गेली 5000 वर्षे, आयुर्वेदिक औषध प्रणाली त्यांच्या औषधीय आणि आरोग्य निर्मात्या गुणधर्मांसाठी अनेक वनस्पतींचे वापर करत आहे. आयुर्वेदिक आणि लौकिक औषध प्रणाली अधिक सर्वांगीण प्रदर्शनावर अवलंबून आहे. या लेखामध्ये, आपण त्रिफळा नावाच्या एक मौल्यवान वनस्पतीचे फायदे आणि वापरांवर प्रकाश टाकू या. तुम्ही वनस्पतीजन्य किंवा आयुर्वेदिक औषधे नियमितपणें घेत असल्यास, तुमचे लक्ष त्रिफळावर नक्कीचे गेलेले असेल. “शारंगधर संहिता” नावाच्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये प्रसिद्ध बहुवनस्पतीय ( एकापेक्षा अधिक वनस्पतीने बनलेले) मिश्रणांचे उल्लेख सापडते आणि “चरक संहिता” नावाच्या ग्रंथात विशेष करून त्रिफळाचे आरोग्य फायदे सापडतात. त्रिफळा वनस्पतीबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

त्रिफळा काय आहे?

त्रिफळा तीन फळे म्हणजेच आवळा (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस) , बिभीतकी किंवा बहेडा ( टर्मिनलिआ बेलेरिका) आणि हारीतकी किंवा हरड ( टर्मिनलिआ शेब्युला) यांपासून बनलेले प्रसिद्ध आयुर्वेदिक मिश्रण आहे. वास्तविक पाहता, त्रिफळा हे नांवच “तीन फळे” (त्रि = तीन आणि फळा= फळ) यांपासून बनलेले आहे. आयुर्वेदामध्ये, त्रिफळाचे शोध मुख्यत्त्वे त्याच्या “रसायन” गुणधर्मांसाठी केले जाते, म्हणजेच हे मिश्रण शरिराचे आरोग्य आणि सुदृढता राखून ठेवण्यात खूप प्रभावी आहे आणि आजार होणें टाळते.

त्रिफळा निम्नलिखित वनस्पतींचे समायोजन आहे.

  • आवळा (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस) :
    देशभरात आढळणार्र्या सर्वांत सामान्य फळांपैकी एक असलेल्या आवळ्याला इंडिअन गूझबॅरी असेही म्हणतात. आवळा हे फळ ततू, एंटीऑक्सिडेंट, खनिज यामध्ये प्रचुर आणि जगात विटामिन सीच्या सर्वांत समृद्ध स्त्रोतांपैकी एक आहे. ते चांगल्या अमाशय आरोग्य, बद्धकोष्ठता टाळणें आणि संक्रमणाविरुद्ध झगडण्यासाठी आणि एक वयवाढरोधी संकाय म्हणून सामान्यपणें वापरले जाते.
  • बहेडा ( टर्मिनलिआ बेलेरिका) :
    हे रोप सामान्यपणें भारतीय उपमहाद्वीपात आढळते आणि तापशामक, एंटीऑक्सिडेंट, यकृतरक्षक ( यकृतासाठी चांगले) , श्वसनात्मक समस्या आणि मधुमेहरोधी म्हणून आयुर्वेद आणि औषधीय प्रणालीमध्ये आढळते. आयुर्वेदाप्रमाणें, बहेडामध्ये अनेक प्रचुर जीवशास्त्रीय यौगिक असतात उदा. ग्लूकोसाइड, टॅनिन, गॅलिक एसिड, एथाइल गॅलॅट इ. एकत्रितपणें, ही यौगिके बहेडाच्या अधिकतम आरोग्य फायद्यांसाठी लाभकारी आहे.
  • हरड ( टर्मिनलिआ शेब्युला) :
    हरड आयुर्वेदाला ज्ञात असलेली सर्वांत महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्याचे आरोग्य फायदे एंटीऑक्सिडेंट, दाहशामक आणि वयवाढरोधी असल्याशिवाय एक उत्कृष्ट जखम बरे करणारे पदार्थ आहे. यकृत, पोट, हृदय आणि पित्ताशयाच्या सामान्य कार्याची पुनर्स्थापना आणि साजसांभाळ करण्यात त्याचे लाभ आयुर्वेदात सुख्यात आहे. वास्तविकरीत्या तिला “औषधांचा राजा”असे म्हटले आहे.

तुम्हाला माहीत होते का?

आयुर्वेदामध्ये, त्रिफळा शरिरातील सर्व तीन दोषांना संतुलित करत असल्याचे सांगितले जाते. त्रिफळा आयुर्वेदिक औषधाद्वारे वर्णित केलेल्या रसांपैकी पाच सामावलेले आहेत. ते गोड, आंबट, उग्र, कडू आणि तिखट आहे. त्यामध्ये तुरट हे एकच रस आहे जे आढळत नाही.

  1. त्रिफळाचे आरोग्य फायदे - Health benefits of triphala in Marathi
  2. त्रिफळाचे सहप्रभाव - Side effects of triphala in Marathi
  3. त्रिफळा कशी वापरावी - How to use triphala in Marathi
  4. त्रिफळाची मात्रा - Triphala dosage in Marathi
त्रिफळाचे फायदे, सहप्रभाव आणि ते कसे घ्यावे. चे डॉक्टर

त्रिफळा आयुर्वेदामधील पुनरुज्जीवक वनस्पती आहे, पण ते विविध रोगांच्या उपचारामध्ये वापरले असते. वास्तविक पाहता, आयुर्वेदामध्ये, एवढाही विश्वास आहे की त्रिफळा तुमच्या तुमच्या शरिराची तेवढी काळजी घेईल जेवढी तुमची स्वतःची आई घेईल. या मिश्रणाबद्दल एवढे महान काय आहे? कुणीही विचारू शकतो. म्हणून, आपण त्रिफळाच्या काही आरोग्य फायद्यांना पाहू या:

  • वजन कमी करणें: त्रिफळा घेतल्याने विविध वैद्यकीय अभ्यासांद्वारे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत साहाय्य होते. नियंत्रणांच्या तुळनेने, त्रिफळा दिलेले अभ्यास प्रयुक्त अधिक वजन सोडतात आणि त्यापेक्षाही कमी कमर आणि मांड्यांचा व्यास कमी झाले होते.
  • डोळे: त्रिफळा मोतीबिंदु आणि ग्लूकोमाच्या प्रबंधनासाठी वापरल्या जाणार्र्या आयुर्वेदिक मिश्रणांचे महत्त्वपूर्ण घटक आहे. वैद्यकीय अभ्यास या वनस्पतीच्या मोतीबिंदूरोधी आणि दृष्टी सुधारण्याच्या लाभाची पुष्टी करतात.
  • केस: त्रिफळाचे तुमच्या केसांसाठी सुरक्षात्मक फायदे असतात आणि केस लवकर पांढरे होण्याला लांब ठेवण्याचे उपाय म्हणून सामान्यपणें वापरलेले जाते. ती केसगळती कमी करण्यातही मदत करते आणि तुमच्या डोक्याच्या कातडीला स्थानिकरीत्या लावले असता सर्व वांछित पोषण देते.
  • पोटाच्या समस्या: वातबद्धता, बद्धकोष्ठता, पोट फुगणें आणि अनियमित शौच याच पोटाच्या समस्यांपैकी प्रमुख आहेत. अभ्यासातून समजले आहे की आहारात त्रिफळा सामील केल्याने या सामान्य पचनात्मक तक्रारींचे प्रबंधन होण्यास मदत होते आणि त्याद्वारे शरिरातील अतिरिक्त विषारी पदार्थांपासून मुक्ती मिळते.
  • पॅरिओडॉंटिसिस: त्रिफळाच्या सूक्ष्मजीवरोधी गतिविधी सामान्य मौखिक समस्या उदा. हिरड्याचे विकार आणि पॅरिओडॉंटोसिस यांच्या प्रबंधनात त्याच्या वापरांचे समर्थन करतात. क्लॉरहेडिक्सिनसह माउथवाश म्हणून वापरले जात असल्यास, ते प्लाक बनणें कमी करून मौखिक आरोग्य सुधारतात.
  • सूक्ष्मजीवरोधी: त्रिफळा विविध संक्रंमणांमध्ये सूक्ष्मजीवरोधी पदार्थ म्हणून वापरली जाते आणि वैद्यकीय अभ्यासांनी अशा वापराचे समर्थन केले आहे. त्रिफळाचे एस्चेरिचिआ कॉली, सॅल्मोनॅला टायफी, स्यूडोमॉनस एरिगिनॉसा, व्हायब्रिओ कॉलेरे यांविरुद्ध प्रभावी असण्याचे प्रमाण आहेत.
  • एंटीऑक्सिडेंट: त्रिफळाची त्याच्या प्रचुर विटामिन सी घटकामुळे एंटीऑक्सिडेंट घटकामुळे एंटीऑक्सिडेंट खाद्यपदार्थ म्हणून पुष्टी झाली आहे. याप्रकारे, ती फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक व विनाशाक प्रभावांविरुद्ध तुमच्या शरिराला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
  • मधुमेह: हार्मोन इंसुलिनवर कार्य होण्याद्वारे मधुमेहरोधी प्रभाव त्रिफळामध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती रक्तधारेत ग्लूकोझचे संग्रह आणि उत्सर्ग कमी करण्याद्वारे कार्य करते.

वजन कमी करण्यासाठी त्रिफळा - Triphala for Weight Loss in Marathi

अभ्यास सुचवतात की नियमित त्रिफळा घेतल्याने वजन कमी करण्यासाठी, विशेषकरून लठ्ठ लोकांमध्ये उत्कृष्ट आहे. हल्लीच्या मानव आधारित संशोधनामध्ये, 16 ते 60 वर्षाच्या लठ्ठ लोकांच्या दोन समूहांना वजन कमी करण्यात त्रिफळाच्या फायद्यांचे परीक्षण कमी करण्यासाठी निवडले गेले. या समूहापैकी 12 आठवड्यांच्या अवधीसाठी एकाला दिवसातून तोंडाद्वारे दोनदा 5 ग्रॅम त्रिफळा दिला गेला, तर दुसर्र्या समूहाला प्लॅसीबो उपचार दिले गेले आणि असे आढळले की त्रिफळा दिलेल्या समूहामध्ये शरिराच्या वजनामध्ये आणि कंबर व मांड्यांच्या व्यासामध्ये लक्षणीय घट आढळले. तसेच, आपण शौच प्रक्रियांवर त्रिफळा पुडाच्या वापराच्या नियामक प्रभावांवर नजर टाकली, तर हे स्पष्ट आहे की त्रिफळा अधिक सहज वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. म्हणून, हे आपण सुरक्षितपणें म्हणू शकतो की त्रिफळा एक प्रभावी वजन कमी करणारे उपाय आहे.

 (अधिक पहा: लठ्ठपणाची कारणे)

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

डोळ्यांसाठी त्रिफळा चूर्ण - Triphala Powder for Eyes in Marathi

आयुर्वेद डोळ्यांसाठी खूप लाभकारक प्रभावांचे वर्णन करते, ज्यामध्ये मोतीबिंदू आणि ग्लूकोमासारख्या नेत्रविकारांचा धोका कमी करण्याची क्षमता सामील आहे. वैद्यकीय अभ्याससुद्धा त्रिफळाच्या मोतीबिंदूविरोधी प्रभावाचा दावा करतात. अशक्त दृष्टी सुधारण्यासाठी, आयुर्वेदिक वैद्यांद्वारे सुचवलेल्या उपचारामध्ये त्रिफळा प्रमुख घटक आहे. त्रिफलाघृत नावाचे आयुर्वेदिक औषध नेत्रांसाठी सर्वोत्तम औषध समजले जाते. तथापी, डोळे शरिराच्या सर्वांत संवेदनशील भागांपैकी एक आहे आणि तुमच्या डोळ्यांसाठी त्रिफळा वापरण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल आयुर्वेदिक वैद्याला विचारणेंच सर्वोत्तम आहे.

केसांसाठी त्रिफळा - Triphala for hair in Marathi

त्रिफळा एंटीऑक्सिडेंटचे एक प्रचुर स्त्रोत आहे, जे प्रदूषणाद्वारे होणारी केसांची क्षती कमी करण्यात मदत करते. त्रिफळामधील आवळा घटक वेळेपूर्वी केस पांढरे होणें थांबवण्यासाठी खूप लाभकारी आहे, तर त्रिफळामधील बेहडा केसगळती कमी करण्यात आणि केसांचे मूळ सुदृढ करण्यात खूप प्रभावी आहे. त्रिफळामुळे डोक्याच्या कातडीमधील रक्ताभिसरण वाढल्याचे द्योतक आहे, म्हणून त्याद्वारे अधिक प्रभावीपणें पोषक तत्त्वे आणि खनिजे अवशोषित करण्यास मदत करतात. त्रिफळा तेल किंवा त्रिफळा पेस्ट केसांवरील पोषक आणि सुरक्षात्मक फायदे मिळण्यासाठी थेट डोक्यावर लावले जाते.

बद्धकोष्ठतेसाठी त्रिफळा - Triphala for Constipation in Marathi

निरोगी आणि स्वच्छ आतडी शरिराच्या उत्कर्षासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पचनसंबंधी कचरा साचल्याने न केवळ आतड्याच्या मार्गिका बंद पडतात, तर निरंतर व दीर्घकालिक बद्धकोष्ठतेमुळे शरिरातील विषारी पदार्थ संग्रह होऊ शकते. शरिरात अशा विषारी पदार्थांचे उच्च स्तर असल्याने चिंता आणि तणाव यासारख्या समस्या होऊ शकतात. आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, त्रिफळा नैसर्गिक पाचक म्हणून शौच क्रिया नियमित करण्यात मदत करते आणि शरिरातील आतड्यांच्या स्नायूंना बळकट करते. ती पोटाकरिता जड नसते आणि अधिक सहप्रभाव न होता खूप अवधीसाठी घेतली जाते. भारतात झालेल्या वैद्यकीय अभ्यासांचा दावा आहे की नियमित त्रिफळा घेतल्याने बद्धकोष्ठता, अनियमित शौच, वातबद्धता आणि पोटदुखी कमी करण्यात खूप प्रभावी आहे.

दातांसाठी त्रिफळा - Triphala for Teeth in Marathi

त्रिफळाचे एंटीऑक्सिडेंट, दाहशामक आणि सूक्ष्मजीवरोधी प्रभाव तिला सामान्य दातातील समस्या कमी करण्यास आणि चांगल्या दाताच्या आरोग्यास वाव देण्यासाठी उत्कृष्ट पदार्थ बनवतात. भारतात झालेल्या अभ्यास सुचवते की त्रिफळा आणि क्लॉरहेक्सिडिन माउथवाश दातांमधील प्लाक बनण्याची समस्या, हिरड्यांचे दाह बरे करण्यात आणि तोंडाची कॅव्हिटीमधील सूक्ष्मजीवसंबंधी भार कमी करण्यात खूप प्रभावी आहे. पुढील अभ्यासामध्ये, त्रिफळा आणि 0. 2% क्लॉरहेक्सिडिनने बनलेले माउथवाशचा दावा आहे की ते रुग्णालयात भरती झालेल्या दंतविकारांच्या रुग्णांमध्ये प्लाक बनल्याने आणि हिरड्यांचा दाहाचे उपचार करण्यात समान पद्धतीने प्रभावी आहे.

सूक्ष्मजीवरोधी म्हणून त्रिफळा - Triphala as an antimicrobial in Marathi

आयुर्वेदामध्ये, त्रिफळाचे सूक्ष्मजीवरोधी पदार्थ म्हणून पारंपरिकरीत्या वापर केले जाते. हल्लीच्या प्रयोगशाळा अभ्यासांनीही त्रिफळाच्या सूक्ष्मजीवरोधी आणि जिवाणूरोधी क्षमतेचे दर्शन घडवले आहे. भारतात झालेल्या संशोधनाचे म्हणणे आहे की त्रिफळाचे एथनॉलिक सार एचआयव्ही रुग्णांना दोयम रोग होणार्र्या सर्वांत सामान्य जिवाणूंविरुद्ध खूप प्रभावी मानले गेले आहे. या अभ्यासामध्ये त्रिफळा एस्चेरिचिआ कॉली, सॅल्मोनॅला टायफी, स्यूडोमोनस एरुगिनोसा, स्टॅफिलोकॉकस ऑरस, व्हायब्रिओ क्लोरिआ इ. विरुद्ध खूप प्रभावी असल्याचे आढळले आहे. तथापी, यापैकी कोणत्याही प्रभावांची चाचणी आतापर्यंत मानवी प्रयुक्तांवर झालेली नाही.

एंटीऑक्सिडेंट म्हणून त्रिफळा - Triphala as an antioxidant in Marathi

त्रिफळा विटामिन सी, पॉलिफेनॉल आणि इतर एंटीऑक्सिडेंट खूप प्रचुर मात्रेत आहे, जे शरिरातील फ्री रॅडिकल हानीशी झगडण्यासाठी अचूक पदार्थ आहे. फ्री रॅडिकल्स एक प्रकारच्या प्रतिक्रियात्मक प्रजातीच्या प्राणवायू आहेत, ज्या काही सामान्य शारीरिक कार्याच्या परिणामी शरिरात बनतात आणि वयासोबत संग्रहित होत राहतात. पण काही जीवनशैली आणि आहार निवडी उदा. जंक फूड, धूम्रपान किंवा प्रदूषण अधिक घेतल्याने, या फ्री रॅडिकल्सचे अधिक जलद गतीने संग्रह होते. शास्त्रज्ञांप्रमाणें, शरिरात या फ्री रॅडिकल्स अधिक प्रमाणात जमा होणें अधिकतर आरोग्यसंबंधी समस्या आणि रोगांचे कारण आहे. अधिक फ्री रॅडिकल घटक शरिराच्या प्रत्येक प्रमुख अंगाचे योग्य कार्य आणि आरोग्यावर प्रभाव पाडतात, उदा. हृदय, यकृत आणि मूत्रपिंड आणि माणसांमध्ये वयवाढीच्या लक्षणांची लवकर सुरवात होण्याच्या प्रमुख कारणांपैकी ते एक आहे. मग एंटीऑक्सिडेंट हायप्ड फ्री रॅडिकल्सशी झगडण्यात कसे साहाय्य करतात? चांगले एंटीऑक्सिडेंट पूरक फ्री रॅडिकल्सला कमी करणें आणि निष्क्रिय करतात (शरिराला हानी देण्यापासून थांबवतात) आणि लवकर हानी होण्यापासून शरिराला सुरक्षित ठेवतात.

मधुमेहासाठी त्रिफळा - Triphala for diabetes in Marathi

त्रिफळा शरिरासाठी खूप शक्तिशाली हायपोग्लॅसीमिक ( शर्करा कमी करणारे) आहे. अभ्यासांचा दावा आहे की त्रिफळा व्यावसायिकरीत्या उपलब्ध अल्फा-एमॅलिझ आणि अल्फा-ग्लूकोसिडेझ नांवाच्या इंसुलिनपासून दोन प्रमुख एंझायमच्या गळतीस नियंत्रण करण्याद्वारे मधुमेहरोधी औषधांसारखीच कार्य करते. हे एंझायम अधिकतम शर्करा यौगिकांच्या ग्लूकोझमध्ये तूट होण्यासाठी जवाबदार आहेत. या एंझायमचे नियंत्रण ग्लूकोझ बनणें आणि रक्तात त्याचे अनुक्रमिक उत्सर्ग होणें थांबवेल. अशाप्रकारे, रक्तशर्करा स्तरावर नियंत्रण होईल. 45 बिगर इंसुलिन निर्भर मधुमेह रुग्णांवर भारतात झालेल्या अभ्यासामध्ये, आढळले की नियमित त्रिफळा घेतल्याने रक्तशर्करा कमी करण्याचा लक्षणीय प्रभाव होतो.

संधिवातरोधी म्हणून त्रिफळा - Triphala as an anti-arthritic in Marathi

त्रिफळा खूप उत्कृष्ट दाहशामक आणि एंटीऑक्सिडेंट आहे. हे दोन गुण संधिवात व संधिवातरोधी लक्षणांपासून मुक्ती मिळण्यासाठी एक अचूक पूरक तत्त्व आहे. प्राण्यांवर झालेले अभ्यास दावा करतात की त्रिफळा रुमॅटॉयड संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांमध्ये कार्टिलेज आणि हाडांच्या क्षतीची दुरुस्ती करतात. तथापी, माणसांमध्ये संधिवातावर उपचार करण्यात त्रिफळाची प्रभावितेवर माहिती घेण्यासाठी अजून काही अभ्यास केले गेले नाहीत.

त्रिफळाचे कर्करोगरोधी गुणधर्म - Triphala anticancer properties in Marathi

त्रिफळाच्या कर्करोगरोधी गतिविधींचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले आहेत आणि अशा सर्व अभ्यासांचा दावा आहे की त्रिफळा एक संभावित कर्करोगरोधी औषध आहे. भारतात झालेले हल्लीचे अभ्यास सुचवते की त्रिफळामध्ये शरिरातील कॉलन कर्करोगाच्या विकासशामक आणि कर्करोग कोशिकांना मारणारे शक्तिशाली गुणधर्म आहेत. प्रोस्ट्रेट कर्करोगावर झालेले पुढील अभ्यास दर्शवते की त्रिफळामध्ये असलेले गॅलिक एसिड त्याच्या कर्करोगरोधी गतिविधीसाठी जवाबदार आहे. हेच नाही, तर त्रिफळाच्या कर्करोग कोशिका नाश करण्याच्या कृतीमुळे सामान्य कोशिका आणि कर्करोग कोशिकांवर वेगवेगळे प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. ती शरिराच्या सामान्य कोशिकांवर प्रभाव होऊ न देता कर्करोग कोशिकांना मारून टाकते. तथापी, मानवी प्रयुक्तांवर त्रिफळाच्या कर्करोगरोधी प्रभावांचे परीक्षण करण्यासाठी कोणतेही अभ्यास केले गेलेले नाहीत. म्हणून, त्रिफळाचे कर्करोगरोधी प्रभावांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी तुमच्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेतलेला बरा.

त्रिफळा दीर्घकालिक प्रभावासाठी खूप सुरक्षित समजले जाते. तुम्ही एरवी निरोगी व्यक्ती असल्यास तुम्ही पोषक फायद्यांसाठी त्रिफळा घेऊ शकता. पण त्याचे काही सहप्रभाव असतात, जे तुमच्या आहारात त्रिफळा घेण्यापूर्वी विचारात घेतले पाहिजेत.

  1. त्रिफळा एक नैसर्गिक पाचक आहे. माफक मात्रेत घेतल्या ते खूप लाभकारक असले तरी, अधिक मात्रेत त्रिफळा घेतल्याने अतिसार आणि डायसेंट्री होऊ शकते.
  2. तुम्हाला आधीच औषधे विहित केलेली असल्यास, आहारामध्ये त्रिफळा जोडण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याला विचारलेले बरे, कारण ते औषधांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू शकते.
  3. गरोदर आणि संगोपक मातांसाठी त्रिफळा सुरक्षित असल्याबद्दल कोणतेही शास्त्रीय प्रमाण नसल्यामुळे, गरोदर महिलांना कोणत्याही स्वरूपात त्रिफळा घेण्याचा सल्ला दिला जात नाही किंवा बापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा.
  4. त्रिफळा लहान मुलांना दिला जाऊ नये .
  5. काही लोकांना त्रिफळा घेतल्यानंतर निद्रेमध्ये व्यत्यय येण्याची तक्रार करतात, पण ते चूर्णाच्या मात्रेवर निर्भर असते.

त्रिफळा त्रिफळा चूर्णाच्या स्वरूपात सर्वांत सामान्यपणें घेतली जाते, पण ती टॅबलेट, कॅप्स्युल आणि त्रिफळा रसाच्या स्वरूपामध्येही व्यावसायिकरीत्या उपलब्ध आहे. स्थानिक वापरासाठी त्रिफळा तेलाच्या स्वरूपातही घेतली जाऊ शकते.

त्रिफळा चूर्ण तयार करण्यासाठी तीन वनस्पतीच्या प्रमाणाचे अनुपात वैय्यक्तिक शरीर प्रकाराबरोबर बदलते, पण सामान्यपणें तीन वनस्पती 1 (हरड) 2 (बहेडा) आणि 4 (आवळा) या अनुपातात मिसळ्या जातात. ½ चहाचा चमचाभर चूर्ण पाण्यासह (चहाच्या स्वरूपात) जेवणानंतर सकाळी किंवा रात्री घेतली जाऊ शकते. आयुर्वेदिक वैद्य त्रिफळा वेगवेगळे करून 1:2:4 अनुपातामध्ये घेतात. बहेडा चूर्ण थेट जेवणापूर्वी घेण्याचे सुचवले जाते, तर आवळा चूर्ण जेवणापूर्वी घेतल्याचे सुचवले जाते आणि हरड चूर्ण जेवणाच्या कमीत कमी 2-3 तासांपूर्वी घेण्याचे सुचवले जाते. आयुर्वेदाप्रमाणें, हे सर्व चूर्ण सर्वोत्तम परिणाम मिळावे म्हणून तूप आणि मधासोबत घेतले पाहिजे. नियमित त्रिफळा घेतल्याने पचन सुधारणें आणि शरिरासाठी आवश्यक खनिजे आणि पोषकतत्त्वे पूरित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तथापी, तुम्हाला खरेच घरी ही आयुर्वेदिक आरोग्यास वाव देणारे मिश्रण बनवायचे असेल, तर तुमच्या आयुर्वेदिक वैद्याला त्रिफळाचूर्ण बनवण्याच्या मात्रा व पद्धतीसाठी विचारले पाहिजे.

त्रिफळा गुग्गुळ आणि त्रिफळामध्ये भ्रम केला जातो, पण त्रिफळा गुग्गुळ एक थोडे भिन्न मिश्रण आहे, जी लवंग, काळीमिरी आणि गुग्गुळु ( मिर रॅसिन) त्रिफळामधील फळांमध्ये मिसळले जाते आणि आयुर्वेदामध्ये दाहरोधी मिश्रण म्हणून वापरले जाते.

त्रिफळा चिकित्सकाच्या सल्लेप्रमाणें रिकामेपोटी किंवा जेवणानंतर घेतले जाऊ शकते. सामान्यपणें ½ चहाचा चमचाभर त्रिफळा चूर्ण चहाच्या रूपात एका दिवसात घेतला जाऊ शकतो. त्रिफळा चूर्ण दिवसातून एकदा मध किंवा तुपाबरोबर घेतले जाऊ शकते, पण प्रत्येक मात्रेत चूर्णाचे प्रमाण, या बाबतीत, पाण्याबरोबर घेतल्या जाणार्र्या मात्रेपेक्षा वेगळे असेल. त्रिफळाची मात्रा शरिराचे प्रकार, वय, लिंग आणि इतर घटकांप्रमाणें वेगळी असते, पण आयुर्वेदिक वैद्य सुचवतात की दैनंदिन त्रिफला चूर्णासाठीची मात्रा 2 चहाचा चमचापेक्षा अधिक असू नये.

त्रिफळा कॅप्स्युल, सिरप आणि टॅबलेटची मात्रा त्रिफळा उत्पादनाच्या क्षमतेप्रमाणें आणि वैय्यक्तिक शरीर प्रकार व शरीरशास्त्राप्रमाणें भिन्न असेल. म्हणून, तुम्हाला या आयुर्वेदिक चूर्णाच्या विशिष्ट वैद्यकीय फायद्यांचा लाभ घ्यायचा असल्यास, तुमच्यासाठी त्रिफळेची योग्य मात्रा जाणून घेण्याकरिता आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेतलेला बरा.

Dr. Harshaprabha Katole

Dr. Harshaprabha Katole

Ayurveda
7 Years of Experience

Dr. Dhruviben C.Patel

Dr. Dhruviben C.Patel

Ayurveda
4 Years of Experience

Dr Prashant Kumar

Dr Prashant Kumar

Ayurveda
2 Years of Experience

Dr Rudra Gosai

Dr Rudra Gosai

Ayurveda
1 Years of Experience


Medicines / Products that contain Triphala

संदर्भ

  1. Subramani Parasuraman, Gan Siaw Thing, and Sokkalingam Arumugam Dhanaraj. Polyherbal formulation: Concept of ayurveda. Pharmacogn Rev. 2014 Jul-Dec; 8(16): 73–80. PMID: 25125878
  2. Ganesh Muguli et al. A contemporary approach on design, development, and evaluation of Ayurvedic formulation - Triphala Guggulu. Ayu. 2015 Jul-Sep; 36(3): 318–322. PMID: 27313420
  3. Kalaiselvan S1, Rasool M. Triphala exhibits anti-arthritic effect by ameliorating bone and cartilage degradation in adjuvant-induced arthritic rats.. Immunol Invest. 2015;44(4):411-26. PMID: 25942351
  4. Kalaiselvan S1, Rasool MK. The anti-inflammatory effect of triphala in arthritic-induced rats.. Pharm Biol. 2015 Jan;53(1):51-60. PMID: 25289531
  5. V. Lobo, A. Patil, A. Phatak, N. Chandra. Free radicals, antioxidants and functional foods: Impact on human health. Pharmacogn Rev. 2010 Jul-Dec; 4(8): 118–126. PMID: 22228951
  6. Rajan SS1, Antony S. Hypoglycemic effect of triphala on selected non insulin dependent Diabetes mellitus subjects. Anc Sci Life. 2008 Jan;27(3):45-9. PMID: 22557278
  7. Christine Tara Peterson, Kate Denniston, BS, Deepak Chopra. Therapeutic Uses of Triphala in Ayurvedic Medicine. J Altern Complement Med. 2017 Aug 1; 23(8): 607–614. PMID: 28696777
  8. Srikumar R. Evaluation of the growth inhibitory activities of Triphala against common bacterial isolates from HIV infected patients.. Phytother Res. 2007 May;21(5):476-80. PMID: 17273983
  9. Neeti Bajaj, Shobha Tandon1. The effect of Triphala and Chlorhexidine mouthwash on dental plaque, gingival inflammation, and microbial growth. Int J Ayurveda Res. 2011 Jan-Mar; 2(1): 29–36. PMID: 21897640
  10. Ritam S. Naiktari, Pratima Gaonkar, Abhijit N. Gurav, Sujeet V. Khiste. A randomized clinical trial to evaluate and compare the efficacy of triphala mouthwash with 0.2% chlorhexidine in hospitalized patients with periodontal diseases. J Periodontal Implant Sci. 2014 Jun; 44(3): 134–140. PMID: 24921057
  11. Sandhya T1, Lathika KM, Pandey BN, Mishra KP. Potential of traditional ayurvedic formulation, Triphala, as a novel anticancer drug.. Cancer Lett. 2006 Jan 18;231(2):206-14. PMID: 15899544
  12. Ramakrishna Vadde, Sridhar Radhakrishnan, Lavanya Reddivari, Jairam K. P. Vanamala. Triphala Extract Suppresses Proliferation and Induces Apoptosis in Human Colon Cancer Stem Cells via Suppressing c-Myc/Cyclin D1 and Elevation of Bax/Bcl-2 Ratio. Biomed Res Int. 2015; 2015: 649263. PMID: 26167492
  13. Russell LH Jr et al. Differential cytotoxicity of triphala and its phenolic constituent gallic acid on human prostate cancer LNCap and normal cells. Anticancer Res. 2011 Nov;31(11):3739-45. PMID: 22110195
  14. Suresh Kumar Gupta. Evaluation of anticataract potential of Triphala in selenite-induced cataract: In vitro and in vivo studies. J Ayurveda Integr Med. 2010 Oct-Dec; 1(4): 280–286. PMID: 21731375
  15. Viroj Wiwanitkit. Anticataract potential of Triphala. J Ayurveda Integr Med. 2011 Apr-Jun; 2(2): 51. PMID: 21760687
Read on app