शस्त्रक्रिया
हर्निआच्या उपचारांवर शस्त्रक्रिया हा एक मुख्य उपचार आहे. यात हर्निआतील संचित पोटात ढकलतात किंवा पूर्ण पणे काढतात आणि फट शिवतात. एक जाळी (कृत्रिम किंवा प्राणिजन्य) वापरून, संचित किंवा साठवण पसरून गेलेल्या, कमजोर तंतूंना किंवा स्नायुंना आधार देतात.
शस्त्रक्रिया दोन प्रकारे करता येते: खुल्या किंवा पारंपारिक पद्धतीने आणि कमीत कमी चीर देऊन किंवा लेपरोस्कोपिक पद्धतीने. खुल्या शस्त्रक्रियेच्या प्रकारात, हर्निआ असले त्या ठिकाणी मोठा आणि लांब चीर देतात आणि क्षीण झालेल्या स्नायूंची दुरुस्ती करतात. लेपरोस्कोपिक किंवा कि-होल शस्त्रक्रियेत, पोटात अनेक छोटे छिद्र किंवा चीर करतात, आणि शल्यक्रिया छोट्या नळी सदृश उपकरणांच्या मदतीने पूर्ण करतात. सर्जनला मॉनीटरवर तपशील दिसावे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी कॅमेरा लावलेला असतो.
इंग्वीनल हर्निआ या प्रकारामध्ये हर्नियोटोमी, हर्नियरहेफी किंवा हर्निओप्लास्टी या मुख्य प्रक्रिया करतात. कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीवरून आणि सर्जनच्या सल्ल्यानुसार इतर शस्त्रक्रिया जसे कुंट्झकुन्त्झ शल्यक्रिया, अँड्रेव इम्ब्रीकेशन, किंवा मॅकव्हे किंवा नायहस रिपेअर, करून घेतात. भिन्न प्रकारचे हर्निआ हाताळता यावेत या करिता अनेक पद्धतीच्या शस्त्रक्रिया करतात.
हर्निआच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया ही एकच उपचारपद्धत आहे, असे काही नाही. आणि व्यक्तीच्या प्रकृतीच्या अडचणी नसल्यास, प्रकार कुठलाही असो, शस्त्रक्रिया करावीच लागते असेही नाही. वृद्ध आणि गंभीर आजार असणाऱ्यांमधे शस्त्रक्रिया टाळतात.
औषधोपचार
कधीकधी, तुमचे डॉक्टर हॅटल प्रकारच्या हर्निआमधे, पोटातील आम्ल कमी करण्यासाठी दुकानात न मिळणारी व इतर औषधे निर्धारित करतात. या औषधांनी तुम्ही इतर लक्षणे आणि अस्वस्थता कमी झाल्याचे अनुभवाल. यात काही वेदनाशामक औषधी, एच-२ रिसेप्टर ब्लॉकर जी हेस्टामैन विरोधात काम करतात, एंटासिड, आणि प्रोटोन पंप इनहीबीटर (औषधे जी पोटातील आम्ल कमी करतात).
जीवनशैली व्यवस्थापन
आहारातील बदलांनी हॅटल हर्निआ रोगातील बरीच शी लक्षणे कमी होतात परंतु हर्निआ आजार समूळ बरा होत नाही. गुणवत्तेत आणि मापात अधिक असलेले अन्न टाळा. व्यक्तीने जेवण होताच आडवे होणे आणि भारी शारीरिक क्रिया टाळाव्यात. हॅटल प्रकारच्या हर्निआच्या रुग्णांनी आम्लाच्या ओहोटीची समस्या टाळण्यासाठी तिखट आणि आंबट असलेले पदार्थ, जे अम्लांची ओहोटी सुरु करतात, टाळावे. लक्षणे असे पर्यंत धूम्रपान टाळावे. शरीराचे वजन कमी ठेवावे आणि उंचीनुसार साधारण श्रेणीचे ठेवावे.
हर्निआ झालेल्या भागातील स्नायूंना बळकटी येण्यासाठी व्यायाम करावा ज्याने लक्षणे कमी होण्यास मदत होते. तरीही, अधिक व्यायाम केल्याने व तज्ञांच्या मार्गदर्शनात व्यायाम न केल्याने लक्षणे वाढीस लागून परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे फिजिओथेरपिस्ट याला भेटा आणि त्यांच्या देखरेखीखाली पुढे व्यायाम करा.
सगळ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनेही लक्षणे जात नसल्यास, हर्निआ बरा करण्यास शस्त्रक्रिया करवून घ्यावी.