कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या) - Cardiomyopathy in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 29, 2018

March 06, 2020

कार्डियोमायोपॅथी
कार्डियोमायोपॅथी

कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या) काय आहे?

कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या) हा हृदयाच्या स्नायूंचा विकार आहे ज्यात रक्ताचा प्रवाह शरीराच्या बाकीच्या भागात आणखी कठीण होत जातो. ज्यांना कार्डियोमायोपॅथी आहे ते काळजी आणि लक्ष देऊन सामान्य जीवन जगू शकत असले तरी काही प्रकरणांमध्ये हृदयघात होऊ शकतो. कार्डियोमायोपॅथीची काळजी, समस्येच्या प्रकारावर अवलंबून असते - डायलेटेड, हायपरट्रोफिक किंवा प्रतिबंधित.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हे दिसणे कठीण असू शकते पण शेवटी जी लक्षणे दिसून येतात, ती अशी

याची मुख्य कारण काय आहेत?

या प्रकरणात मुख्य कारण सत्यापित करणे कठिण आहे, आणि काही बाबतीत ते अनुवांशिक असू शकते. तरी काही कारणे खालील प्रमाणे असू शकतात:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

प्राथमिक निदानांमध्ये कौटुंबिक इतिहासासह मागील आजारांची नोंद आणी शारीरिक तपासणी समाविष्ट आहे. कारणं शोधून काढल्यानंतर, डॉक्टर हे सुचवू शकतात:

  • एक्स-रे.
  • हृदय आणि व्हॉल्वचे ठोके तपासणी करण्यासाठी ईसीजी (ECG).
  • लक्षणे जाणून घेण्यासाठी ट्रेडमील वर ताण चाचणी (स्ट्रेस टेस्ट).
  • रक्तवाहिन्या तपासण्यासाठी कॅथीटरायझेशन.
  • सर्व अवयवांचे कार्य माहित करण्यासाठी रक्त तपासणी.
  • जेनेटिक चाचणी.

उपचार कार्डियोमायोपॅथीच्या स्वरुपावर अवलंबून असतात.

  • औषधोपचार हे, रक्तदाब कमी करणे ,रक्त प्रवाह वाढवणे,हृदयाचा मंद दर आणि रक्ताचा क्लॉट बनणे टाळण्यासाठी दिले जाऊ शकतात.

इम्प्लांट केलेली उपकरणे

  1. हृदयतालाचे(हृदयाचे रिदम) परीक्षण करण्यासाठी आयसीडी (ICD) किंवा इंप्लान्टेबल कार्डियोव्हर्टर डिफिब्रिलेटर.
  2. रक्ताभिसरणामधे मदत करण्यासाठी व्हीएडी (VAD)किंवा व्हेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाइस.
  3. एरिथिमिया नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर.
  • हृदयाची भिंत पातळ करण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी किंवा खराब झालेला भाग कमी करण्यासाठी ज्यामुळे एरिथिमिया होतो, शस्त्रक्रिया करणे.
  • हृदयाच्या काही स्नायूंना काढून टाकण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुरळीतकरण्यासाठी, किंवा अति आवश्यक असल्यास, हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी सारख्या सर्जिकल प्रक्रिया.
  • जीवनशैलीत बदल करणे जसे वजन कमी करणे, व्यायाम करणे, सुधारित आहार घेणे, धूम्रपान सोडणे आणि मद्याचा वापर कमी करणे आणि,तणाव आणि झोपेचे व्यवस्थापन.



संदर्भ

  1. American Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: What Is Cardiomyopathy in Adults?
  2. National Heart, Lung and Blood Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Cardiomyopathy
  3. Sisakian H. Cardiomyopathies: Evolution of pathogenesis concepts and potential for new therapies. Published online 2014 Jun 26. PMID: 24976920
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Other Related Conditions - Cardiomyopathy
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cardiomyopathy

कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या) चे डॉक्टर

Dr. Farhan Shikoh Dr. Farhan Shikoh Cardiology
11 Years of Experience
Dr. Amit Singh Dr. Amit Singh Cardiology
10 Years of Experience
Dr. Shekar M G Dr. Shekar M G Cardiology
18 Years of Experience
Dr. Janardhana Reddy D Dr. Janardhana Reddy D Cardiology
20 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या) साठी औषधे

Medicines listed below are available for कार्डियोमायोपॅथी (स्‍नायूंमध्‍ये समस्‍या). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.