ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्म काय आहे?
ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्म (जीबीएम) हा एक असाध्य (कर्करोग) रोग,जो आक्रमक (वेगाने- वाढणारा) मेंदूचा आणि मेरुदंडाचा ट्यूमर आहे. या प्रकारचा ट्यूमर ग्लियल टिशुंपासून तयार होतो. हा एक प्रकारचा कनेक्टिंग टिशू आहे जो मेंदू आणि मेरुदंडात आढळतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जसजसा ट्युमर वाढतो, हा मज्जासंस्थेच्या कार्य प्रणालीवर घातक परिणाम करतो. ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मची लक्षणे खलील प्रमाणे आहेत:
- घटना लक्षात ठेवण्यात किंवा त्यांना पुन्हा आठवण्यात अडचण. (अधिक वाचा: स्मृतीभ्रंशाची कारणे)
- भावनिक अस्थिरता.
- अनैच्छिक हालचाली.
- दिसण्यात त्रास.
- ऐकण्यात समस्या.
- बोलण्यात अडथळा.
- फीट.
- वारंवार मूड बदलणे.
- मळमळ आणि उलट्या.
- वारंवार आणि तीव्र डोकेदुखी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मचे मूळ कारण अजून ही माहीत नाही आहे. तरीही, जीबीएम वर परिणाम करणारे मूळ कारण शोधण्यासाठी विविध घटक जसे की वातावरण,अनुवंशिकता, आणि व्यावसायिक जोखीम याचा अभ्यास केला जात आहे.
याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?
निदानाची सुरुवात शारीरिक तपासणी करून लक्षणं तपासून केली जाते. डॉक्टर संपूर्ण कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती करून घेऊ शकतात..
पुढील परीक्षण करण्यासाठी न्यूरॉलॉजिकल तपासण्या केल्या जाऊ शकतात:
- प्रतिक्रिया.
- समन्वय.
- वेदना प्रतिसाद.
- स्नायू शक्ती.
लक्षणांच्या सुरुवातीच्या तपासण्यांनंतर, मेंदूच्या प्रतिमा मिळविण्यासाठी आणि सूज किंवा असामान्य वाढीच्या कोणत्याही चिन्हांचा शोध घेण्यासाठी डॉक्टर मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय-MRI), कम्प्युटराईज टोमोग्राफी (सीटी-CT) आणि पॉझिट्रॉन इमीशन टोमोग्राफी (पीईटी-PET) स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्या देखील करू शकतात.
ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मचे निदान निश्चित करण्यासाठी बायोप्सी (मेंदूच्या टिशुंचे परीक्षण) केली जाऊ शकते.
या क्षणी ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मसाठी कोणतेही उपचार उपलब्ध नाही आहेत. लक्षणांची गंभीरता कमी करणे आणि रुग्णांची जगण्याची क्षमता वाढविणे हे लक्ष आहे.
3 उपचार पद्धती उपलब्ध आहेत, त्या पुढील प्रमाणे आहेत:
- रेडिएशन थेरेपी: ट्यूमर पेशी नष्ट करण्यासाठी आणि आसपासच्या टिशुंचे नुकसान टाळण्यासाठी रेडिएशन थेरेपीचा वापर केला जातो. हे उपचार ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात
- केमोथेरेपी: केमोथेरेपीमध्ये औषधं वापरली जातात जे कर्करोग वाढविण्यापासून प्रतिबंधित करतात. ही औषधे तोंडी किंवा इंजेक्शन्स द्वारे दिले जाऊ शकतात. केमोथेरेपी औषधे मळमळ आणि उलट्यासारखे दुष्परिणाम निर्माण करू शकतात.
- शस्त्रक्रिया: यात मेंदूतील कर्करोगाचे टिशू काढून टाकणे समाविष्ट आहे आणि हे केमोथेरेपी आणि रेडिएशन थेरेपीच्या संयोगाने केले जाऊ शकते.