जास्त व्यायाम - Over exercise in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 01, 2019

March 06, 2020

जास्त व्यायाम
जास्त व्यायाम

जास्त व्यायाम म्हणजे काय?

फिट आणि निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक असला तरी शरीराची शारीरिक ताण सहन करण्याची काही मर्यादा आहे आणि ही मर्यादा पार केल्यावर त्यास जास्त व्यायाम म्हणतात. जास्त-व्यायामामुळे बऱ्याच समस्या उद्भवू शकतात आणि व्यक्तीच्या नियमित क्रियाकलापांमध्ये अडथळा येऊ शकतो.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जास्त-व्यायामाची चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः

  • थकवा.
  • चिडचिडपणा आणि मनःस्थिती बदलते.
  • झोप लागण्यात अडचण.
  • जास्त वजन कमी केल्याने बीएमआय इन्डेक्स सामान्यपेक्षा खाली होते.
  • चिंता.
  • बऱ्याचदा सर्दी होते.
  • अंग जड वाटते आणि स्नायू दुखते.
  • उदास वाटते.
  • जास्त व्यायाम केल्यामुळे दुखापत.

मुख्य कारणं काय आहेत?

व्यायामानुसार मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत:

  • अनिवार्य व्यायाम जे निराशा, चिंता, चिडचिडपणा आणि इतर समस्या उद्भवते जर व्यक्ती व्यायाम करत नसेल.
  • बुलिमिया नर्व्होसा, खाण्याचा विकार, ज्यामध्ये जास्त व्यायाम केल्यानंतर जास्त खाल्ले जाते. बुलिमिया नर्व्होसा असलेले लोक, त्यांच्या शरीराच्या आकाराबद्दल व वजनविषयी, खूपचं सतर्क असतात आणि वजन कमी करण्यासाठी विविध पद्धतींचे अवलंबन करतात कारण त्यांना वाटते की त्यांचे वजन जास्त झाले आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

जर एखादा  व्यक्ती केलेल्या व्यायामावर नियंत्रण ठेवू शकत नसेल आणि जास्त व्यायाम करण्याच्या चिन्हे असतील तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर शारीरिक तपासणी करतील आणि परिस्थितीशी संबंधित काही प्रश्न विचारतील. डॉक्टर ओव्हरट्रेनींगचे कारण ओळखतील आणि अनिवार्य व्यायाम किंवा बुलिमिया नर्व्होसा संशयित असल्यास तुम्हाला सल्लागारांकडे शिफारस करतील.

स्थितीचा उपचार करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो:

  • अँटी-डिस्पेंटंट औषधे.
  • कॉग्निटिव्ह बिहेव्हिरियल थेरपी.
  • समर्थन गट.

काही जीवनशैलीत बदल करून जास्त व्यायामावर कमी आणि नियंत्रण ठेवतात:

  • तुम्ही जो व्यायाम करत आहात त्या पातळीसह तुमच्या अन्नाचा आहार संतुलित करा.
  • व्यायाम करताना भरपूर प्रमाणात द्रव प्या.
  • अत्यंत थंड आणि उष्ण वातावरणात व्यायाम करण्याचे टाळा.
  • रात्री किमान आठ तास झोपा.
  • व्यायामच्या दोन सत्रात कमीतकमी सहा तास विश्रांती घ्या.
  • प्रत्येक आठवड्यात व्यायामा पासून एक दिवसाची सुट्टी घ्या.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Bulimia.
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Are you getting too much exercise?
  3. Mia Beck Lichtenstein et al. Compulsive exercise: links, risks and challenges faced . Psychol Res Behav Manag. 2017; 10: 85–95. PMID: 28435339
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Exercise safety
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Physical activity - it's important
  6. National Health Service [Internet]. UK; Exercise.