स्ट्रोक - Stroke in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

May 03, 2019

July 31, 2020

स्ट्रोक
स्ट्रोक

स्ट्रोक म्हणजे काय?

स्ट्रोक संभाव्य प्राणघातक नर्व्ह-संबंधित वैद्यकीय स्थिती आहे, जी मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा थांबतो तेव्हा उद्भवते. जलद आणि आक्रमक वैद्यकीय उपचार मेंदूला कायमस्वरुपी नुकसान आणि अक्षमतेपासून वाचवू शकतात.

याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची चिन्हे आणि लक्षणे भिन्न असतात आणि अचानक दिसतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असतात. त्यांना एफ.ए.एस.टी. म्हणून ओळखले जाते:

  • चेहरा(फेस) - डोळा आणि तोंड एका बाजूला वाकणे आणि हसण्यास असक्षम होणे.
  • हात(आर्म)- दुर्बलता किंवा सौम्यतेमुळे दोन्ही हात उचलण्यात अक्षमता.
  • बोलणे(स्पीच)- अस्पष्ट उच्चारण किंवा बोलण्याची अक्षमता असू शकते.
  • वेळ(टाइम)- त्वरित वैद्यकीय मदत बोलवणे.

इतर लक्षणांमध्ये याचा समावेश आहे:

  • एक बाजू किंवा विशिष्ट भागाला संपूर्ण पक्षाघात उदा. चेहऱ्याची एक बाजू.
  • अस्पष्टता किंवा दृष्टीक्षेप हानी.
  • चक्कर येणे.
  • गोंधळ.
  • समतोल आणि समन्वय समस्या.
  • गिळताना अडचणी.
  • शुद्ध हरपणे.
  • शरीराची एक किंवा दोन्ही बाजू सुन्न होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा हा इस्किमिक स्ट्रोकचा परिणाम आहे. रक्तवाहिन्यांमधील भिंतींवर प्लाक (कोलेस्टेरॉल आणि कॅल्शियम) जमा झाल्यामुळे अडथळा येतो.
  • मेंदूमध्ये धमनी तुटणे हे हॅमरेजिक स्ट्रोकचे कारण आहे (सेरेब्रल किंवा इंट्राक्रैनियल हॅमरेज). उच्च रक्तदाब हॅमराजिक स्ट्रोकच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
  • क्षणिक इस्किमिक अ‍ॅटेकला मिनी-स्ट्रोक किंवा चेतावणी स्ट्रोक म्हणून देखील ओळखले जाते, धमनीच्या आंशिक अडथळ्यामुळे होते. हे एका तासापेक्षा कमी काळ टिकते आणि आगामी गंभीर स्ट्रोकची चेतावणी देते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

आपल्या लक्षणांवर आधारित, वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि शारीरिक तपासणी करून डॉक्टर निदान करतात. चेहरा, हात आणि पाय यांची संवेदना, धूसर दृष्टी; गोंधळ आणि बोलण्यात अडचण याची तपासणी केली जाते. रक्त तपासणी, पल्स रेट आणि रक्तदाब तपासणे, सीटी स्कॅन, सीटी अँजियोग्राम, एमआरआय स्कॅन, गिळण्याची चाचणी, कॅरोटीड अल्ट्रासाऊंड आणि इलेक्ट्रोकर्डियोग्राम केले जाते.

इस्किमिक स्ट्रोकमध्ये थ्रॉम्बोलायसिस, थ्रॉम्बेक्टॉमी, अँन्टप्लेटलेट थेरपी, अॅन्टिकोॲग्युलंट थेरपी, अॅन्टी-हाइपरटेन्सिव्ह ड्रग्स, स्टेटिन्स आणि कॅरोटीड एंडारटेरेक्टॉमी यांचा समावेश आहे.

हॅमरेजिक स्ट्रोकचे शस्त्रक्रियेद्वारे मेंदूमध्ये पसरलेले रक्त काढून आणि मेंदूमध्ये वाढलेला दबाव व्यवस्थापित करून उपचार केले जातात.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Stroke.
  2. National Stroke Association. What is stroke? American Heart Association. [Internet]
  3. National Health Service [Internet]. UK; Stroke.
  4. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Stroke
  5. National Health Portal [Internet] India; Stroke
  6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; About Stroke

स्ट्रोक साठी औषधे

Medicines listed below are available for स्ट्रोक. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.