अश्वगंधा काय आहे?

तुम्ही आयुर्वेदिक औषधे घेतल्यास किंवा पर्यायी औषधांमध्ये तुमचा विश्वास असल्यास, तुम्ही अश्वगंधा हे नाव कित्येक वेळा ऐकला असेल. आणि का नाही? अश्वगंधा सर्वांत महत्त्वपूर्ण वनस्पतींपैकी एक आहे. अश्वगंधाचे अस्तित्व आणि वापर अथर्ववेदाप्रमाणें हजारो वर्ष जुना आहे. औषधाच्या भारतीय पारंपरिक प्रणालीमध्ये त्याला बहुधा जादुई वनौषधी किंवा एडॅप्टोजेन (तणावरोधी पदार्थ) म्हटले जाते, कारण तणावसंबंधी लक्षणे आणि उत्कंठा विकारांपासून मुक्ती मिळण्यासाठी ते सर्वांत समान पद्धतीने वापरल्या जाणार्र्या वनौषधींपैकी एक आहे.

अश्वगंधा हे नाव अश्व (घोडा) आणि गंध यांद्वारे बनलेले आहे. तसेच अश्वगंधाच्या मुळांमध्ये घोड्याचे मूत्र किंवा घामाचे विशेष गंध असल्यानेही हे नाव मिळाले असेल. तसेच आयुर्वेदिक संशोधनकर्त्यांचा विश्वास आहे की अश्वगंधाचे उपभोग केल्यास घोड्यासारखी शक्ती (ताकद आणि लैंगिक शक्ती) प्राप्त होते.

अश्वगंधाबद्दल काही मूळभूत तथ्य:

  • वनस्पतीशास्त्रीय नावविदॅनिआ सॉम्निफेरा
  • कुटुंब: सोलॅनेस (नाइटशेड फॅमिली)
  • संस्कृत नावे: अश्वगंधा, वराहकर्णी (डुकराच्या कानांसारखे आकार), कामरूपिणी
  • सामान्य  नावे: विंटर चेरी, भारतीय गिंसेंग, पॉयझन गूझबॅरी
  • वापरले जाणारे भाग: अधिकतर मूळ आणि पाने, पण फुले आणि बिया यांचाही वापर केल्या गेल्याचे सांगितले जाते
  • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: अश्वगंधा भारताच्या सर्वांत शुष्क भागांत मिळते (मुख्यत्त्वे मध्यप्रदेश आणि राजस्थान),नेपाळ, आफ्रिका आणि मध्यपूर्व, पण तिचे रोपण अमेरिकेतही झाले आहे.
  1. अश्वगंधा कशी कार्य करते - How does Ashwagandha work in Marathi
  2. अश्वगंधाचे आरोग्य फायदे आणि वापर - Health Benefits and Uses of Ashwagandha in Marathi
  3. अश्वगंधा आणि अश्वगंधा पूड कसे वापरावे - How to use Ashwagandha and Ashwagandha Powder in Marathi
  4. अश्वगंधेची मात्रा - Ashwagandha Dosage in Marathi
  5. अश्वगंधेचे सहप्रभाव - Side effects of Ashwagandha in Marathi
अश्वगंध फायदे, सहप्रभाव, वापर आणि मत्रा चे डॉक्टर

अश्वगंधाचे अनेक “कार्य” आहेत. वनस्पतीशास्त्रानुसार कार्य म्हणजे शरिरावर काम करू शकणारे वनौषध किंवा रोप. वनौषधीचे विशिष्ट कार्याची परिभाषा करण्यासाठी विभिन्न संज्ञा आहेत आणि नेमक्या पद्धतीने वनौषध शरिराच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्य करू शकते. एक वनौषध म्हणून अश्वगंधाच्या सर्वांत प्रसिद्ध वापरांची सूची याप्रकारे आहे:

  • तणाव आणि उत्कंठेपासून आराम मिळण्यासाठी वापर होत असल्याने त्याला एडोप्टॅजॅन असे ही म्हणतात.
  • ते शरिराचे पुनरुज्जीवन करून शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधार करण्यासही साहाय्य करते.
  • हल्लीच्या काही संशोधकांनुसार, अश्वगंधाचे काही कर्करोगरोधी गुणधर्म मिळालेले आहेत. कर्करोगाच्या उपचारात या औषधीच्या संभाव्य वापरांच्या निर्धारणासाठी कार्य अजूनही चालू आहे.
  • भारतीय शास्त्रज्ञांद्वारे केलेल्या संशोधनात दावा केला गेला आहे की अश्वगंधा सांधेदुखी कमी करण्यात प्रभावी आहे, विशेषकरून रुमॅटॉयड आर्थरायटीस बरे करण्यासाठी
  • संशोधनांचा सल्ला आहे की अश्वगंधा वापरल्याने कामेच्छा आणि लैंगिक आरोग्यात सुधार होऊ शकते.
  • डाययुरेटिक म्हणून, ते शरिरातील अतिरिक्त तरळ पदार्थ आणि लवणापासून मुक्ती मिळण्यात साहाय्य करते.
  • त्वचा स्वच्छ करणें आणि वय वाढण्याच्या सुरवातीची लक्षणे टाळण्यासाठी ते उत्तम आहे.
  • संशोधनाप्रमाणे, त्यामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढते.
  • ऊर्जेच्या दृष्टीने, अश्वगंधाचे शरिरावर तापक प्रभाव होते. आयुर्वेदाप्रमाणे, त्याने पित्त वाढते.

मग पित्त काय आहे?

आयुर्वेदानुदार शरिरात तीन “दोष” किंवा ऊर्जा नियामक आहेत, जे व्यक्ती उत्तम आरोग्यात असण्यासाठी समतोलात असणें आवश्यक आहे. हे आहेत:

  • वात-शरिरातील परिचलन आणि मज्जातंत्रिका प्रणाली गतिविधींना सामोरे जाते.
  • पित्त –शरिरातील चयापचयांना सामोरे जाते
  • कफ-शरिरातील तरळ पदार्थांचा समतोलाला सामोरे जाते.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

तणावमुक्ती करणारे म्हणून प्रसिद्ध असल्याखेरीज, अश्वगंधाचे विविध प्रकारचे वापर आहेत. चांगल्या आरोग्याला वाव देण्यासाठी हे वनौषध वापरले गेल्याच्या काही पद्धती आपण पाहू.

  • मानसिक आरोग्यास वाव: अश्वगंधा एक प्रसिद्ध एडॅप्टोजेन आहे. त्यामुळे तणाव, अवसाद आणि उत्कंठा कमी होते आणि तणावसंबंधी परिस्थिती टाळल्या जातात उदा. उच्च रक्तदाब आणि मधुमेह.
  • मधुमेहाच्या नियंत्रणास मदत होते: अश्वगंधा एक उत्कृष्ट मधुमेहरोधी आहे, जसे की संशोधन अभ्यासांतून माहिती मिळाली आहे. त्याने इंसुलिन स्तर वाढते आणि निरोगी व मधुमेहग्रस्त दोन्ही प्रकारच्या व्यक्तींमध्ये रक्तशर्कराचे स्तर वाढते.
  • संधिवाताची लक्षणे कमी होतात: प्रभावी दाहशामक असल्याशिवाय, अश्वगंधा संधिवाताचा त्रास आणि सूज कमी करण्यासही उपयोगी आहे. ते पित्तात ही समतोल आणते, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये संधिवाताचे कारण समजले जाते.
  • रोगप्रतिरोधी प्रणालीस संप्रेरणा देते: संशोधन प्रमाण सूचित करतात की अश्वगंधा एक उत्कृष्ट इम्युनोस्टिम्युलेटर आहे. ती तुमच्या रोगप्रतिरोध प्रणालीची क्षमता वाढवून संक्रमणांविरुद्ध लढण्यास मदत करते.
  • जखम बरी होण्यास मदत: अश्वगंधा तोंडाद्वारे दिल्याने पूर्वेवैद्यकीय प्रणालींमध्ये जखम बरी होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. तथापी, मानव आधारित संशोधनांद्वारे हा फायद्याची अजून पुष्टी व्हायची आहे.
  • शांत निद्रा मिळते: तणाव आणि उत्कंठा कमी करून, अश्वगंधा तुमचा मेंदू शांत ठेवून गाढ झोप मिळण्यास साहाय्य करते.
  • लैंगिक आरोग्य वाढवते: अश्वगंधामुळे महिला आणि पुरुषांमधील कामेच्छा वाढण्याचे लक्षात आले आहे. संशोधने सुचवतात की त्याने मनोवैज्ञानिक स्तंभनदोष आणि पुरुषांमधील शुक्राणूच्या संख्येत सुधार होतो.
  • थायरॉयडचे कार्य वाढते: अश्वगंधामुळे शरिरातील टी४ स्तर वाढतो आणि हायपोथायरॉयडिझ्म बरे होण्यास साहाय्य होतो. तथापी, मानवी वापरासाठी त्याच्या सुरक्षिततेची पुष्टी होण्यासाठी संशोधनांची गरज आहे.
  • हृदयारोग्यामध्ये सुधार होतो: अश्वगंधा तुमच्या हृदयाला सर्वांगीण सुरक्षा देऊन हृदयाच्या स्नायू बळकट होतात, रक्ताचा थक्का जमणें टळतेअ आणि हृदयावरील तणाव कमी होतो. त्याने कॉलेस्टरॉल कमी होतो, जो हृदयरोगासाठी एक प्रमुख धोका घटक आहे.
  • मेंदूच्या आरोग्याची सुरक्षा होते: संशोधन सुचवतात की अश्वगंधा पार्किंसंस आणि एल्झायमर्समुळे होणारी मज्जातंत्रीय क्षती सैल करते. तथापी, या यंत्रणेबद्दल अद्याप काहीही माहीत नाही.
  • एड्रेनल फॅटिगला सामोरे जाते: एडॉप्टोजेनिक वनौषधी म्हणून, अश्वगंधा तुमच्या मनाला शांत करते, जे पर्यायाने तुमच्या शरिरातील कॉर्टिझोल स्तर कमी करतात. यामुले मूत्रपिंडांवरील दाब कमी होतो आणि एड्रेनल फॅटिग कमी होतो.
  • सापाच्या चावांविरुद्ध विषरोधी म्हणून कार्य करते: संशोधन सुचवतात की अश्वगंधा टॉपिकल पद्धतीने लावल्याने शरिरात त्याचा पसार कमी होतो. यात काही आश्चर्य नाही की हे एक पारंपरिक विषरोधी वनौषध आहे.
  • त्वचेसाठी फायदेशीर: एंटिऑक्सिडेंट्सचे एक समृद्ध स्त्रोत म्हणून, अश्वगंधाचे अचूक आयुवर्धक कार्य आहे. ती वय वाढण्याची पहिली लक्षणे प्रलंबित करते आणि कोरडी त्वचा आणि कॅरोटोसिसविरुद्धही संरक्षण देते.
  • उत्कृष्ट हेअर टॉनिक: अश्वगंधामुळे केसांना पोषण मिळते, ज्याने केसगळती टळते आणि अधिक लांब व सोनेरी केसास वाव मिळतो. एंटीऑक्सिडेंट म्हणून, ती वेळेपूर्वी केस पांढरे होणे आणि केस गळणे कमी करते
  • मेनोपॉझची लक्षणे कमी करते: अश्वगंधेचे टॉनिक आणि तणावरोधी गुणधर्म रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवते. त्याने तणाव, उत्कंठा कमी होते आणि हार्मोन समतोल वाढतो व रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून आराम मिळतो.
  • पुरुषांमधील वार्धक्यास वाव मिळतो: संशोधन अभ्यास अश्वगंधेचे वार्धक्यसमर्थक गुणधर्म दर्शवतात. न केवळ ती शुक्राणूसंख्या आणि टेस्टोश्टोरोन वाढवते, तर लैंगिक उत्तेजना आणि प्रदर्शनातही सुधार होतो.

शांत निद्रेसाठी अश्वगंधा - Ashwagandha for a restful sleep in Marathi

संशोधकांचा दावा आहे की, ते स्वतःमध्ये शक्तिशाली सेडटिव्ह नसले, तरी तणाव, उत्कंठा कमी करण्यात मदत करते आणि चांगली झोप शक्य करते.

पुरुषांसाठी अश्वगंधेचे फायदे - Ashwagandha benefits for men in Marathi

अश्वगंधा पुरुषांमधील वार्धक्य वाढवण्यात वापरले जाणारे प्रमुख औषध आहे. संशोधन दाखवतात की अश्वगंधेचे नियमित वापर न केवळ कामेच्छा, तर एकूण शुक्राणूसंख्या आणि टेस्टोस्टोरोन स्तर वाढवण्यातही प्रभावी आहे. अश्वगंधेचे पुनरुज्जीवक फायदे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यास वाव देण्यासही उपयोगी पडते, ज्याद्वारे लैंगिक प्रदर्शन वाढते.

महिलांसाठी अश्वगंधेचे फायदे - Ashwagandha benefits for women in Marathi

संशोधनांचा समज आहे की अश्वगंधा हार्मोनमध्ये समतोल राखणें आणि उत्कंठा, पोषण आणि तणाव यांसारखे रजोनिवृत्तीसंबंधी लक्षणे कमी करण्यास साहाय्य करते. एक टॉनिक म्हणून, अश्वगंधेचे उपभोग अनेक आहारसंबंधी कमतरतांना कमी करते आणि डाययुरेटिकच्या स्वरूपात शरिरातून विषारी पदार्थ बाहेर काढते. शरिरात विषारी पदार्थ जेवढे कमी असतील, तेवढे बेहतर तुमचे शारीरिक कार्य असतील. संशोधनांनी दाखवलेले आहे की अश्वगंधेचे महिलांमधील कामेच्छा वाढवण्यात उपयोगी प्रभाव असते. त्यासाठी ती शरिरातील रक्ताभिसरण वाढवते आणि तणाव कमी करते.

केसांसाठी अश्वगंधा - Ashwagandha for hair in Marathi

अश्वगंधेचे एंटीऑक्सिडेंट आणि पोषक प्रभाव तिला केसांसाठी एक उत्कृष्ट टॉनिक बनवते. अश्वगंधा केसांचे हेअर फॉलिकलना पोषण देऊन केसांना बळकट बनवते. अश्वगंधेचे नियमित वापर शरिरातील तणाव कमी करून केस गळणें कमी करते. तसेच, अश्वगंधेत उपस्थित एंटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल हानीविरुद्ध लढतात आणि केसांना आपले नैसर्गिक रंग सोडू देत नाही.

त्वचेसाठी अश्वगंधेचे फायदे - Ashwagandha benefits for skin in Marathi

स्वच्छ आणि सुपौल त्वचा असण्याची कोणाला इच्छा नसते? तुम्हाला माहीत आहे का की अश्वगंधा त्वचेच्या वयात अवेळी वाढ थांबवण्यात मदत करते? वय वाढण्याचे सर्वांत सामान्य कारण फ्री रॅडिकल आहेत, जे आपल्या शरिरात रोज होणार्र्या अनेक चयापचय कार्यांच्या परिणामस्वरूप होतात. अश्वगंधा, तिच्या एंटीऑक्सिडेंट गुणधर्मांद्वारे, या फ्री रॅडिकलना लढा देऊ शकते आणि तुमची त्वचा चकाकदार आणि  तरुण ठेवू शकते. तसेच, केरॅटॉसिस (एक त्वचेचे विकार) विरुद्धही ती वापरली जाऊ शकते, जे त्वचेला कोरडी आणि खरड बनवते. एक कप अश्वगंधा चहा रोज वापरल्यानेही केरॅटॉसिसची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

सापाच्या चावांमध्ये अश्वगंधा - Ashwagandha in snake bites in Marathi

अनेक अभ्यासांमध्ये, अश्वगंधा शरिरातील सापाच्या विषाचे एक नैसर्गिक निवारक मानले गेले आहे. त्याला ग्लायकोप्रोटीन (प्रथिनाचे स्वरूप) म्हटले जाते, जे ह्यालुरॉनिडेझचे पसार थांबवू शकते, जे सापाच्या विषाचे एक सक्रिय घटक आहे, जे जवळच्या तंतूंपर्यंत पसरण्यास मदत होते. अश्वगंधेचे टॉपिकल मिश्रण सापाच्या चावांविरुद्ध लढण्याची सामान्य  पद्धत म्हणून पारंपरिकरीत्या भारतात वापरले जात आहे.

एड्रेनल फॅटिगसाठी अश्वगंधा - Ashwagandha for adrenal fatigue in Marathi

तुम्ही नेहमी तणावग्रस्त आणि थकल्यासारखे वाटते का? त्याचे एड्रेनल फॅटिग एक कारण असू शकते. कधी ऐकले नाही ना? अधिकतर लोकांनी ऐकलेले नाही. पण हे आजकाळ व्यस्त आणि जलद गतीच्या जीवनशैलीमुळे खूप सामान्य झाले आहे, जे तणावपूर्ण आहे. कामातील तणाव किंवा काही इतर प्रकारचा तणाव असल्यास, शरिरावरील निरंतर दाबामुळे एड्रेनल ग्रंथी (मूत्रपिंडांवरील स्थित ग्रंथी) कॉर्टिझोल  नावाचे हार्मोन उत्सर्जित करते, ज्याला शरिराचे तणाव हार्मोनही म्हटले जाते. यामुळे थकवा, पचन समस्या, झोपेत व्यत्यय आणि तणाव यासारखी लक्षणे येतात. तुम्हाला माहीतच असेल की अश्वगंधा, एक तणावरोधी औषध आहे, ज्यामुळे शरिरातील कॉर्टिझोल स्तर कमी करून एड्रेनल फॅटिगला सामोरे जाण्यास मदत मिळते.

मज्जातंत्रीय रोगांसाठी अश्वगंधा - Ashwagandha for neurological diseases in Marathi

पार्किंसंस आणि एडीएचडीसारख्या रोगांचे प्रभाव हळू करण्यात अश्वगंधा उपयोगी असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या कार्याची वास्तविक पद्धत अस्पष्ट आहे.

निरोगी हृदयासाठी अश्वगंधा - Ashwagandha for a healthy heart in Marathi

अश्वगंधा शरिरातील ट्रायग्लेसराइड आणि कॉलेस्टरॉलचे प्रमाण कमी करते. हे वसा असतात जे आजच्या पिढीमधील हृदयरोग, स्ट्रोक आणि आर्टेरिअल ब्लॉकेज यांसारख्या हृदयजन्य समस्या कमी करते.

अश्वगंधेचे एडॅप्टोजेनिक गुणधर्म तणाव कमी करण्यात खूप उपयोगी असून, हे औषध स्नायू दाहशामक म्हणून ही कार्य करते. याप्रकारे, अश्वगंधा तुमच्या हृदयातील स्नायूंवरील ताण कमी करण्यासही एक प्रभावी पदार्थ आहे. काही संशोधकांचा दावा आहे की भारतातील प्रसिद्ध सायकलचालकांच्या समूहावर झालेल्या एक वैज्ञानिक संशोधनाने हॄदयश्वसन सहनशक्तीच्या सुधारामध्ये अश्वगंधेची क्षमता दाखवून दिली आहे, जी शारीरिक व्यायामादरम्यान रक्तात अधिक प्राणवायू पुरवण्याच्या हृदय व फुफ्फुसांची क्षमता आहे. रक्तात प्राणवायूचे उच्च स्तर अधिक वेळेसाठी आपल्याला सक्रिय राहण्यास मदत करते. अनेकांना यात आश्चर्य वाटू शकतो की अश्वगंधामध्ये आर्टरीमधील रक्ताचे थक्के जमण्यापासून टाळणारे थक्का जमण्याविरोधी गुणधर्म आहेत. म्हणून, हे औषध अधिकतर हृदयाच्या सामान्य समस्यांमध्ये साहाय्य करते, आणि त्याला एक उत्कृष्ट हृदयसुरक्षादाता बनवते (कार्डिओव्हॅस्कुलर प्रणालीला सुरक्षा देते).

 (पुढे वाचा: हृदयरोगाची कारणे आणि निवारण)

अश्वगंधा थायरॉयडचे कार्य वाढवते - Ashwagandha increases thyroid functions in Marathi

प्रमाणांती संशोधन सुचवते की अश्वगंधा शरिरातील टी४ हार्मोनचे स्तर वाढवते. हायपोथायरॉडिझ्मच्या (व्यक्तीचे थायरॉयड हार्मोन कमी असल्याची परिस्थिती) संभव उपचारात या औषधीची प्रभाविता शोधण्यासाठी पुढील संशोधन सुरू आहे.

लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी अश्वगंधा - Ashwagandha for improving sexual health in Marathi

पुरुषांमध्ये मनोवैज्ञानिक स्तंभनदोषाच्या (मनोवैज्ञानिक घटकांमुळे मुख्यत्त्वे पुरुषांमधील स्तंभन राखून ठेवण्यात अशक्यता) उपचारात आणि महिला व पुरुष दोघांमध्ये कामेच्छा सुधारण्यावर पर्याप्त प्रभाव होतो. हल्लीचे संशोधन सुचवते की नियमित अश्वगंधा घेतल्याने पुरुषांमधील शुक्राणूंसंख्या वाढू शकते.

अश्वगंधेमुळे जखम बरी होतात - Ashwagandha helps heal wounds in Marathi

आयुर्वेदाप्रमाणे, अश्वगंधा एक नैसर्गिक जखमरोधी पदार्थ म्हणून कार्य करते. पारंपरिकरीत्या, अश्वगंधेची पेस्ट प्रभावित त्वचेवर वापरली जाते. मधुमेह असलेल्या प्राणींच्या मॉडेल्सवर अश्वगंधेच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी भारतात गहन संशोधन झाले आहे. संशोधनाअंती निष्कर्ष मिळाले की जखम लवकर बरी होते आणि तोंडाद्वारे अश्वगंधा दिल्याने टॉपिकल दिल्यापेक्षा ते खूप प्रभावी होते. मानवी अभ्यासाच्या अभावाने, कोणतेही प्रकारचे जखम बरे करण्यासाठी अश्वगंधा वापरण्यापूर्वी डॉक्टराशी बोलणें बरे राहील.

शक्तिशाली प्रतीकार प्रणालीसाठी अश्वगंधा - Ashwagandha for a strong immune system in Marathi

“मैताके मशरूम सार” (आशिआमध्ये उपभोगले जाणारे एक खाद्य मशरूम) यासह अश्वगंधा घेतल्याने फॅगोसायटिक गतिविधी वाढवण्यात प्रभावी असे दिसून आले आहे (विदेशी पॅथॉजेन नष्ट करण्याची आमच्या शरिराची क्षमता). याने संक्रमणांना सामोरे जाण्याच्या शरिराच्या क्षमतेत सुधार होतो. पुढच्या वेळेस, तुम्हाला मोसमाचा त्रास झाल्यास थोडा अश्वगंधा चहा घ्या आणि व्यावसायिकासारखे थंडीला सामोरे जा.

 (पुढे वाचा: प्रतीकार वाढवणारे अन्न)

एंटीआर्थरायटिक म्हणून अश्वगंधा - Ashwagandha as an anti-arthritic in Marathi

तुम्हाला सुजलेल्या व त्रासदायक सांध्यांचा त्रास आहे का? संशोधन दाखवतात की अश्वगंधामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. संधिवाताच्या लक्षणांमध्ये आराम आणण्यात हे विशेष उपयोगी आहेत. आयुर्वेदामध्ये, संधिवात गटशी संबंधित असल्याचे आणि शरिरातील पाचनप्रणालीचे असंतुलन किंवा पित्त कमी करणारे असल्याचे सांगितले जाते. याप्रमाणें, अश्वगंधा पित्त वाढवून वात व कफ कमी करते. याने सांधेदुखींमध्येही आराम मिळतो. याखेरीज, दाहशामक प्रभावांमुळे त्वचेच्या समस्या उदा. एक्झेमा, सोरिअसिस आणि डॅंडफ्रसारख्या समस्यांमध्ये मदत मिळते.

मधुमेहासाठी अश्वगंधा - Ashwagandha for diabetes in Marathi

संशोधनांमुळे दिसून आले आहे की अश्वगंधा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इंसुलिन स्राव वाढल्याने रक्तशर्करा स्तर कमी करतो. त्याने न केवळ मधुमेहग्रस्त व्यक्तींसाठी रक्तशर्करा स्तर कमी होतो, तर ते निरोगी लोकांमध्येही रक्तशर्करा कमी करण्यास तत्सम प्रभावी म्हणून आढळून आले आहे. तथापी, दैनंदिन गतिविधीमध्ये अश्वगंधा वापरणें सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांसोबत तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

मानसिक आरोग्यासाठी अश्वगंधा - Ashwagandha for mental health in Marathi

अश्वगंधेचे अनेक फायदे आणि वापर आहेत, पण तिचे प्रमुख वापर तणावरोधी उपचारांमध्ये होते.

तिचे उत्कंठाशाम्क गुणधर्म चीनी आणि सायबेरिअन गिंसेंगसारखे आहेत. शास्त्रीय संशोधन दाखवते की अश्वगंधा लक्षणीयरीत्या उत्कंठा आणि तणावसंबंधी अवसाद कमी करते. हे मुख्यत्त्वे एडॉप्टोजेनिक आणि पोषक गुणधर्मांमुळे होते. तसेच, ऍडप्टोजॅनिक गुणधर्म अनेक तणावसंबंधी रोग उदा. प्रिमेच्युर एजिंग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह इ. टाळण्यात खूप सहायक आहे.

अश्वगंधाचा मुळा ऐतिहासिक काळापासून अनेक परिस्थिती उदा. निद्रानाश, गाठ, तपेदिक, दमा, ल्युकोडर्मा, ब्रॉंकायटिस, फायब्रोमॅल्गिआ आणि एड्रेनल फॅटिगसारख्या परिस्थितींसाठी वापरले जाते. तथापी, हे औषध सामान्यत्त्वे सामान्य टॉनिक म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधार करण्यासाठी वापरले जाते, ज्याला आयुर्वेदामध्ये रसायनही म्हटले जाते. काही संशोधकांनुसार, अश्वगंधा घेणें तुमच्या आरोग्यात सुधार करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींपैकी एक आहे, कारण त्याला पोषक टॉनिक म्हटले जाते, ज्यामुळे थेट तुमच्या बागेतून अनेक आरोग्य फायदे होतात.

अश्वगंधा पूड किंवा चहाच्या रूपात सर्वांत सामान्यपणें वापरले जाणारे औषध आहे. त्याला वापरासाठी दूध, तूप किंवा मधासोबत मिसळूनही वापरले जाऊ शकते. अश्वगंधा टिंक्चर (वनौषधीचे अल्कोहलिक सार) आणि कॅप्स्यूल या दिवशी अधिक प्रसिद्ध झाले आहेत, कारण ते घ्यायला आणि कामाला सोपे समजले जाते.

ते सिरप, टॉपिकल क्रीम आणि पेस्ट या रूपांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

सामान्य मात्रा आणि वापराचे निर्देश येथे दिले आहे. तथापी, तुमच्या आयुर्वेद डॉक्टराद्वारे विहित मात्रेचे पालन करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो आहे.

  • अश्वगंधेची सामान्य मात्रा म्हणजे प्रति कप चहा, दूध किंवा मध १-२ चहाचे चमचे किंवा दिवसातून दोनदा १-२ कॅप्स्यूल एवढे आहे.
  • अश्वगंधेचा मुळा, दूध, मध आणि अखरोट यांचे मिश्रण एक झोपेचे टॉनिक बनवण्यासाठी होऊ शकतो. याने तणाव व उत्कंठा कमी होते.
  • अश्वगंधेच्या पानांचे एक पेस्ट जखम आणि दाहावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
  • मधासोबत घेतल्यास, ते लैंगिक आरोग्यासाठी बरे असल्याचे सांगितले जाते.
  • अल्कोहल आणि अश्वगंधेच्या साराद्वारे एक टिंक्चर बनवले जाऊ शकते. ते रक्तासोबत सहज मिसळते आणि या औषधीच्या इतर स्वरूपांपेक्षा जलद परिणाम देते. अश्वगंधा टिंक्चरची मात्रा टिंक्चरची ताकद व व्यक्तीचे वय व लिंग यावर अवलंबून असेल. या औषधीचे टिंक्चर घेण्यापूर्वी वनस्पतीशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹546  ₹850  35% OFF
BUY NOW

अश्वगंधेच्या लाभकारी प्रभावांसह काही ज्ञात उपप्रभावही असतात. हे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • अश्वगंधेचे तापक प्रभाव तिला दीर्घकालिक वापरासाठी अयोग्य बनवतात, विशेषकरून त्यांसाठी ज्यांमध्ये नैसर्गिक दाहक शरीर रचना (पित्त) आहे. प्रलंबित वापराने गॅस्ट्रिक अल्सर, डायरिआ आणि उलटी होऊ शकते.
  • आपल्या आहारात अश्वगंधा घेण्यापूर्वी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ते आधीच सुरू असलेल्या औषधाच्या प्रभावांमध्ये भर देऊ शकते किंवा त्यात हस्तक्षेप करू शकते. उदा. रक्तशर्करा कमी करणार्र्या औषधांसह अश्वगंधा घेतल्याने रक्तातील शर्करा अजून कमी होऊ शकते (हायपोग्लायसेमिआ)
  • हे गरोदरपणादरम्यान विशेषकरून सुरक्षित समजले जात नाही, कारण अधिक मात्रांमध्ये दिल्याने त्याने मिस्कॅरिएज किंवा लवकर प्रसूती झाल्ल्याचे दिसून आले आहे.
  • अश्वगंधा ब्लड थिनर आणि एंटीकॉएगुलेंट आहे, म्हणून तिला शस्त्रक्रिया होण्याचे नियोजन असल्यास किंवा हल्लीच शस्त्रक्रिया करून घेतलेली असल्यास वापरू नये. रक्त पातळ करणार्र्या औषधांसोबत हे औषध वापरू नये, कारण यामुळे तुमचे रक्त अजून पातळ होईल, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे.
  • सौम्य सॅडॅटिव्ह असल्याने, त्याने सुंदी येऊ शकते. म्हणून तिला झोपेच्या गोळ्यांसोबत घेऊ नये, कारण त्याने अत्यधिक झोप येऊ शकते.
Dr. Harshaprabha Katole

Dr. Harshaprabha Katole

Ayurveda
7 Years of Experience

Dr. Dhruviben C.Patel

Dr. Dhruviben C.Patel

Ayurveda
4 Years of Experience

Dr Prashant Kumar

Dr Prashant Kumar

Ayurveda
2 Years of Experience

Dr Rudra Gosai

Dr Rudra Gosai

Ayurveda
1 Years of Experience


Medicines / Products that contain Ashwagandha

संदर्भ

  1. Wadhwa R, Singh R, Gao R, et al.Water Extract of Ashwagandha Leaves Has Anticancer Activity: Identification of an Active Component and Its Mechanism of Action
  2. Jessica M. Gannon, Paige E. Forrest, K. N. Roy Chengappa. Subtle changes in thyroid indices during a placebo-controlled study of an extract of Withania somnifera in persons with bipolar disorder. J Ayurveda Integr Med. 2014 Oct-Dec; 5(4): 241–245. PMID: 25624699
  3. Kumar G, Srivastava A, Sharma SK, Rao TD, Gupta YK. Efficacy & safety evaluation of Ayurvedic treatment (Ashwagandha powder & Sidh Makardhwaj) in rheumatoid arthritis patients: a pilot prospective study.. Indian J Med Res. 2015 Jan;141(1):100-6. PMID: 25857501
  4. Vaclav Vetvicka, Jana Vetvickova. Immune enhancing effects of WB365, a novel combination of Ashwagandha (Withania somnifera) and Maitake (Grifola frondosa) extracts. N Am J Med Sci. 2011 Jul; 3(7): 320–324. PMID: 22540105
  5. Taranjeet Kaur and Gurcharan Kaur. Withania somnifera as a potential candidate to ameliorate high fat diet-induced anxiety and neuroinflammation. J Neuroinflammation. 2017; 14: 201. PMID: 29025435
  6. Chandrasekhar K1, Kapoor J, Anishetty S. A prospective, randomized double-blind, placebo-controlled study of safety and efficacy of a high-concentration full-spectrum extract of ashwagandha root in reducing stress and anxiety in adults.. Indian J Psychol Med. 2012 Jul;34(3):255-62. PMID: 23439798
  7. Narendra Singh, Mohit Bhalla, Prashanti de Jager, Marilena Gilca. An Overview on Ashwagandha: A Rasayana (Rejuvenator) of Ayurveda . Afr J Tradit Complement Altern Med. 2011; 8(5 Suppl): 208–213. PMID: 22754076
  8. Vijay R. Ambiye et al. Clinical Evaluation of the Spermatogenic Activity of the Root Extract of Ashwagandha (Withania somnifera) in Oligospermic Males: A Pilot Study . Evidence-Based Complementary and Alternative Medicine Volume 2013, Article ID 571420, 6 pages
  9. Mahesh K. Kaushik et al. Triethylene glycol, an active component of Ashwagandha (Withania somnifera) leaves, is responsible for sleep induction . PLoS One. 2017; 12(2): e0172508. PMID: 28207892
Read on app