2007 Nov; 32(6): 394–399. PMID: 18043762
  5. Inam QU1, Ikram H1, Shireen E1, Haleem DJ2. Effects of sugar rich diet on brain serotonin, hyperphagia and anxiety in animal model of both genders.. Pak J Pharm Sci. 2016 May;29(3):757-63. PMID: 27166525
  6. National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases [Internet]. National Institute of Health; Healthy Bones Matter.
Read on app