मेनिंगजीओमा - Meningioma in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 10, 2018

March 06, 2020

मेनिंगजीओमा
मेनिंगजीओमा

मेनिंगजीओमा काय आहे ?

मेनिंगजीओमा हा मेनिंग्स जे मेंदू आणि मेरुदंडाचे (स्पायनल कॉर्ड) आवरण आहे, चा ट्युमर आहे. मेनिंगजीओमास हे सहसा गैर-कर्करोगी असतात आणि खूप हळूहळू पसरतात.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ-WHO) च्या वर्गीकरणानुसार मेनिंगजीओमास त्यांच्या स्थान आणि दर्जाच्या आधारावर वर्गीकृत केले जातात. काही प्रकरणांमध्ये, ट्यूमर खूप मोठे होईपर्यंत आणि त्यांचा उपचार करणे अशक्य होईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. मेनिंगजीओमाचे सर्वात सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत ?

ब्रेन ट्यूमरचे कारण आजपर्यंत ज्ञात झालेले नाही आहे परंतु असे मानले जाते की क्रोमोसोम 22 मधील बदल हा सर्वात मोठे कारण आहे. डोक्याला केलेल्या रेडिएशन थेरेपीचा इतिहास असलेल्या रुग्णांनाही जोखीम असल्याचे म्हटले जाते. हार्मोन्स आणि मेनिंगजीओमा यांच्यातील दुवा जागतिक पातळीवर शोधला जात आहे.

न्यूरोफायब्रोमॅटोसिस, प्रकार 2 जो एक अनुवांशिक रोग आहे, असलेल्या लोकांना देखील मेनिंगजीओमा होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

मेनिंगजीओमाची लक्षणे नंतरच्या टप्प्यात दिसून येतात आणि सीटी (CT) स्कॅन किंवा एमआरआय (MRI) दुसऱ्या स्थितीचा शोध घेताना ट्यूमर सामान्यत: प्रासंगाने आढळून येतो.

डॉक्टर विस्तृत वैद्यकीय इतिहास आणि कौटुंबिक इतिहास घेऊन, न्यूरोलॉजिकल तपासणीसह शारीरिक तपासणी करतात आणि मेनिंगजीओमाचे निदान निश्चित करण्यासाठी स्कॅनसाठी विचारतात. सीटी (CT) स्कॅन किंवा एमआरआय (MRI) मेनिंगजीओमाचा आकार आणि अचूक स्थान ठरवण्यासाठी वापरले जाते. पुढील टप्प्यासाठी, निदान निश्चित करण्यासाठी रक्त वाहिन्यांचा अँजियोग्राम देखील केला जाऊ शकतो.

मेनिंगजीओमाच्या लक्षणांवर ताबा मिळवण्यासाठी आणि त्याची वाढ दडपण्यासाठी काही औषधे आणि उपचार आहेत. उपचार पर्याय खाली स्पष्ट केले आहेत:

  • निरीक्षण - बहुतेक प्रकरणांमध्ये मेनिंगिजीओमाचा विकास खूपच मंद असल्यामुळे, रुग्ण ज्यांना थोडी किंवा काही लक्षणे नाहीत सहसा त्यांचा उपचार केला जात नाही, परंतु ट्यूमर च्या वाढीचे आणि लक्षणांमधील कोणत्याही बदलाचे काळजीपूर्वक परीक्षण केले जाते.
  • शस्त्रक्रिया - शस्त्रक्रिया म्हणजे ब्रेन ट्यूमरला जाण्यासाठी एक गो-ऑन पर्याय आहे, जिथे पुढील विकास टाळण्यासाठी प्रभावित क्षेत्र किंवा ट्यूमर शास्त्रक्रियेद्वारे काढला जातो.
  • रेडिएशन - ज्या क्षेत्रावर शस्त्रक्रिया शक्य नाही तेथे रेडिओथेरपी केली जाते. प्रतिकूल परिस्थितीस प्रभावित न करता, ट्यूमरचा नाश करण्यासाठी आणि त्याची वाढ थांबविण्यासाठी केंद्रीकृत भागावर रेडिएशन लागू केली जातात.
  • केमोथेरपी - मेनिंगजीओमा केमोथेरपीला इतका प्रतिसाद देत नाही; तरी, रेडिएशन आणि शस्त्रक्रियेला अप्रभावी मानल्यास मेनिंगजीओमा किंवा कोणत्याही ट्यूमरचा हा शेवटचा उपाय आहे.a



संदर्भ

  1. Wiemels J, Wrensch M, Claus EB. Epidemiology and etiology of meningioma. J Neurooncol. 2010 Sep;99(3):307-14. PMID: 20821343
  2. American Association of Neurological Surgeons. [Internet] United States; Meningiomas.
  3. The Brain Tumour Charity [Internet]: Farnborough, United Kingdom; Meningioma.
  4. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Meningioma.
  5. Rogers L et al. Meningiomas: knowledge base, treatment outcomes, and uncertainties. A RANO review. J Neurosurg. 2015 Jan;122(1):4-23. PMID: 25343186

मेनिंगजीओमा साठी औषधे

Medicines listed below are available for मेनिंगजीओमा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.