सारांश
एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडिफेशिअन्सी वायरस, ज्यामुळे एड्स अर्थात् अक्वायर्ड इम्युनोडिफेशिअन्सी सिंड्रोम होतो. हा विषाणू सामान्यपणें, लैंगिक संबंधांतून शरिरातील द्रव्यांच्या आदानप्रदानाने, संक्रमित सूईद्वारे रक्तामार्फत किंवा एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळामध्ये पसरतो. विषाणू प्रतिरोधप्रणालीला बाधित करून शरिराच्या सुरक्षाव्यवस्थेलाच तोडून टाकतो आणि संक्रमित व्यक्तीला इतर संक्रमण आणि रोगांचा धोका वाढतो. विषाणूचे दोन प्रकार आहेत, एचआयव्ही-1 आणि एचआयव्ही -2. आजार तीव्रपासून घातक टप्प्यात जातो, आणि शेवटी एड्स होतो, ज्यामध्ये जीवनाची अपेक्षा कमी असते. पहिल्या टप्प्यात फ्लूसारखी लक्षणे असतात, तर दुसर्र्या टप्प्यात लक्षणे अधिक बिघडतात आणि शेवटी तिसर्र्या टप्प्यात कर्करोग व अवयव निकामी पडण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. मादक पदार्थांचे सेवन करणारी, असुरक्षित संभोग करणारी व सुंता नसलेल्या व्यक्तींना एचआयव्हीची लागण होण्याचा अधिक धोका असतो.
रक्तचाचण्या आणि काही घरगुती चाचण्यांनी परिस्थितीचे निदान होण्यात साहाय्य होतो, पण परिणामाची पुष्टी करण्यासाठी त्यांनंतर व्हेस्टर्न ब्लॉट चाचणी केलीच पाहिजे. एचआयव्ही/एड्सवर काहीच उपचार नाही, पण एंटीरेट्रोव्हायरल थेरपीने भरपूर नियंत्रण मिळवता येते. एचआयव्हीची बहुतांश औषधे इन्हिबिटर असतात, जे विषाणू दुप्पट होण्यास साहाय्य करणार्र्या विशिष्ट प्रथिनांचे उत्पादन टाळते, आणि इतर औषधे विषाणूला सीडी4 नावाच्या विशेष प्रतिरोध कोशिकांमध्ये प्रवेश करू देत नाही, ज्यांच्या माध्यमातून विषाणू व्यक्तीच्या प्रतिरोधाच्या गर्भावर प्रभाव पाडू शकतात. आहारामध्ये काही परिवर्तन आणि उपचार प्राप्त करणें व मानसिक व शारीरिक तणावाला सामोरे जाण्यातील कुटुंबाचे साहाय्य यांद्वारे, परिस्थिती बरी हाताळता येते. उपचाराचे सहप्रभाव आणि संलग्न रोगांसारख्या अनेक गुंतागुंती असू शकतात, ज्यामुळे तिसर्र्या टप्प्यात अशक्त प्रतिरोधप्रणाली आणि कर्करोगांसारखे परिणाम होतात. वेळीच उपचार केल्यास, एचआयव्ही असलेले लोक संक्रमणासह सक्रीय जीवन 50 वर्षांपर्यंत जगू शकतात, तर एड्स असलेल्या लोकांचे अपेक्षित आयुर्मान 10 वर्षांपर्यंत असते.