गरोदरपणात भूक न लागणे - Loss of appetite during pregnancy in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

गरोदरपणात भूक न लागणे
गरोदरपणात भूक न लागणे

गरोदरपणात भूक न लागणे म्हणजे काय?

गरोदरपणातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे भूक न लागणे, जे बऱ्याच कारणांमुळे होऊ शकते. प्राथमिक पणे हे होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे होते.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

चिन्हे व लक्षणे प्रत्येक स्त्री नुसार बदलतात, भूक न लागण्याशी निगडित काही सामान्य कारणे पुढीलप्रमाणे:-

  • वजन कमी होणे.
  • जास्त प्रमाणात मळमळ व उलट्या ( प्रामुख्याने सकाळी).
  • खूप थकवा
  • आवडीच्या पदार्थांबाबत अचानक अनिच्छा निर्माण होणे.
  • खात नसतानाही तोंड कडू झाल्याची भावना (डिसग्युशीया) निर्माण होणे.
  • अचानक बदलणारी मनःस्थिती (विनाकारण रडणे).
  • कब्ज.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

गरोदरपणात भूक न लागण्याच्या कारणांमध्ये पुढील काही असतात:-

  • मळमळ व उलट्या होणे, जे प्रामुख्याने पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीत घडते व खाण्याची भावना दाबून टाकते ज्यामुळे शेवटी अजिबात भूक लागत नाही.
  • हार्मोन्स मधील बदल.
  • गरोदरपणातील ताण व चिंता.
  • मनःस्थितीत सारखे होणारे बदल.
  • तीव्र वास येण्याची भावना- काही महिलांना गरोदरपणात तीव्र वास येत असल्यासारखे वाटते ज्यामुळे भूक लागत नाही.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

भूक न लागण्याचे निदान डॉक्टरांकडून प्रामुख्याने पूर्ण इतिहास व एक शारीरिक चाचणी घेतल्यानंतर केले जाते, ज्यामुळे कुपोषण, खूप कमी झालेले वजन व अती थकवा दिसून येतो. आहारातील कमतरता भरून काढण्यासाठी रक्त तपासण्या सुचवल्या जातात.

गरोदरपणात भूक न लागण्याचे नियमन करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात:-

  • घरच्या आहाराचे नियोजन करताना त्यात भरपूर फळे व भाज्या (फायबर्स असणाऱ्या), दुग्धजन्य पदार्थ (दूध, चीज, दही) स्टार्च असणारे पदार्थ (पास्ता, भात,चपाती,ब्रेड आणि कडधान्ये), बीन्स व डाळी तसेच मांस व प्रोटिन असणारे पोल्ट्री पदार्थ. पदार्थ जास्त उकळणे टाळावे.
  • औषधांचे योग्य वैद्यकीय नियोजन.
  • गॅस, अपचन, आम्लपित्त, हृदयातील जळजळ कमी करण्यासाठी अॅंटासिडस.
  • उलट्या थांबवण्यासाठी अँटीइमेटिक ड्रग्स जसे प्रोमेथाझिन, ओंडानसेट्रोन आणि मेटोक्लोप्रामाईड.
  • आहारातील कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन पुरवणारे अन्नपदार्थ.
  • कॅल्शियम पुरवणारे अन्नपदार्थ मिनरल्ससाठी.
  • व्हिटॅमिन डी 3 पुरवणारे अन्नपदार्थ.

 



संदर्भ

  1. Adrienne Einarson. et al. Treatment of nausea and vomiting in pregnancy. Can Fam Physician. 2007 Dec; 53(12): 2109–2111. PMID: 18077743.
  2. American Pregnancy Association. [Internet]. Irving, U.S.A. Morning Sickness.
  3. State of Victoria. [Internet]. Department of Health & Human Services. Pregnancy - signs and symptoms.
  4. Hudon Thibeault AA, Sanderson JT, Vaillancourt C. Serotonin-estrogen interactions: What can we learn from pregnancy?. Biochimie. 2019 Jun;161:88-108. PMID: 30946949.
  5. Veronica Bridget Ward. Eating disorders in pregnancy. BMJ. 2008 Jan 12; 336(7635): 93–96. PMID: 18187726.