स्पॉन्डिलायसिस काय आहे?
स्पॉन्डिलायसीस हा एक आजार आहे ज्यामुळे पाठीच्या कण्याचे हाड, कार्टिलेज आणि डिस्क वर परिणाम होतो. कालांतराने स्पॉन्डिलायसिसमुळे कण्याच्या हाडांचे कुशन असलेल्या पाठीच्या कण्याच्या उती खंडित होतात. अंततः स्पॉन्डिलायसिस पाठीचा कणा आणि ऑस्टियोआर्थराइटिसच्या कडकपणास कारणीभूत ठरतो. सामान्यतः याचा परिणाम मान आणि कंबर म्हणजेच पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूच्या क्षेत्रावर होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
स्पॉन्डिलायसिसची मुख्य चिन्हे आणि लक्षणे ही त्याच्या प्रकारावर अवलंबून असतात.
लंबर स्पॉन्डिलायसिस:
- सकाळी कडकपणा आणि पाठीत वेदना होणे.
- जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे.
- वाकताना किंवा उचलताना वेदना होणे.
मानेचा स्पॉन्डिलायसिस
- डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे.
- पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे.
- मानेत कडकपणा जाणवणे.
- तोल गेल्यासारखे वाटणे.
- खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे.
- पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे.
- आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे.
वक्षीय स्पॉन्डिलायसिस
- मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे.
- पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे
याची मुख्य कारणं काय आहेत?
स्पॉन्डिलायसिसची मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत:
- वय वाढणे.
- मानेची इजा (जसे कि अपघातात लागलेला झटका).
- गंभीर संधिवात.
- भूतकाळात पाठीच्या कण्यास झालेली इजा.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
स्पॉन्डिलायसिसचे निदान पुढील प्रक्रियेद्वारे केले जाते:
- पाठ आणि मानेच्या लवचिकतेची तपासणी करण्यासाठी सखोल वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी.
- चालण्याच्या क्रियेचे मूल्यांकन.
- पाय, बाहू आणि हातांच्या शक्ती आणि रिफ्लेक्सेसची चाचणी करणे.
- गरज वाटल्यास एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणी करणे.
पुढील उपचारपद्धतींद्वारे स्पॉन्डिलायसिसचा उपचार केला जातो:
- वेदना कमी करण्यासाठी ओव्हर द काउंटर औषधोपचार दिले जातात.
- ब्रेस किंवा नरम कॉलर.
- परिणाम झालेल्या भागास बळकटी देण्यासाठी व्यायाम करणे.
- फिजिकल थेरपी.
- गंभीर वेदनांच्या प्रकरणांमध्ये इंजेक्शन किंवा वेदनाशामक औषधे दिली जातात.
- गंभीर प्रकरणे जेव्हा मौखिक किंवा इंजेक्शनमार्फत दिलेल्या औषधोपचारांना प्रतिक्रिया मिळत नसेल आणि दिनचर्या विस्कळीत झाली असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.