फलोट टेट्रॅलॉजी काय आहे?
फलोट टेट्रॅलॉजी हा जन्मतः हृदयातील चार दोषांचे मिश्रण आहे, ज्यामुळे संपूर्ण शरीरात वाहणाऱ्या रक्तात ऑक्सिजन कमी प्रमाणात आढळते. चार दोष असल्यामुळे या विकारात खालील परिणाम दिसून येतात:
- व्हेट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी), असा विकार आहे ज्यामध्ये उजव्या आणि डाव्या व्हेंट्रिकल्स (हृदयाच्या कक्षे) च्या संयोगात दोष आढळतो.
- उजवे व्हेंट्रिकल जाड होणे.
- हृदयापासून फुफ्फुसापर्यंत रक्त प्रवाहात अडथळे.
- आओरटाची अयोग्य जागा (शरीरातील मुख्य धमनी).
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फलोट टेट्रॅलॉजीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये मुख्य लक्षण म्हणजे त्वचेचा निस्तेज रंग हे आहे. या विकाराचे इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- जोडलेली बोटं.
- वारंवार अचानकपणे येणारी भोवळ.
- त्वचा अचानकपणे निळसर होणे.
- थोड्या हालचाली केल्यासही थकवा जाणवणे.
- अशक्तपणा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फलोट टेट्रॅलॉजी विकाराचे अचूक कारण ज्ञात नाही, पण खाली दिलेल्या कारणांमुळे हा विकार होऊ शकतो.
- पालकांनी निकृष्ट आहार घेतल्यामुळे मुल जन्मतःच या हृदयविकाराने ग्रस्त असू शकते.
- फलोट टेट्रॅलॉजीचे एक कारण मधुमेह देखील आहे.
- डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांना हा विकार होण्याची दाट शक्यता असते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
नियमित अल्ट्रासाऊंडद्वारे अर्भकाचे अनियमित ठोके जाणून घेऊन फलोट टेट्रॅलॉजीचे निदान केले जाऊ शकते. जन्माच्या वेळी, नवजात अर्भकाची त्वचा निळसर दिसल्यास डॉक्टर त्वचेची तपासणी करू शकतात. सामान्यपणे या विकाराची पुष्टी करण्यासाठी खालील तपासण्या करण्यास सांगितले जाते:
- हृदयाचा एमआरआय.
- छातीचा एक्स-रे.
- हृदयाची रचना किंवा क्रिया यात कोणत्याही असामान्यता शोधण्यासाठी इकोकार्डियोग्राम.
या विकाराचा एकमात्र उपचार म्हणजे दोषांची दुरुस्ती करण्यासाठी हृदयाची शस्त्रक्रिया करणे. जर नवजात शिशु खूप अशक्त असेल तर बाळाला थोडे सशक्त होण्यासाठी आणि संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी तयार होण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती केली जाऊ शकते. शस्त्रक्रिया सामान्यतः बालपणातच केली जाते, कारण यावर वेळेवर उपचार न केल्यास हृदयाचे अनियमित ठोके, झटके आणि मुलाचा विकास मंदावणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.