सारांश
सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे होते,कारण ही त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सामन्यतः,तोंडात किंवा तोंडावाटे अल्सर होणे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि अनेक कारणांमधे दुखापत, पौष्टिक आहाराची कमतरता आणि तोंडाची अस्वच्छता या कारणांमुळे हे होऊ शकते.वैद्यकीय चाचण्यांमध्ये याचे निदान करणे सोपे आहे आणि रक्त तपासणीची गरज नाही. तथापि, वारंवार होणाऱ्या तोंडातील फोडींच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते. सामान्यत: अल्सरचा उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतील. असे अनेक घरगुती उपाय आहेत,जे तोंडाच्या अल्सरला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तोंडाच्या अल्सरचा उपचार प्रामुख्याने जुना आहे आणि त्यात तोंड धुण्यासाठीचे प्रतिजंतुकीय द्रव्ये, पूरक व्हिटॅमिन बी कॉंप्लेक्स आणि स्थानिक वेदनाशामक जेलचा समावेश आहे. प्रतिबंधांमध्ये, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रचुर फॉलिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणें समाविष्ट आहे.