व्हेरिकोसेल - Varicocele in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

May 02, 2019

March 06, 2020

व्हेरिकोसेल
व्हेरिकोसेल

व्हेरिकोसेल काय आहे?

शिरेतील सुजेला प्रतानाकार (नीला) जालिका - शुक्राणुच्या रज्जूसह (जो एखाद्या पुरुषाच्या अंडकोषात एक रज्जू असतो) व्हेरिकोसेल म्हणतात. 100 पुरुषांमध्ये 10 ते 15 पुरुषांना आढळणारा एक विकार आहे जो पायातील व्हेरिकोज रक्‍तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींमुळे होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

व्हेरिकोसेलचे सर्वसाधारणपणे आढळणारी चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत :

  • अस्वस्थता.
  • मंद वेदना.
  • पुरुषाच्या अंडाशयातील नसा प्रसरण होऊ शकतात किंवा त्यांना पीळ पडू शकतो.  
  • दुखत नसलेल्या अंडाशयातील गाठी.
  • अंडकोष फुगणे किंवा त्याला सूज येणे.
  • नपुंसकत्व.
  • शुक्राणूंची संख्या कमी होणे.
  • क्वचित - कोणतीही लक्षणे आढळत नाहीत.

याची मुख्य कारणं काय आहेत?

शिरेच्या आत व्हॉल्व्हचे नुकसान झाल्यामुळे शुक्राणू रज्जूत योग्य रक्तप्रवाह नसतो यामुळे मुख्यतः व्हेरिकोसेल होतो, ज्यामुळे नसेला सूज येऊन त्याचे प्रसरण होते. किडनीतील ट्यूमरसारख्या विकारामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो.

याचे निदान कसे केले जातात?

डॉक्टर लक्षणांच्या संपूर्ण इतिहासाची चौकशी करतील आणि मांडीच्या भागाची संपूर्ण तपासणी करतील ज्यामध्ये अंडकोष आणि अंडाशय समाविष्ट असतील. पुरुषाच्या अंडाशयातील नसांना पीळ आहे का याची तपासणी केली जाईल. लेटून असल्यास, हे दृश्यमान नसू शकते. तसेच, अंडाशयाच्या प्रत्येक बाजूचा आकार वेगळे असतो जो परीक्षणादरम्यान विचारात घेतला जातो.

डॉक्टर व्हलसल्व्हा मॅन्युव्हर करतील, ज्यामध्ये तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास सांगितले जाईल आणि डॉक्टरांना अंडकोष जाणवत नाही तोपर्यंत श्वास रोखण्यास सांगितील.

डॉक्टर नंतर अंडकोष, अंडाशय आणि किडनीच्या अल्ट्रासाऊंडचा सल्ला देऊ शकतात.

व्हेरिकोसेलचा त्रास, प्रजननक्षमतेत समस्या आणि दोन्ही अंडाशयात असणारा वाढीचा फरक (उजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा कमी वाढते) यासारख्या समस्या असल्याशिवाय त्यावर उपचार केले जात नाहीत.

  • अस्वस्थता दूर करण्यासाठी जॉकस्ट्रॅप किंवा आरामदायक अंडरवेअरचा वापर करावा.
  • व्हेरिकोसेलक्टॉमी एक व्हेरिकोसेलचा त्रास दूर करण्यासाठीची शस्त्रक्रिया आहे.
  • व्हिरिकोसेल एम्बोलायझेशन ही एक वैकल्पिक शस्त्रक्रिया आहे.
  • परक्यूटेनीयस एम्बोलायझेशन.
  • सूज आणि वेदना कमी करण्यासाठी केवळ पेनकिलर्स/वेदनाशामक  (एसिटामिनोफेन, आयबप्रोफेन) दिले जाऊ शकतात.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Varicocele
  2. Urology Care Foundation [Internet]. American Urological Association; What are Varicoceles?
  3. Peter Chan et al. Management options of varicoceles . Indian J Urol. 2011 Jan-Mar; 27(1): 65–73. PMID: 21716892
  4. Leslie SW, Siref LE. Varicocele. [Updated 2019 May 2]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Testicle injuries and conditions

व्हेरिकोसेल साठी औषधे

Medicines listed below are available for व्हेरिकोसेल. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹5400.0

Showing 1 to 0 of 1 entries