सारांश
ऑस्टिओपोरोसिस हाडांची अशी अवस्था आहे ज्यामध्ये हाडांचे घनत्त्व कमी होते आणि त्या ठिसूळ होऊ लागतात. हाडे अशक्त होणे आणि परिणामी गुंतागुंतीनिर्माण होणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिकमोठ्या प्रमाणात आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या व्यापक कारणांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणारे संप्रेरकांतील बदल, कॅल्शिअम आणि डी जीवनसत्वाची कमतरता आणि ज्यामुळे हाडे अशक्त होऊ शकतात अशा इतर आजारांचा समावेश आहे.ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांसाठी आरोग्याची सर्वात मोठी जोखीम म्हणजे इजांमुळे आणि पडल्यामुळे अस्थिभंग होणे ही आहे. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांमध्ये हाडे अशक्त असणे आणि वाकलेल्या हाडांमुळे शरिराची ढब विकृत असण्याचे खूप प्रमाण असते. संप्रेरक उपचार , आहारातील पूरके आणि स्वस्थ जीवनशैली ह्या मुख्य उपचारपद्धती आहेत. अगोदर निदान झाल्यास, हाडांची पुढील हानी टळू शकते आणि अस्थिभंगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.