ओवा इजिप्तमधील एक मसाला आहे, पण आज भारतीय उपमहाद्वीपामधील ते सर्वांत सामान्य खाद्य घटक आहे. ओव्याच्या कडक चवीची तुलना खूप वेळा थाइमशी केली जाते. याचे कारण असे की या दोन्ही वनस्पतींमध्ये थायमॉल नावाचे रासायनिक घटक असते. या दोन्ही वनस्पतींची तुलना केल्यास, तुम्हाला आढळेल की ओव्याचे गंध थाइमपेक्षा खूप अधिक तीव्र असते. हेच नाही, यापैकी दोन्ही वनस्पतींची किचन कॅबिनॅट्समध्ये आपली जागा असते.

तुम्हाला आपल्या स्वतःच्या घरगुती उपाय करायला आवडत असल्यास, तुम्हाला आधीच माहीत असेल की ओवा न केवळ पाककलेतील आश्चर्य आहे, तर त्याचे खूप औषधजन्य गुणधर्मही आहेत. पारंपरिकरीत्या, ओवा गॅस, आम्लीयता आणि पोटातील कळांसाठी सर्वाधिक सामान्य अमाशय समस्यांसाठी एक सामान्य वनस्पती आहे. ओव्याचा पाणी एक प्रसिद्ध गॅलॅक्टोगॉग ( संगोपक मातांमध्ये दुधाची गळती सुधारणारेऑ असून वजन कमी करण्यासाठी एक खूप प्रसिद्ध उपाय आहे.

ओवा रोप एक वनस्पतीजन्य वार्षिक रोप आहे, ज्याचे अर्थ असे की त्याला दर वर्षी परत प्लांट केल्ले  पाहिजे. या रोपाची सामान्य औसत उंची जवळपास 60 ते 90 मीटर आहे. ओवा देठांमध्ये थरावर (समांतर रेषा) ग्रूव्ह्स असतात आणि ओव्याच्या पानांचा एक विशेष गंध असतो, ज्याला दुरावले जाऊ शकत नाही. लहान पांढरी ओवा फुले शाखांच्या टोकावर कळपात होतात.

ओवाचा बी रंगामध्ये हिरवेसर ते तपकिरी असतो आणि थरावर त्याचे स्पष्ट ग्रोव्ह्झ असतात.

तुम्हाला माहीत होते का?

काही लोकपरंपरांचा विश्वास आहे की सोबत ओवा ठेवल्याने तुम्हाला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चांगले नशिब मिळते.

ओवाबरोबर काही मूळभूत तथ्य:

  • वनस्पतिजन्य नांव: ट्रॅकिस्पर्मम एमि
  • कुटुंब: एपिएसे
  • सामान्य नांव: ओवा, कॅरम सिड्स
  • संस्कृत नांव: अजमोद, यामिनी
  • वापरले जाणारे भाग: बिया
  • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरण: ओवा इजिप्तमधील स्थानिक आहे, पण ते भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान, ईराक आण इराणमध्ये आढळते. भारतात, ओवा मुख्यत्त्वे मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र येथे पिकवला जातो
  • तासीर: गरम. 
  1. आरोग्यासाठी ओवाचे फायदे - Ajwain benefits for health in Marathi
  2. ओवा कसा वापरावा - How to use ajwain in Marathi
  3. दररोज किती ओवा घेतला जाऊ शकतो - How much ajwain can be taken per day in Marathi
  4. ओवाचे सहप्रभाव - Ajwain side effects in Marathi

पारंपरिक व लोकौषधीमध्ये ओव्याचे अनेक वापर असतात. दुर्दैवाने, माणसांसाठी उपचारक फायद्यांची गोष्ट आली, तेव्हा अजून त्याला वैज्ञानिकरीत्या पुष्टी केलेली नाही.

आयुर्वेदिक व लोक दाव्यांची पुष्टी करणारे अनेक वैद्यकीयपूर्व परीक्षण आजही आहेत. ओव्याबद्दल आम्ही काय जाणतो, ते थोडे पाहू या:

  • पोटासाठी ओवा: ओवाच्या बियांचा तुमच्या पोटावर आरामदायक प्रभाव असतो आणि याची निश्चिती अनेक पोटाच्या समस्या उदा. पोटदुखी, गॅस, पोटफुगी आणि अपचन यामध्ये झालेली आहे. आयुर्वेदाप्रमाणें, ओवाच्या बिया अतिसार आणि अपचनाच्या प्रबंधनामध्येही प्रभावी असतात, कारण ते पचनात्मक एंझायम्स गळतीमध्ये सुधारणा आणतात.
  • वजन कमी करणें आणि कॉलेस्टरॉल प्रबंधन यासाठी ओवा: प्रमुख पचनात्मक समस्यांमध्ये आराम देऊन, ओवाच्या बिया पाण्यासोबत वजन कमी करणें यामध्येही साहाय्य करतात.
  • महिलांसाठी ओवा: ओव्याचे महिलांसाठी अनेको फायदे असतात. त्याच्या एंटी-स्पाझ्मॉडिक प्रभावांमुळे मासिक वेदना आणि क्रॅंप्समध्ये आराम मिळतो. संगोपनादरम्यान, ओवा वापरल्याने पाजण्यासाठी दुधाच्या प्रवाह चांगले करण्यास मदत होते. पण, गरोदरपणादरम्यान हा वनस्पती वापरतांना काळजी घेतली पाहिजे, कारण त्याचे एबॉर्टिफॅशिएंट प्रभाव असतात.
  • सूक्ष्मजीवरोधी, एंटीऑक्सिडेंट आणि दाहशामक म्हणून ओवा: विविध प्रकारच्या सूक्ष्म जिवांविरुद्ध कार्य असल्याचे प्रमाण ओव्याने दिले आहे, ज्यामुळे ते पोटातील किड्यांच्या उपचारामध्ये उपयोगी असते. त्याच्या एंटीऑक्सिडेंट गुणधर्म तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट बनवतात, तर दाहशामक गुणधर्म संधिवात वेदना कमी करण्यास साहाय्य करतात.
  • श्वसनात्मक आरोग्यासाठी ओवा: ओवा बिया सामान्य पडसे, खोकला आणि दमा याच्या प्रबंधनामध्ये सहायक असतात.

खोकल्यासाठी ओवा - Ajwain for cough in Marathi

वैद्यकीयपूर्व अभ्यास सुचवतात की ओवा एक संभावित एंटीट्युसिव्ह (खोकल्यापासून आराम मिळवून देणारे) असते. पुढे सुचवले गेले की ओव्याचे एंटीट्युसिव्ह प्रभाव ओवा साराचे अधिक मात्रांमध्ये अधिक उठून दिसतो. तसेच, ओवा एक प्रभावी एंटीस्पाझ्मॉडिक असतो. म्हणून, घशाचे स्नायू सैल करण्याद्वारे खोकल्यात मदत होऊ शकते. पण, वैद्यकीय चाचणींच्या अभावे, खोकल्याचे उपाय म्हणून ओवा घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोललेले बरे.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

ओवामधील सूक्ष्मजीवरोधी गुणधर्म - Ajwain antimicrobial properties in Marathi

हल्लीच्या काळात, सूक्ष्मजीवरोधी उपचाराविरुद्ध प्राथमिक चिंता म्हणजे अधिकाधिक प्रतिजैविक-प्रतिरोधी सूक्ष्म जीव आहेत. तुम्ही वैज्ञानिक संशोधनांचे अनुसरण करत असल्यास, तुम्ही खूप सामान्य झालेली एमआरएसए, व्हीआरएसए आणी एमडीआर ट्युबरक्युलॉसिस ही नांवे ऐकली असतील. औषधांच्या चालू पिढीसाठी बेहतर पर्यायांची वाढती व तात्काळ गरज असतेच. प्राथमिक म्हणजे सूक्ष्मजीव प्रतिरोधाची दर थांबवते किंवा हळुवार करते. संशोधकांप्रमाणें, नैसर्गिक पदार्थ उदा. वनस्पती आणि मसाले या सूक्ष्मजिवांबरोबर उत्क्रांत झाल्याने त्यांच्याविरुद्ध शक्तिशाली प्रतिरोध निर्माण होणें महत्त्वाचे आहे. अभ्यास सुचवतात की ओवा बियांमधील थायमॉल आणि कार्वाक्रॉल याचे एक शक्तिशाली प्रतिजैविक क्षमता असते. प्रयोगशाळा आधारित अभ्यास दर्शवतात की ओवा एंपिसिलिन आणि लौह व तांब्यासारख्या खनिजांमध्ये लक्षणीय जिवाणूरोधी कार्य दाखवतो.

मासिक कळांसाठी ओवा - Ajwain for menstrual cramps in Marathi

मासिक कळा काही स्त्रियांसाठी त्रासदायक आणि  पुनरावर्ती परिस्थिती असते. तिचे वैशिष्ट्य म्हणजे मासिक चक्राच्या मासिक चरणापूर्वी किंवा दरम्यान पोटाच्या खालच्या भागातील वेदना. फायब्रॉयड्स आणि पीसीओएस यांसारख्या परिस्थिती समस्येचे मूळ कारण असले, तरी व्यायाम किंवा वैय्यक्तिक शरीररचनेच्या अभावामुळे मसल स्पॅस्म यांशी ते अधिक निगडीत आहे. वैद्यकीयपूर्व अभ्यास ओवा बियांना शक्तिशाली एंटीस्पास्मॉडिक लाभांशी अधिक जोडतात. म्हणजेच ओवा बिया घेतल्याने पोटाचा खालील भागातील मसल स्पॅझ्ममध्ये आराम मिळू शकतो आणि मासिक वेदना कमी होऊ शकते. या क्षेत्रात वैद्यकीय अभ्यास अजूनही चालू आहेत. म्हणून, मासिक धर्मादरम्यान ओवा बियांचे लाभ आणि मात्रा यांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी तपासून घेणें योग्य राहील.

कॉलेस्टरॉलसाठी ओवा - Ajwain for cholesterol in Marathi

अभ्यास सुचवतात की ओवा एक शक्तिशाली हायपोलिपिडेमिक ( शरिरातील कॉलेस्टरॉल कमी करणारे) असतो. प्राणिसंबंधी अभ्यासामध्ये, हे पाहण्यात आले की ओवा  बिया आणि मेथनॉलिक सार घेतल्याने कमी घनत्त्वाचे कॉलेस्टरॉल आणि शरिरातील इतर ट्रायग्लेसराइड्सचे स्तर कमी करते. कृती व मात्रेच्या वास्तविक यंत्रणांचा अभ्यास वैद्यकीय परिस्थितींमध्ये केलेले नाही. म्हणून, ओवा घेतांना आवरते घेतलेले बरे.

पोटातील किड्यांसाठी ओवा - Ajwain for stomach worms in Marathi

ओवा आजपर्यंत गॅस्ट्रोइंटेस्टिनल तंत्रासाठी किड्यांविरुद्ध सर्वश्रेष्ठ आयुर्वेदिक उपायांपैकी एक राहिले आहे. आयुर्वेदिक वैद्य पोटातील किड्यांवरील उपचारासाठी ओवा सत (ओव्याचा सार) सुचवतात. हे ही सुचवले गेले आहे की ओवा सत हूकवॉर्म संक्रमणांमध्ये विशेषकरून प्रभावी आहे.

आयुर्वेदाच्या या दाव्याच्या पुष्टीसाठी अनेक अभ्यास करण्यात आलेले आहेत आणि जवळपास सर्व प्रयोगशाळा अभ्यास ओवा बियांच्या एंटीथेल्मिंटिक गुणधर्मांची पुष्टी करतात. प्रयोगशाळा आधारित अभ्यासांचा दावा आहे की ओवा रिंगवॉर्म संक्रमणांविरुद्ध खूप प्रभावी आहे.

पुढील अभ्यासामध्ये, हे पाहण्यात आले की ओवा बिया त्यांच्या शरिरांमधील काही आंतरकोशिकीय संकेतांना स्थान देऊन पोटातील किड्यांना मारण्यात मदत करतात. तसेच, अभ्यासांचा दावा आहे की ओवा बिया उत्कृष्ट कॉलिनर्जिक असतात, ते आतड्यांतील पेरिस्टॅल्टिक परिचलन वाढवतात, ज्याने अमाशयामधून किडे लवकर आणि सहजरित्या बाहेर निघतात.

संधिवातासाठी ओवा - Ajwain for arthritis in Marathi

प्राणिसंबंधी अभ्यास सुचवतात क्की ओवा बियांच्या अल्कोहलिक आणि एक्विअस सारामध्ये शक्तिशाली दाहशामक प्रभाव असतात. संशोधकांनुसार, ऑक्सिडेटिव्ह तणाव रुमॅटॉयड आर्थरायटीसमधील झिजेसाठी कारणीभूत प्रमुख घटकांपैकी एक आहे. हे घटक लक्षात ठेवता, ओवाच्या एंटीऑक्सिडेंट गुणधर्मांचे परीक्षण संधिवाताच्या प्राणिसंबंधी मॉडेल्सवर करण्यात आलेले आहे आणि असे आढळले की ओवाच्या प्रबंधनामध्ये संधिवाताची लक्षणे कमी करण्यातील काही उपयोगी प्रभाव आहेत. तरीही, माणसांवरील सहप्रभावांच्या शक्यतेबद्दल अजून बरेच काही सांगितले जाऊ शकत नाही.

 (अधिक पहा: आर्थरायटीस लक्षणे)

ओवा एंटीऑक्सिडेंट क्षमता - Ajwain antioxidant potential in Marathi

अनेक संशोधकांनी ओवा बियांच्या एंटीऑक्सिडेंट क्षमतेची चाचणी केलेली आहे. आणि सर्व प्रयोगशाळा अभ्यास सुचवतात की ओव्यामध्ये खूप एंटीऑक्सिडेंट क्षमता आहे. इंटरनेशल जर्नल ऑफ ग्रीन फार्मसीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ओवा बियांपासून बनवलेले एसेंशिअल ऑयल खूप उत्कृष्ट एंटीऑक्सिडेंट आहे. जर्नल ऑफ फार्माकॉग्नॉसी एंड फायटोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित इतर अभ्यासाचे संकेत आहे की गारठलेल्या ओवा बियांमध्ये ताज्या ओवा बियांच्या तुळनेने खूप अधिक संभव एंटीऑक्सिडेंट गतिविधी असते. पुढे हे सुचवले गेले की या वनस्पतीच्या एंटीऑक्सिडेंट क्षमतेचे संबंध त्याच्या बियांमधील फॅनॉलिक्स घटकाशी थेट जोडले जाते.

एक ब्लड थिनर म्हणून ओवा - Ajwain as a blood thinner in Marathi

प्रयोगशाळा आणि प्राणिजनित अभ्यास सुचवतात की ओवा एक नैसर्गिक ब्लड थिनर आहे. प्राणिसंबंधी किंवा इन व्हायवो अभ्यासांनुसार, ओव्याच्या कृतीची यंत्रणा सर्वांत सामान्य एंटीकॉएग्लुएंट औषध, वारफेरिनला खूप जुळती आहे. पण, मानवी थक्का जमवणार्र्या घटकांवर ओवाच्या प्रभावांना अजूनही पूर्णपणें समजून घेतले गेलेले नाही. म्हणून, ओवाच्या या विशिष्ट लाभाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणें सर्वोत्तम आहे.

मुलांसाठी ओवा पाणी - Ajwain water for babies in Marathi

ओवा पाणी लहान मुलांमध्ये पोटातील गॅस आणि पडशाच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी एक प्रसिद्ध उपाय आहे. त्याला आयुर्वेदामध्ये एक ऊष्मादायक वनस्पती समजले जाते आणि प्राणिसंबंधी अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की गॅस आणि पोटफुगीपासून आराम मिळण्यात ओव्याची कार्यक्षमता लक्षणीय आहे. पण शिशू आणि लहान मुले यांच्यासाठी योग्य मात्रा ठरवण्याकरिता कोणतीही वैद्यकीय चाचणी उपलब्ध नव्हे. म्हणून, तुमच्या लहानग्याच्या हितामध्ये हेच आहे की, तुमच्या मुलासाठी ओवा पाणीची योग्य मात्रेबद्दल आयुर्वेदिक वैद्याला विचारले जावे.

केसांसाठी ओवा - Ajwan for hair in Marathi

आजकाळच्या व्यस्त व तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये, विशेष केस काळजीसाठी वेळ काढणें खूप कठिण आहे. कॉस्मेटिक आणि कंडिशनरमध्ये वापरले जाणारे रसायन चकाकदार दिसणारे केस देऊ शकतात, पण अधिकतम वेळा संक्रमण आणि डोक्याच्या कातडीच्या परिस्थितींसाठी ते महत्त्वाचे नाही. याच बरोबर, वाढते प्रदूषण आणि त्यामुळे सामान्य रोग व संक्रमण टाळणें जवळपास अशक्य बनते.

संशोधकांप्रमाणें, बुरशीजन्य केस आणि त्वचेचे संक्रमण खूप लवकर सामान्य बनत चालले आहेत, विशेषकरून उष्णकटिबंधाच्या ताप व आर्द्रतेमध्ये. त्याचबरोबर, औषधप्रतिरोधी सूक्ष्मजीव वाढल्याने, या सामान्य संक्रमणांचा सामना करणें खूप अवघड झाले आहे.

अभ्यास सुचवतात की ओवामध्ये एस्परगिलस आणि सामान्य त्वचा व केसातील बुरशी ट्रायकोफायटॉन रब्रमविरुद्ध शक्तिशाली बुरशीजन्य कार्य असतो. अशा एका अभ्यासामध्ये ओव्याला एक बुरशीरोधी औषधाबरोबर वापरले गेले आणि पाहिले गेले की या बुरशीच्या वाढीमध्ये कमालीची घट झाली होती.

हेच नाही, ओवा एक उत्कृष्ट एंटीऑक्सिडेंट असून, तुमचे केस अजून चकाकण्यास मदत करेल आणि अल्ट्रावायलेट विकिरणाद्वारे क्षतीला कमी धोका असेल.

थंडीसाठी ओवा - Ajwain for cold in Marathi

आयुर्वेदिक वैद्यांप्रमाणें, ओवा पित्ताला वाढवतो, म्हणजेच शरिरासाठी ऊर्जा आणि ऊष्मा देणारे असते. अशाप्रकारे ते पडशाच्या लक्षणांमध्ये आराम देण्यात मदत करतो. तरीही, ओव्याच्या लाभांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी बोललेले नेहमी बरे असते.

(अधिक वाचा: सामान्य पडशावरील उपचार)

दम्यासाठी ओवा - Ajwain for asthma in Marathi

ईराणमध्ये झालेल्या एक वैद्यकीय अभ्यासाप्रमाणें, ओवा एक कार्यक्षम ब्रॉंकोडायलेटरी आहे. या अभ्यासामध्ये, दमा रुग्णांच्या एका समूहाला आलटून पालटून दमाविरोधी औषध म्हणून ओव्याचे दोन भिन्न मात्रा दिल्या गेल्या. अजून एका समूहाला प्लॅसीबोवर ठेवण्यात आले. आवश्यक वेळेनंतर, हे नोंदवण्यात आले की ओव्याचे ब्रॉंकोडायलेटर कार्य व्यावसायिक औषधीप्रमाणेंच असते. म्हणून, ओव्याचे दम्याच्या लक्षणांविरुद्ध काही लाभ असल्याचे सुरक्षितपणें सांगितले जाऊ शकते. ओवा घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी तपासून घेणें नेहमीच चांगले असते.

संगोपक मातांसाठी ओवा - Ajwain for nursing mothers in Marathi

दुधाच्या ग्रंथींमधून दुधाच्या धारेस वाव देण्यासाठी ओव्याचे संगोपक मातांद्वारे पारंपरिक वापर केले जाते. राष्ट्रीय दूध उत्पादन संस्थानाद्वारे केलेल्या प्राणिसंबंधी अभ्यासांचा सकेत आहे की ओवा पाणी एक प्रभावी गॅलॅक्टोगॅग असतो. पुढे सुचवले गेले की ओव्यामध्ये काही फायटोएस्ट्रोजेन (वनस्पती-आधारित एस्ट्रोजेन) असतात, जे शरिरामध्ये एस्ट्रोजेनची प्रत तयार करतात. संगोपक मातांनी कोणत्याही स्वरूपात तुमच्या डॉक्टरांशी बोलण्याचा सल्ला दिला जातो.

गरोदरपणादरम्यान ओवा - Ajwain during pregnancy in Marathi

ओवा बियांना लोकौषधीमध्ये सर्वांत प्रचलित एबॉर्टिफॅशिएंट म्हणून गणले गेले आहे. भारतातील लोक आधारित अभ्यासामध्ये, जवळपास 155 स्त्रियांनी भ्रूणाचे स्खलन करण्याठी ओवा बिया वापरल्याचे मान्य केले आहे. तसेच, याची नोंद केली गेली आहे की या वनस्पतीमध्ये गर्भपातास चालना देण्यात 100% कार्यक्षमता नसली, तरी गरोदरपणादरम्यान जन्मजात दोषांचे कारण म्हणून ओव्याला पाहिले गेलेले आहे. प्राणिजनित मॉडल्स सुचवतात की भ्रूणासाठी ओवा बियांची विषाक्तता टेटॅरोजेनिक कार्यावर अवलंबून आहे.

वजन कमी करण्यासाठी ओवा - Ajwain for weight loss in Marathi

आयुर्वेदिक वैद्यांनुसार, ओवा योग्यरीत्या अन्न पचण्यास साहाय्य करून गॅस आणि पोटफुगीसारख्या पचनात्मक विकारांपासून आराम मिळवून देतो. एकूण, ओव्याच्या या तिन्ही गुणधर्मांमुळे तुम्हाला वजन कमी होण्यास साहाय्य मिळतो. पण, त्याने भूकही लागते. हे या मसालाच्या कोणत्याही वजन कमी करण्याच्या प्रभावांच्या थेट विरुद्ध आहे. प्राणिजनित अभ्यास सुचवतात की ओवा घेतल्याने शरिराचे वजन कमी करण्यात काही फायदा होतो. पण, मानवी अभ्यासांच्या अभावी, कोणत्याही स्वरूपात ओवा घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोलणें सर्वोत्तम असेल.

बद्धकोष्ठतेसाठी ओवा - Ajwain for constipation in Marathi

ओव्याच्या पचनसंबंधी गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करणारे विशेष अभ्यास झालेले नसले तरी, बद्धकोष्ठतेमधून आराम मिळण्यासाठी ते सर्वांत सोयीच्या उपायांपैकी एक आहे. काही प्रयोगशाळा आधारित अभ्यास सुचवतात की ओवा पचन प्रक्रिया सुधारतो आणि तसेच आपल्या गॅस्ट्रोएंटेस्टिनल ट्रॅक्टमार्फत अन्न जाण्याचा वेळ कमी करतो. हे दोन गुणधर्म ओव्याला बद्धकोष्ठतेसाठी एक खूप प्रिय उपाय बनवण्यासाठी जवाबदार असू शकतात. पण, ते नक्कीच बद्धकोष्ठतेत आराम मिळून देणारी म्हणून त्याच्या कार्यक्षमतेची पुष्टी करत नाही. बद्धकोष्ठतेसाठी ओव्याच्या संभाव्य उपयोगांबद्द्ल अजून जाणून घेण्यासाठी तुमच्या आयुर्वेदिक वैद्याशी बोललेले बरे.

अतिसारासाठी ओवा - Ajwain for diarrhea in Marathi

प्राण्यांमधील अभ्यास ओव्याच्या अल्कोहलिक साराच्या अतिसाररोधी गतिविधीचा सल्ला देतात. पुढे सुचवले गेल की या अतिसाररोधी गुणधर्माचे कारण जैवशास्त्रीय यौगिके उदा. सॅपॉनिन, फ्लॅव्हॅनॉयड, स्टॅरॉल आणि टॅनिन यांच्या उपस्थितीमुळे होऊ शकते. तथापी, वैद्यकीय अभ्यासांच्या अभावामध्ये, ओव्याचे अतिसाररोधी शक्यतेची पुष्टी करणें अवघड आहे.

पोटदुखीसाठी ओवा - Ajwain for stomach pain in Marathi

ओवा पोटदुखी आणि आकड्या यांसाठी सर्वांत सामान्यरीत्या वापरले जाणारे उपाय आहे. आयुर्वेदिक वैद्य पोटदुखीमध्ये आराम मिळण्यासाठी ओवा बिया आणि आल्याच्या मिश्रणाचा सल्ला देतात. हल्लीचे अभ्यास सुचवतात की ओवा कॅल्शिअम मार्गिका अडवणारे म्हणून कार्य करतो, ज्याने आकड्यांमध्ये लक्षणीय घट होते. तसेच, ओव्याच्या या गुणधर्मामुळे अतिसाराच्या लक्षणांमध्ये लाभ होत असल्याचा दावा केला जातो.

 (अधिक वाचा: पोटदुखी)

गॅससाठी ओवा - Ajwain for gas in Marathi

पारंपरिक आणि लोकौषधी ओव्याला एक गॅस आणि पोटफुगीविरुद्ध एक उत्कृष्ट उपाय म्हणून ओळखते. गॅसचे पारंपरिक पाकविधी 500 ग्रॅम ओवा बिया वजनाद्वारे 1:1:1 या अनुपातामध्ये रॉक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आणि टेबल सॉल्ट याचे 60ग्रॅम मिश्रण बनवल्याने होते. हा मिश्रण 1 चहाचा चमचा गरम पाण्याबरोबर घेतले जाऊन गॅस, उलटी आणि मळमळ याच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. आयुर्वेदिक वैद्यांप्रमाणें, ओवा अधिक सहजरीत्या मळ निःसारले जाऊन आतड्यांमधील वायूही कमी करते.

अपचनासाठी ओवा - Ajwain for digestion in Marathi

दोन विभिन्न इन व्हिव्हो (प्राणिजन्य) अभ्यासांनुसार, ओवा गॅस्ट्रिक एसिड गळती वाढवतो आणि पोट व आतड्यांमार्फत जेवणाच्या वाहतूक वेळ कमी करतो. तसेच, अशी माहिती आहे की ओवा घेतल्याने बाइल गळती आणि पचनात्मक एंझायम गळती वाढते. वैद्यकीय अभ्यासांच्या अभावामुळे, माणसांसाठी ओव्याची तत्सम कार्यक्षमतेची पुष्टी होते. वैद्यकीय अभ्यासांच्या अभावी, माणसांसाठी ओव्याच्या तत्सम कार्यक्षमता पुष्टी करणें कठिण आहे.

मसाला किंवा खाद्यघटक म्हणून विविध पाकविधांमध्ये ओवा बिया मुक्तपणें वापरले जातात. या मसाल्याच्या कोरड्या व भाजलेल्या प्रकारात जगभर त्याच्या तीव्र चवीसाठी वापरले जाते. तुम्हाला ओवा बियांचा क्रंच आवडत नसल्यास, तुम्ही ओवा पुडाने त्याल पर्याय  देऊ शकता.

तुमच्या आहारात ओवा जोडण्याची अजून एक पद्धत म्हणजे ओवा तेल आणि टूथपेस्ट व सुगंधी तेलासारखी इतर उत्पादने वापरणें. याशिवाय, ओवा बिया त्याच्या थोड्या कडू चवीसाठी विविध गोड पदार्थ उदा. बिस्किटे, ब्रेड आणि सूप्स वापरले जातात.

ओवा एसेंशिअल ऑयलमध्ये त्याच्या उपचारक लाभांद्वारे खूप किंमत असते.

हेच नाही, ओवा टॅब्लेट आणि कॅप्स्युलसुद्धा बाझारात व्यावसायिकरीत्या उपलब्ध असतात.

ओवा चहा कसा बनवावा

ओवा चहा म्हणजे सुक्या ओवा बियांपासून बनलेल्या सर्वांत सामान्य आरोग्यवर्धक पाककृती. घरी ओवा चहा बनवण्याची सोपी पद्धत आपण पाहून घेऊ:

  • एका कपात थोडे ओवा बिया घ्या.
  • एका पॅनमध्ये पाणी उकळा आणि ओवा बियांबरोबर कपमध्ये हे उकळलेले पाणी टाका.
  • ते 5 मिनिटे तसेच राहू द्या. तुम्हाला लक्षात येईल की पाणी सोनेरी तपकिरी अशा धुरसट छटा घेऊ लागतो.
  •  5-6 मिनिटांनंतर पाण्याची छाननी करा, जे यावर अवलंबून असेल की तुम्हाला तुमचा चहा किती कडक पाहिजे.
  • चहा घेण्यापूर्वी तुम्ही त्याला गरमागरम घेऊ शकता किंवा तसेच राहू देऊ शकता.

त्यामध्ये साखर न टाकणें हेच योग्य असेल. तुम्हाला चहा थोडे गोड करायचे असल्यास, तुम्ही त्यामध्ये मध टाकू शकता. जमेची बाजू म्हणजे मध टाकल्याने तुमच्या चहाला हेल्थ बूस्टसह जिवाणूरोधी व वजन कमी करण्याचे फायदे मिळतील.

आदर्शरीत्या, अधिक सहप्रभाव न होत 2 ग्रॅम ओवा बिया घेतल्या जाऊ शकतात. पण, त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी तुम्हाला ओवा घ्यायचा असल्यास, तुमच्या परिस्थितीसाठी योग्य मात्रा जाणून घेण्यासाठी डॉक्टराचा सल्ला घेणें सर्वोत्तम राहील.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹546  ₹850  35% OFF
BUY NOW
  • ओवा बिया एक ज्ञात एबोर्टिफिसेंट आहेत. म्हणून, गरोदर स्त्रियांनी हे वनस्पती कटाक्षाने टाळले पाहिजे.
  • आयुर्वेदाप्रमाणे, ओवाचे शरिरावर ऊष्मादायक प्रभाव असते. म्हणून, तुमची शरीररचना गरम असल्यास, ओवा वापरतांना नियंत्रण केलेले बरे.
  • शिशूंसाठी ओवाच्या योग्य मात्रेबद्दल बरेच काही माहीत नाही. म्हणून, तुमच्या मुलासाठी ओवाची योग्य मात्रा निर्धारित करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना विचारलेले उत्तम असेल.
  • अभ्यासांचा संकेत आहे की ओवा एक ब्लड थिनर आहे. तुमच्या शस्त्रक्रिया होणार असल्यास किंवा तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास, कोणत्याही रूपात ओवा न घेणेंच सर्वोत्तम राहील.
  • ओवाच्या बियांमध्ये प्रमुख रासायनिक घटक म्हणून थायमॉल असतो. थायमॉलमुळे काही लोकांमध्ये सौम्य त्वचेतील खाज होऊ शकते. तसेच, थायमॉल अधिक घेतल्याने काही लोकांमध्ये घेरी येणें, मळमळ आणि उलटी यासारख्या परिस्थिती असल्याचीही माहिती आहे. म्हणून, ओवा अधिक प्रमाणात न घेणेंच सर्वोत्तम राहील.

Medicines / Products that contain Ajwain

संदर्भ

  1. Ranjan Bairwa, R. S. Sodha, B. S. Rajawat. Trachyspermum ammi. Pharmacogn Rev. 2012 Jan-Jun; 6(11): 56–60. PMID: 22654405
  2. Boskabady MH, Jandaghi P, Kiani S, Hasanzadeh L. Antitussive effect of Carum copticum in guinea pigs. J Ethnopharmacol. 2005 Feb 10;97(1):79-82. Epub 2004 Dec 9. PMID: 15652279
  3. Boskabady MH, Alizadeh M, Jahanbin B. Bronchodilatory effect of Carum copticum in airways of asthmatic patients. Therapie. 2007 Jan-Feb;62(1):23-9. Epub 2007 Mar 21. PMID: 17374344
  4. Mohd Sajjad Ahmad Khan, Iqbal Ahmad, Swaranjit Singh Cameotra. Carum copticum and Thymus vulgaris oils inhibit virulence in Trichophyton rubrum and Aspergillus spp. Braz J Microbiol. 2014; 45(2): 523–531. PMID: 25242937
  5. Srivastava KC. Extract of a spice--omum (Trachyspermum ammi)-shows antiaggregatory effects and alters arachidonic acid metabolism in human platelets. Prostaglandins Leukot Essent Fatty Acids. 1988 Jul;33(1):1-6. PMID: 3141935
  6. Kostyukovsky M, Rafaeli A, Gileadi C, Demchenko N, Shaaya E. Activation of octopaminergic receptors by essential oil constituents isolated from aromatic plants: possible mode of action against insect pests.. Pest Manag Sci. 2002 Nov;58(11):1101-6. PMID: 12449528
  7. Tamura T, Iwamoto H. Thymol: a classical small-molecule compound that has a dual effect (potentiating and inhibitory) on myosin. Biochem Biophys Res Commun. 2004 Jun 4;318(3):786-91. PMID: 15144906
  8. Xu J, Zhou F, Ji BP, Pei RS, Xu N. The antibacterial mechanism of carvacrol and thymol against Escherichia coli. Lett Appl Microbiol. 2008 Sep;47(3):174-9. PMID: 19552781
  9. Marchese A. Antibacterial and antifungal activities of thymol: A brief review of the literature. Food Chem. 2016 Nov 1;210:402-14. PMID: 27211664
Read on app