Sciatica - Sciatica in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

September 10, 2020

Sciatica
Sciatica

सारांश

नितंबापासून पोटरीकडे जाणाऱ्या सायटीक नसेच्या(कटिस्नायूच्या)दुखापतीने होणार्र्या वेदनादायक स्थितीला सायटीका(कटिस्नायुशय) म्हणतात. लक्षणांमध्ये पाठीच्या खालच्या भागातील वेदनांसह एका पायात खालच्या भागात उत्सर्जीत होणारी बधीरता समाविष्ट आहे.याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत– मज्जातंतूंमूळे होणारे आणि संदर्भित (इतर अवयवांमूळे होणारे). लक्षणं अचानक प्रकट होतात आणि अतिशयनकोशी असतात. सायटीटिकास(कटिस्नायुशयास) कारणीभूत असणारी अनेक कारणे असू शकतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, सायटीकाचा (कटिस्नायुशयाचा)संबंधपाठीच्या दुखापती किंवा दीर्घकालीन निष्क्रियतेशी जुळलेला असतो. इतर कारणांमधे अयोग्य शरिरीक ढब, लठ्ठपणा, मज्जातंतू प्रणालीतील विकार, स्पॉन्डिलायटिस (मणक्यांना आलेली सूज), स्लिप डिस्क (मणक्यातील कुर्चा घसरणे) आणि स्नायूंमधील आकडी किंवा उबळ यांचा समावेश होतो. 4-6 आठवड्यांच्या आत साएटीकाचे(कटिस्नायुशयाचे) निराकरण होते परंतु लक्षणे कायम राहिल्यास वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. सायटीकाचा(कटिस्नायुशयाचा) उपचार वेदनाशामक औषधं वापरून, फिजियोथेरपी, मसाज करून आणि गंभीर प्रकरणात - शस्त्रक्रिया करून करतात. जीवनशैलीत अनेक बदल करून साएटीकाच्या(कटिस्नायुशयाच्या) लक्षणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते. तथापि, लक्षणे परतून आल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. शिवाय, उपचार न केल्याने, सायटीटिकामुळे(कटिस्नायुशयामूळे) वाढत जाणार्या वेदना आणि नसेची कायमस्वरुपी क्षति यांसारख्या गुंतागुंती होऊ शकतात.

Sciatica symptoms

(कटिस्नायुशयाच्या)साएटीकाच्या सर्वात सामान्य लक्षणांमधे समाविष्ट आहेत:

  • पाठ, नितंबाचे हाड, पायाचा मागचा भाग आणि नितंबांमधील वेदना. (अधिक वाचा - पाठदुखी आणि उपचार)
  • पायांमध्ये जळजळीची संवेदना.
  • एका पायामधील किंवा तळपायामधील वारंवारची बधिरता.
  • एका पायाचे अशक्त होणे
  • खालच्या भागात उत्सर्जित होणाऱ्या वेदना.
  • पाय किंवा तळपाय हलविणे किंवा चालणे व उभे राहण्यात अडचण येणे.
  • पायांमध्ये झिणझिण्या होण्याच्या संवेदना ज्याने हालचालींमध्ये विघ्न येते.

काही लक्षणे अशी असू शकतात ज्यांना त्वरित वैद्यकीय काळजीची आवश्यकता आहे. यात समाविष्ट आहे:

  • पायांमधील दीर्घकालीन बधिरता.
  • मूत्राशय आणि आंतड्यावरील नियंत्रण कमी होणे. (अधिक वाचा - मूत्र अशक्तपणा उपचार)
  • पायांमधील अशक्तपणा
  • हालचाल करतानाच्या वेदना

साएटीकाच्या(कटिस्नायुशयाच्या) लक्षणांचा संबंध बहुतांश वेळी हालचालींवर मर्यादा आणि तीव्र वेदनांसह झिणझिण्या व जळजळीच्या संवेदनांशी जोडला जातो ज्याकाही मिनिटांतच पार्श्वभाग, पाय आणि तळपाय या खालच्या भागात जातात.

तथापि, साएटीकाची(कटिस्नायुशयाची) लक्षणे, श्रोणीच्या सांध्यांतील बिघाडांच्या अवस्थेतील लक्षणांसारखीच असू शकतात. गर्भधारणेसारख्या अवस्थेत पाठीच्या खालच्या भागातील वेदनांचा त्रास होऊ शकतो. म्हणून, जेव्हा अशा लक्षणांचा अनुभव येतो,तेव्हा इतर आजार असण्याची शक्यता तर नाही ना, याची खात्री करवून घेण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय तपासण्या करून योग्य निदान करणे आवश्यक आहे.

Sciatica treatment

4-6 आठवड्यांच्या आत साएटीका(कटिस्नायुशय) स्वतः बरा होत नसल्यास वैद्यकीय हस्तक्षेप आवश्यक असू शकतो. उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:

  • वेदनाशामक औषधोपचार
    संयुक्तपणे उपचारांच्या इतर पद्धती आणि वेदनाशामक औषधे, ज्यामुळे दाहकतासुद्धा कमी होण्यास मदत होते,निर्धारित केल्या जातात. ही औषधे नस व्यवस्थित होईपर्यंत क्षणीक वेदना कमी करतात.
  • एपीड्युरललस
    यात वेदना कमी करण्यासाठी लस टोचून थेट कण्यात औषधोपचार करणे समाविष्ट आहेत.
  • फिजिओथेरपी
    साएटीकाशी(कटिस्नायुशयाशी) संबंधित वेदनांची लक्षणे सुधारण्यासाठी फिजिओथेरपी अतीशय उपयुक्त आहे. हे क्रमाने बरे होण्यास मदत करते आणि यांत व्यायाम आणि मालिश करणे समाविष्ट आहे. साएटीकाच्या(कटिस्नायुशयाच्या) निदानानंतर पहिल्याच आठवड्यात फिजिपथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामूळे लक्षणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन होते व वेदना कमी होऊ शकतात.
  • शस्त्रक्रिया
    जर वेदना अपेक्षेनुसार कमी होत नसतील आणि फारच अस्वस्थ वाटत असेल, तर शस्त्रक्रिया सूचित केली जाऊ शकते. डिकम्प्रेशन शस्त्रक्रिया केल्याने (कटिस्नायुशयापासून) साएटीकापासून मुक्तता मिळू शकते. या शस्त्रक्रियेनंतर रोगमुक्तत व्हायला साधारणतः सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. जेव्हा सर्व गैर-शस्त्रक्रिया उपचार अपयशी ठरतात तेव्हा साएटीक(कटिस्नायुशय) वेदना कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया सर्वात प्रभावी उपाय ठरतो. स्लिप डिस्कमुळे(मणक्यातील कुर्चा घसरण्यामूळे) होणारी (कटिस्नायुशयाची) साएटीकाची(कटिस्नायुशयाची) शस्त्रक्रिया आंशिक डिसेक्टॉमी म्हणून ओळखली जाते.

जीवनशैली व्यवस्थापन

वैद्यकीय अहवालानुसार, साएटीक नसेच्या(कटिस्नायूंच्या) वेदनांचे व्यवस्थापन करणे फार कठीण नसते आणि बऱ्याच वेळा त्याच्याशी संबंधित असलेल्या वेदना काही दिवसातच कमी होतात. असे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये वेदना कमी होऊ शकतात. यात समाविष्ट आहे:

  • शक्य तितके हलके व्यायाम करा आणि नियमित क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा.
  • वेदना कमी होण्यातमदत करण्यासाठी जलद चालणे आणि पाठीचे स्ट्रेचींग करा.
  • पार्श्वभागाच्याखालच्या भागात स्नायूंना शिथील करण्यासाठी  हिटींग पॅड्स वापरा.  हिटींग पॅड्स सुलभपणे उपलब्ध आहेत आणि हालचालींना सक्षम करण्यासाठी अतीशय उपयुक्त आहेत. एक हीटिंग पॅड दिवसातून अनेक वेळा वापरला जाऊ शकते.
  • (हीटिंग पॅडच्या) उष्ण तक्क्यांच्या वापरा नंतर वेदनाशामकलेपनलावा. हे मलम स्नायूंनादेखील शिथील करतात आणि सूज कमी करतात.(हीटिंग पॅडमधून) उष्ण तक्क्यामधील उष्णतेमूळे मलम शोषून घेतले जाते आणि जलद प्रतिक्रीयामिळते.
  • जर तुम्ही पायातील बधीरता अनुभवत असाल तर त्यातून मुक्त होण्यासाठी जमिनीवर हळूवारपणे पाय आपटायचा प्रयत्न करा. आपले पाय फिरवा. बधीरता दूर होण्यास सुरूवात झाल्यावरतूम्ही झिणझिण्यांच्या संवेदना अनुभवू शकता. आपले पाय सौम्यपणे हलते ठेवा परंतु अचानक हालचाल करू नका कारण यामुळे पायांत कठोरपणा येऊ शकतो.
  • वेदनांपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी आपण कधीकधी वेदनाशामक घेऊ शकता. तथापि, आपण इतर औषधांचे सेवन करत असल्यास त्या (वेदनाशामक) घेण्यापूर्वी आपणविशेषतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • प्रक्रीया केलेले खाद्यपदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा कारण यामुळे शरीरात दाहकता वाढू शकते. हिरव्या भाज्यांसारखे दाहकता कमी करणारे पदार्थ सर्वोत्तम आहेत. घरी केलेला आल्याचा ग्रीन टी पिणे, जळजळ कमी करण्यासाठी, खूप उपयुक्त ठरू शकते.
  • (हीटिंग पॅड)उष्ण तक्के वापरणे आपल्याला अस्वस्थ करीत असल्यास, गरम पाण्याने स्नान करणे उत्तम पर्याय असू शकतो.
  • कडक गादीवर झोपा परंतु गादी अती कडक नाही याची खात्री करा. त्याच वेळी अती मऊ गादीवर झोपू नका कारण यामुळे आपल्या पाठीला कोणताही आधार मिळणार नाही आणि वेदना वाढू शकतात.

हे न करण्याचा सल्ला दिला जातो:

  • बधीरता असलेल्या भागात गार वस्तूंनी दाबणे
  • दिर्घ काळ बसून राहणे किंवा झोपून राहणे
  • अधीकचा ताण घेणे ज्याने स्नायुंमधील वेदना वाढतात
  • पॅरासीटामोलच्या गोळ्या घेणे ज्याने पाठदुखीमध्ये कुठलीही मदत होत नाही.


संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Sciatica
  2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Sciatica
  3. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Getting a leg up on sciatica. Published: September, 2005. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  4. Cedars-Sinai Medical Center, US [internet]; Sciatica.
  5. STD-GOV, April 24, 2018 [internet] St SW, Rochester; Sciatica: Symptoms, Causes, Treatment and Exercises

Sciatica साठी औषधे

Medicines listed below are available for Sciatica. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for Sciatica

Number of tests are available for Sciatica. We have listed commonly prescribed tests below: