टेस्टिक्युलर सूज म्हणजे काय?
टेस्टीज हे स्क्रोटम नावाच्या त्वचेच्या पिशवीत सुरक्षित असलेले नराचे लिंग अवयव आहेत. त्यांचे मुख्य कार्य शुक्राणुंचे उत्पादन आणि हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार करणे हे आहे. टेस्टिक्युलर सूज एक अतिशय वेदनादायक आजार आहे. प्रत्यक्ष दुखापत, संसर्ग किंवा टेस्टीजला पीळ यासारख्या विविध कारणामुळे हा उद्भवू शकतो. टेस्टिक्युलर सुजेकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टेस्टिक्युलर सूज म्हणजे स्क्रोटममध्ये अवजडपणासह मोठ्या प्रमाणात वेदना होणे. मांडीच्या सांध्यातील भागात खाली खेचले जाण्याच्या भावनेसह या भागात लाली आणि जडत्व जाणवते. काही पुरुषांना त्यांच्या वीर्यात रक्त जात असल्याचा देखील अनुभव येतो. संसर्ग असल्यास ताप, लघवीकरताना वेदना होणे आणि अस्वस्थ वाटणे ही जळजळीसह दिसून येणारी लक्षणं आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अनेक कारणांमुळे टेस्टिक्युलर सूज येऊ शकते. त्यापैकी काही सामान्य कारणं खालीलप्रमाणे आहेत
- थेट दुखापत.
- लैंगिक संक्रमित रोगामुळे बॅक्टेरिअल संसर्ग.
- ऑर्कायटीस जो टेस्टीजचा दाह आहे.
- एपीडिडायमिटिस (ही टेस्टीजपासून वीर्य वाहून नेणाऱ्या नलिकेची सूज आहे).
- व्हायरल संसंर्ग (सामान्यपणे गालगुंड च्या व्हायरसमुळे).
- टेस्टिक्युलर टोरसियन (टेस्टीजमधील वेदनादायक पीळ).
- टेस्टिक्युलर कॅन्सर.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वैद्यकीय इतिहास आणि त्या क्षेत्राचे पूर्णपणे परीक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या शारीरिक तपासणीवर आधारित निदान केले जाते. प्रोस्टेटलादेखील दुखापत आहे का याची तपासणी करण्यासाठी डॉक्टर रेक्टल परिक्षण करु शकतात. या व्यतिरिक्त, संसर्ग तपासण्यासाठी रक्ताची आणि मूत्राची चाचणी केली जाते. अल्ट्रासाऊंड किंवा कलर डॉप्लर परीक्षण सूज आणि संभाव्य कारणांचे अचूक स्वरूप निश्चित करण्यात मदत करते.
उपचार सुजेच्या मूलभूत कारणानुसार बदलतात. बॅक्टेरिअल संसर्ग झाल्यास, 10-14 दिवसांसाठी अँटीबायोटिकचा कोर्स निर्धारित केला जातो. अँटी-इनफ्लेमेटरी औषधोपचारांसह वेदना व्यवस्थापन औषधे आवश्यक आहेत. ताप असल्यास, अँटीपायरेटिक घेण्याचा सल्ला दिला जातो. लैंगिकदृष्ट्या सक्रिय पुरुषांना कंडोम घालण्याची किंवा लक्षणं मुक्त होईपर्यंत लैंगिक संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. स्वत:च्या काळजीत विश्रांती, स्क्रोटल सपोर्ट वापरणे आणि दररोज स्थानिक पातळीवर 15-20 मिनिटांसाठी आइस पॅक्स लावणे यांचा समावेश होतो.