तणाव म्हणजे काय?
तणाव आयष्यातील प्रेशरला आणि घटनांना आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद आहे. तणाव आणि स्ट्रेस ला कारणीभूत घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असतात. परिस्थितीवर कमी नियंत्रण किंवा नियंत्रण नसल्यास, अनपेक्षित किंवा नवीन काहीतरी हाताळताना भिती वाटणे यामुळे तणाव येऊ शकतो. दीर्घकालीन तणाव आणि स्ट्रेसमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांमुळे होऊ शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
तणावाची मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- निद्रानाश.
- आत्मसम्मान कमी होणे.
- थकवा.
- निराशा.
- खूप कमी किंवा खूप जास्त खाणे.
- धूम्रपान आणि दारू पिणे यासारख्या हानीकारक सवयींमध्ये गुंतणे.
- एकाग्रतेमध्ये कमतरता.
- वजन कमी होणे किंवा वजन वाढणे.
- डोकेदुखी.
- सतत चिंता वाटणे.
- बद्धकोष्ठता.
- धक्का आणि अविश्वास.
- अतिसार.
- चिंता.
- स्नायू वेदना.
- भयभीत वाटणे.
- चक्कर येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
तणावाची मुख्य कारणे ही आहेत:
- कौटुंबिक,कार्य आणि वैयक्तिक समस्यांशी संबंधित स्ट्रेस.
- स्ट्रेसचे विकार, उदाहरणार्थ, पोस्ट-ट्रायमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी).
- कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला गमावणे.
- अतिशय काळजीत असणे.
- निराशावादी दृष्टिकोण.
- जीवनामध्ये मोठे बदल.
- बाळ होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर वैद्यकीय इतिहास पाहतात आणि तणावाचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी करतात.
खालील पद्धतींचा वापर करून तणाव हाताळला जातो:
- कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी: ही थेरपी मनातून नकारात्मक भावना आणि विचारांना काढून टाकण्यास मदत करते आणि व्यक्तीस शांत आणि सकारात्मक बनवते. ही थेरपी झोपेच्या आणि खाण्याच्या समस्या सोडवणे आणि अल्कोहोलचा गैरवापर यासारख्या सवयी सोडविण्यात मदत करते.
- रिलॅक्सिंग टेक्निक: ध्यान,योगा आणि थाई ची आणि सामाजिक सहाय्यासोबत आवश्यक तेलासह अरोमा थेरपी, खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम मन शांत करण्यात मदत करतात.
- शारीरिक ॲक्टिव्हिटी: मनःस्थिती सुधारण्यासाठी आणि स्नायूंचा तणाव कमी करण्यासाठी नियमित शारीरिक ॲक्टिव्हिटीची शिफारस केली जाते.
- ग्रूप थेरपी आणि मनोविज्ञान सत्र: ओपन ग्रुप आणि क्लोज ग्रुप सत्रांमध्ये सहभागी होणे, भावना विकसित करणे, सामाजिक कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी याची शिफारस केली जाते.
- अल्कोहोलच्या वापरचा विकार, कॅनाबीसच्या वापरचा विकार, ओपिऑइडच्या वापरचा विकार आणि तंबाखूच्या वापरचा विकार सारख्या व्यसनांसाठी थेरपी.