मांडी दुखणे - Thigh Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

May 03, 2019

July 31, 2020

मांडी दुखणे
मांडी दुखणे

मांडी दुखणे म्हणजे काय?

मांडी दुखी हळूहळू वाढू शकते किंवा अधूनमधून दुखापत झाल्यामुळे होते किंवा मांडीच्या आजारामुळे वाढू शकते. सामान्यतः, वेदना काही वेदनाशामक औषधे घेऊन काही आठवड्यातच कमी होते. फुटबॉल, सॉकर, बास्केटबॉल, लांब उडी, जंपिंग हर्डल्स आणि यासारख्या इतर शारीरिक क्रियाकलापांमध्ये नियमितपणे सहभागी होणाऱ्या लोकांना मांडी दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मांडीचे दुखण्याशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत :

याची मुख्य कारणं काय आहेत?

ही मांडीचे दुखण्याची मुख्य कारणे आहेत :

  • स्नायूवर ताण.
  • रक्त वाहिन्यांमध्ये गाठी.
  • घट्ट कपडे.
  • स्नायूंना दुखापत.
  • अतिवापरामुळे दुखापत.
  • झटका लागणे किंवा पडणे.
  • आघात होऊन फ्रॅक्चर.
  • ऑस्टियोआर्थराइटिस.
  • गर्भधारणा.
  • लठ्ठ किंवा वजन जास्त असणे.
  • इलियोटिबियल बँड फ्रिक्शन सिंड्रोम.
  • एकाच प्रकारचा व्यायाम करणे उदाहरणार्थ, धावणे आणि सायकल चालवणे.
  • डीप व्हेन थ्रॉम्बोसिस.
  • मधुमेह न्यूरोपॅथी (अनियंत्रित रक्तातील साखरेच्या पातळीमुळे बधिरता आणि वेदना होऊ शकतात).
  • खेळतांना झालेली दुखापत.
  • ह्रमेटॉइड संधिवात.
  • मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर.
  • ऑस्टियोपोरोसिस.
  • मांडीच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी.  
  • मेरलगिया पॅरेस्टेटीका (यामुळे मांड्यांमध्ये भाजल्यासारख्या वेदना होतात).
  • बैठक काम असलेली जीवनशैली.
  • कमकुवत हाडे.
  • सोडियम, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सारख्या पोषक घटकांची कमतरता.
  • स्ट्रोक.
  • एका पायात दुखापत झाल्याने दुसऱ्या पायात पसरलेल्या वेदना.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

खालील पद्धतींचा वापर करुन मांडी दुखण्याचे निदान केले जाते:

डॉक्टर आधी लक्षणं तपासतात आणि मांडीच्या दुखण्याचे कारण शोधण्यासाठी रुग्णाचा वैद्यकीय इतिहासाची चौकशी करतात. नंतर डॉक्टर खरचटलेली जागा, जखम, सूज किंवा अल्वारपणासाठी मांडीचे परीक्षण करतात. हाडांना दुखापत झाली की नाही हे तपासण्यासाठी एक्स-रे किंवा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मांडीच्या हालचालीची गती आणि ढब देखील तपासले जातात.

उपचार मूळ कारणांनुसार बदलतात. काही सामान्य उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत:

  • दुखणू आणि सूज कमी करण्यासाठी विश्रांती, बर्फ, कम्प्रेशन आणि एलिव्हेशन (RICE) पद्धत.
  • वेदना शामक औषध - मौखिक, स्थानिक किंवा इंजेक्शन.
  • तणावाचे व्यायाम.
  • वजन व्यवस्थापन.
  • सशक्तीकरणासाठी व्यायाम.
  • उष्णता.



संदर्भ

  1. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Muscle Strains in the Thigh.
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Leg pain.
  3. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Burning Thigh Pain (Meralgia Paresthetica).
  4. National Health Information Service [Internet]. Government of Scotland; Thigh problems.
  5. Healthdirect Australia. Leg pain. Australian government: Department of Health

मांडी दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for मांडी दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.