स्नायूंवर ताण येणे काय आहे?
स्नायूंवर ताण येणे हे एक प्रकारची दुखापत आहे जी एक किंवा अनेक स्नायूंना होत असते. एखाद्या व्यक्तीच्या स्नायूंवर ताण आला आहे हे तेव्हा म्हटले जाते जेव्हा त्यांच्या स्नायूंचे तंतू (मसल फायबर) ताणले किंवा फाटले जातात. बहुतेक स्नायूंवर ताण येणाऱ्या घटना या सौम्य असतात आणि स्नायू तंतू मजबूत आणि अखंड राहतात. स्नायू तंतू त्याच्या मर्यादेबाहेर ताणले जातात आणि स्नायूंवर येणाऱ्या ताणाच्या काही प्रकरणातच फाटतात.
त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
स्नायूंवर येणाऱ्या ताणाची मुख्य चिन्हं आणि लक्षणं पुढील प्रमाणे आहेत :
- दुखापती दरम्यान झटकन अनपेक्षितपणे होणाऱ्या संवेदना.
- मसल स्पॅसम्स (स्नायूंना आलेला आकुंचनाचा झटका/शिरेवरती शिरा चढणे) किंवा क्रॅम्प्स.
- स्नायुंची कोमलता आणि वेदना.
- स्नायूंवर सूज येणे.
- जखमे च्या जागेवर डाग येणे.
- दाह सूज (इनफ्लेमेशण).
याची मुख्य कारणं काय आहेत?
स्नायूंवर येणाऱ्या ताणाची मुख्य कारणं आहेत:
- नृत्य किंवा धावणे यांसारख्या क्रियेदरम्यान हॅमस्ट्रिंग स्नायूं जास्त प्रमाणात ताणले जाणे.
- जास्त प्रमाणात मुरगळल्याने किंवा उडी मारल्याने पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
- खेळताना होणाऱ्या जखमा.
- जड वजन असलेल्या वस्तू उचलण्याने.
- चुकीची देहबोली.
- कुठलीही शारीरिक क्रिया करण्याअगोदर वार्मअप न केल्याने.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
स्नायूंवर येणारे ताणाचे निदान पुढील पद्धतींनी केले जातात:
- डॉक्टर आपणास हालचाली आणि स्नायुंची शक्ती या संबंधी येणारे अनुभव लक्षात घ्यायला सांगतात.
- स्पॅसम्स (स्नायूंना आलेला आकुंचनाचा झटका/शिरेवर शिरा चढणे), अशक्तपणा आणि स्नायूंचा नाजूकपणा तपासला जाऊन वैद्यकीय इतिहासासोबत तुलना केली जाईल.
- गरज असल्यास एक्स-रे किंवा एमआरआय (MRI) स्कॅन सुद्धा केले जाईल
- मेरू दंड (स्पायनल कॉर्ड) आणि मणक्याच्या चकती (व्हरटेब्रल डिस्क) मधील समस्यांसाठी अतिरिक्त चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो.
स्नायूंवर येणाऱ्या ताणाचा उपचार पुढील पद्धतींनी केला जातो:
- आराम करणे, बर्फ अनुप्रयोग करणे, क्रेप पट्टी किंवा कापडाचा वापर करून दाब देणे आणि हृदयाच्या पातळीत किंवा त्याच्यावर उत्थान (एलिव्हेशन) करणे हे स्नायूंवर येणाऱ्या ताणाचा उपचार करण्याच्या सर्वात सामान्य पद्धती आहेत. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी हे मदत करतात.
- सौम्य ताणाचा उपचार शारीरिक उपचाराने (फिजीकल थेरेपी) केला जातो ज्यामुळे स्नायूंचा ताण बरा होतो आणि स्नायूंना शक्ती मिळते.
- गंभीर स्नायूंच्या ताणासाठी शारीरिक उपचारा नंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- सूज आणि वेदनेतून आराम मिळविण्यासाठी डॉक्टर नॉनस्टेरॉइड अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs), पेनकीलर किंवा स्नायू शिथिलक घेण्याची शिफारस करू शकतात.
- क्रियांवर प्रतिबंध आणि कास्ट, स्प्लिंट,(पाय, हात, इ चे मोडलेले हाड जागी नीट स्थिर बसावे यासाठी त्याभोवती बांधण्यासाठी वापरतात ती लाकडी फळी) व्हीलचेअर किंवा आधार याचा वापर इतर उपचार पर्याय आहेत.