घामोळ्या म्हणजे काय?
घामोळ्या म्हणजे उष्णतेमुळे होणारे काटेरी फोडं ज्या मुळे शरीरातील विशिष्ट भागाला व इतर ठिकाणी लाल पुरळ येतात किंवा खाज सुटते. उन्हाळा चालू झाला की शरीरात नेहमी पेक्षा जास्त घाम येतो ज्याने घामोळ्या येतात. सामान्यपणे घामोळ्यांमुळे अस्वस्थता वाढते.
याची मुख्य चिन्हे व लक्षणे काय आहेत?
घामोळ्यांची मुख्य लक्षणे आणि चिन्हे त्वचेवर दिसून येतात आणि ओळखण्यास सोपी असतात.
याची लक्षणे अशी असू शकतात:
- त्वचेवर लाल पुरळ दिसणे.
- वरच्यावर फोड येणे.
- त्वचा खूप खाजवणे.
- कपडे घासल्याने अस्वस्थता जाणवणे .
- कोरडी आणि रखरखीत त्वचा.
घामोळ्यांची लक्षणे शरीरातील ठराविक भागात जसे मान, खांदे, छाती, आणि पाठीवर दिसतात. काही वेळा उष्णता वाढल्याने पुरळ हाताचे ढोपर व मांडीच्या सांध्यांच्या घड्यांवर पण येतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जेव्हा शरीर जास्त तापमानाच्या संपर्कात येतं, तेव्हा जास्त घाम येतो. अति उष्णता व दमट हवे मुळे जेव्हा घाम निर्माण करणाऱ्या नलिका जाम होतात तेव्हा घामोळ्या येतात. या अडथळ्यामुळे त्वचा लालसर होऊन ती खाजवते.
त्याचे निदान व उपचार कसे केले जातात?
घामोळ्या सामान्य असून त्याने शरीरात काही त्रास किंवा कॉम्प्लिकेशन होत नाही. घामोळ्या काही दिवस किंवा काही आठवडे राहतात व सामान्यतः कुठलेही उपचार न करता जातात. परंतु, ही अवस्था अस्वस्थतेची असल्यामुळे डॉक्टर घामोळ्या न येण्यासाठी त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देतात.
प्रतिबंधक उपाय व काळजी
- सैलसर कपडे घाला त्यामुळे त्वचा घामाने ओलसर होणार नाही.
- थंड व कोरड्या वातावरणात रहा.
- व्यायामानंतर आंघोळ करा.
- मऊ कपडे घाला जेणे करून त्वचेला घाम येणार नाही.
घरगुती उपाय जसे की थंड कोरफडीचा जेल लावणे किंवा थंड पाण्याने तो भाग धुणे यामुळे खाज कमी होण्यात मदत होते.
जर घाम निर्माण करणारी नलिका संसर्गित झाली तर उपचाराची गरज पडू शकते.