ऑलिव्ह तेल आणि पोषण
ऑलिव्ह तेल भूमध्य पाककलेचे एक अविभाज्य भाग असले, तरी वैश्विक स्तरावर प्रत्येक आरोग्य जागरूक व्यक्तीच्या स्वयंपाकघराचे पटकन प्रिय बनले आहे. शहरी स्वयंपाकात त्याला “ट्रेंड” किंवा “नवीन वस्तू” म्हणून हिणवले जात असले, तरी माझा विश्वास करत असाल तर असे काही नाही. ऑलिव्ह आणि ऑलिव्ह तेलाचे खूप लांबलचक आणि रुचिकर इतिहास आहे.
तुम्हाला इतिहास किंवा खेळाची आवड असली तर, तुम्ही निश्चितपणें ऑलंपिक खेळाबद्दल ऐकले असेल. तुम्हाला माहीत होते का की ऑलिव्हचे स्मृतिचिन्ह प्राचीन ग्रीक खेळांच्या विजेत्यांना दिले जात होते? हो, हे दस्तऐवजात असून ते सत्य आहे, पण आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ऑलिव्हचे एखाद्या प्रतीकात्मक पदकाशी काय बरे संबंध असू शकते? तुम्हाला जाणून घेण्यास आवडेल की ग्रीक धर्मशास्त्रामध्ये ऑलिव्हच्या झाडाला देवी “एथेना”कडून मिळालेले एक उपहार समजले जात होते. एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत नसल्यास, एथेना बुद्धि आणि साहसाची देवी आहे. एथेनाच्या नांवावर एथेंस शहर बसवले गेले होते. नैसर्गिकरीत्या, ऑलिव्हचे झाड आणि शाखा यांना उच्चतम स्थान दिले गेले आहे. वास्तविक पाहता, ग्रीक अजूनही ऑलिव्हला समॄद्धीचे चिन्ह समजतात. 2004 उन्हाळी ऑलंपिक्समधील विजेत्यांना ऑलिव्ह शाखांचे स्मृतिचिन्ह मिळाले होते.
ऑलिव्ह तेलाला औषधशास्त्राचे जनक हिपोक्रेट्स द्वारे “महान उपचारकर्ता” असे म्हटले गेले आहे. म्हणून, हे सांगण्यात काही गैर नाही की ऑलिव्ह खूप वेळ त्याच्या औषधशास्त्रीय आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी विख्यात होते.
इतिहासकारांप्रमाणें, ऑलिव्ह झाडाच्या शेतीचे सर्वांत जुने अभिलेख जवळपास 7000 वर्ष जुने आहे. ऑलिव्ह झाडाचे यूनानमध्ये मिळालेले पुरातत्त्वीय नमुने 3000 वर्ष एवढे जुने आहेत. ऑलिव्हचे औषधशास्त्रीय आणि उपचारात्मक फायद्यांना प्राचीन ग्रीक साहित्यामध्ये स्थान दिले गेले आहे. हेच नाही, तर प्राचीन ग्रीक लेखक होमर यांनी ऑलिव्ह तेलासाठी “तरळ सोने” ही संज्ञा वापरली होती.
तुम्ही हे जाणून चकित व्हाल की केवळ ग्रीकांनीच त्यांच्या तरळ सोन्याला नावाजले आणि सुरक्षित ठेवले नव्हते. कुरानमध्येही ऑलिव्हच्या फळाला एक कृपांकित फळ मानले आहे आणि या फळाचे दाखले बायबलच्या जुन्या करारातही सापडतात. इजिप्शिअम ऑलिव्हच्या पानांना ममीकरण पद्धतींमध्ये वापरत होते. आज, हे आश्चर्य जगातील जवळपास प्रत्येक प्रमुख देशात पोचले आहे आणि शाकाहारी खाद्य तेल, सूर्यफूल तेल आणि अन्य सॅच्युरेटेड तेलांना एक निरोगी पर्याय म्हणून त्याची गणती होते.