सारांश
आपल्या शरिराची विष्ठा, लघवी आणि घाम यामार्फत विषारी, अनुपयोगी आणि हानिकारक असलेलेपदार्थ काढून टाकण्याची नैसर्गिक अशी यंत्रणा आहे. आपल्या शरिरातील मूत्रनलिका अशा यंत्रणांपैकी एक आहे. या मूत्रनलिकेत युरेथ्राद्वारे लघवीच्या रूपात रक्ताची छाननी करणे आणि रक्तातील कचरा बाहेर काढण्यासाठी अवयवांचे समायोजन असते. मूत्रविसर्जन करतांना होणारी कोणतीही वेदना किंवा गैरसोय झाल्यास, हिला सामान्यपणें वेदनायुक्त लघवी असे म्हणतात. मूत्रनलिका किंवा इतर ओटीपोट क्षेत्रातील अवयवांचे संक्रमण, सूज, निर्जलीकरण, मूत्रपिंडातील खडा, शरिरातील गाठी, औषध उपचार, प्रकाश विकिरण आणि रुग्णाला आधीच असलेली अलर्जी याची सामान्य कारणे असतात. सर्वांत सामान्य लक्षणे मूत्र विसर्जन करतांना किंवा सुरू करतांना वेदना या असतात. वेदनायुक्त लघवीच्या इतर लक्षणांमध्ये दुर्गंध, युरेथ्रामधून गळती, ओटीपोट या क्षेत्रात लालसरपणा किंवा खाज आणि इतर असतात.
वेदनायुक्त लघवी या आजाराचे निवारण योग्य आहार विशेष करून पुरेसे असतील एवढे तरळ पदार्थ घेऊन, आपली वैय्यक्तिक स्वच्छता सांभाळून, मद्यपान व धूम्रपान आटोक्यात आणून आणि कमीत कमी वर्षातून एक वेळा नियमित वैद्यकीय चाचणी करवून घेऊन करता येते. उपचार म्हणजे संक्रमण, सूज व मूत्रपिंडाचे लहान खडे बरे करतील अशी औषधे, आणि गाठी व मूत्रपिंडाचे मोठे खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया असे असतात. उपचार वेळीच केल्याने रुग्णाची प्रगती बरी असते. गुंतागुंती क्वचित् होतात आणि त्यामध्ये पुनरावर्त संक्रमण, रक्त संक्रमण किंवा सेप्सिस, मूत्रपिंड निकामी होणें, वेळेच्या पूर्वी शिशुजन्म किंवा नुकतेच जन्म झालेल्या बाळाचे वजन कमी असणे हे सामील आहेत.