बाळंतपणानंतर चा रक्तस्त्राव - Post Delivery Bleeding in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

बाळंतपणानंतर चा रक्तस्त्राव
बाळंतपणानंतर चा रक्तस्त्राव

बाळंतपणानंतर चा रक्तस्त्राव काय आहे?

बाळंतपणानंतर योनीमधून रक्तस्त्राव होणे ही साधारण क्रिया आहे. हे दोन्ही बाळंतपण योनी आणि सिझेरिअन सेक्शन मध्ये होते. बाळंतपना नंतरच्या पहिल्या दिवशी जास्त रक्तस्त्राव होतो आणि हळूहळू कमी होत जातो, काही आठवड्यानंतर हे पूर्णपणे थांबते. पोस्ट पार्टम हेमोरेज (पीपीएच) हे बाळंतपणाच्या  24 तासाच्या आत खूप जास्त रक्तस्त्राव होऊन नॉर्मल बाळंतपणामध्ये 5०० एमएल आणि सिझेरिअन मध्ये 1००० एमएल ब्लड लॉस होतो. बाळंतपणानंतर होणाऱ्या रक्तस्रावाला लोचिया असेही म्हणतात.

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पीपीएच चे सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

  • रक्तदाब कमी होणे.
  • अतिरिक्त रक्तस्त्राव.
  • हृदयाचा  वेग वाढणे.
  • रक्त पेशींची संख्या कमी होणे.
  • योनी  जवळ सूज आणि वेदना होणे.
  • अशक्तपणा.

याचे मूख्य कारण काय आहे?

बाळंतपणानंतर, गर्भाशयाच्या आकुंचनामुळे प्लॅसेंटा योनीच्या बाहेर पडतो. प्लॅसेंटाला बाहेर काढल्यानंतर गर्भाशय आकुंचित अवस्थेतच राहते. जर गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पावले नाही तर पीपीएच होऊ शकते.बाळंतपणानंतर जर प्लॅसेंटाचा थोडासा भाग जरी गर्भाशयाला चिटकून राहिला तरी हे होऊ शकते. काही इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:

  • रक्त गोठण्याचा विकार जसे हिमोफिलिया किंवा विटामिन के ची कमतरता.
  • प्लॅसेंटा विकार.
  • योनी किंवा सर्विक्स ला इजा होणे.
  • रक्तवाहिनीला इजा होणे.
  • पेल्विक च्या भागामधून रक्तस्त्राव होणे.

याचे निदान आणि उपचार काय आहे ?

निदान खालील गोष्टीच्या आधारावर करतात:

  • शारीरिक तपासणी.
  • हृदयाचा वेग आणि रक्तदाबाची तपासणी.
  • रक्तपेशी ची संख्या मोजण्यासाठी रक्त चाचणी.
  • ब्लड लॉस चे मोजमाप करणे.

उपचाराचे प्राथमिक लक्ष्य रक्तस्त्राव होण्यामागचे कारण ओळखणे आणि त्यावर उपचार करणे. काही उपचारातील बदल खालील प्रमाणे आहे:

  • गर्भाशयाच्या आकुंचनाला उत्तेजन देण्यासाठी गर्भाशयाची मालीश किंवा औषधे दिल्या जाते.
  • प्लॅसेंटा चा भाग गर्भाशयातून बाहेर काढणे.
  • ज्या रक्त वाहिन्यांमधून रक्तस्त्राव होत आहे त्यांना गर्भाशयाच्या आकुंचनाने बंद करणे.
  • लॅप्रोटोमी (पेल्व्हिस मध्ये छोटासा कट करून असे उपकरण वापरावे जे त्याच्या आत जाऊन शस्त्रक्रिया  करू शकते).
  • हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय बाहेर काढणे).

पीपीएच मध्ये अतिरिक्त फ्लुइड लॉस होतो, आणि हे फ्लुइड बाहेर काढणे हा या उपचाराचा मूख्य उपदेश आहे. फ्लुइड बदलण्यामध्ये शिरेमधील फ्लुइड, रक्त, आणि रक्ताचे प्रॉडक्ट हे उपयोगात येते.



संदर्भ

  1. Queensland Health [Internet]: The State of Queensland. Bleeding after birth .
  2. National Health Portal [Internet] India; Postpartum haemorrhage.
  3. Likis FE, Sathe NA, Morgans AK, et al. Management of Postpartum Hemorrhage [Internet]. Rockville (MD): Agency for Healthcare Research and Quality (US); 2015 Apr. (Comparative Effectiveness Reviews, No. 151.) Introduction.
  4. Am Fam Physician. 2007 Mar 15;75(6):875-882. [Internet] American Academy of Family Physicians; Prevention and Management of Postpartum Hemorrhage.
  5. University of Rochester Medical Center Rochester, NY; Postpartum Hemorrhage.