ग्लोमेरुलोनेफ्रायटिस काय आहे?
ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा एक प्रकारचा किडनीचा रोग आहे जे ग्लोमेरुली (किडनीतील छोटे फिल्टर्स जे कचरा आणि रक्तातून द्रव फिल्टर करतात) यांना नुकसान पोहोचवतो. हे सामान्यतः निरोगी किडनीच्या टिशुंवर हल्ला करणाऱ्या रोगप्रतिकार संस्थेमुळे होते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ग्लोमेरुलोनेफ्रायटिसशी निगडित चिन्हे आणि लक्षणे, खलील प्रमाणे आहेत:
- थकवा.
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- पाय किंवा शरीराच्या इतर भागात सूज (एडीमा).
- उच्च रक्तदाब.
- सांधे दुखी.
- रॅशेस.
- लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ग्लोमेरुलोनेफ्रायटिसची मुख्य कारणं खलील प्रमाणे आहेत:
- तुमच्या प्रतिकार यंत्रणेमध्ये समस्या ज्यात व्हॅसकुलायटिस आणि सिस्टेमिक ल्यूपस एरीथेमेटॉसिस (एसएलई-SLE) चा समावेश असतो.
- काही व्यक्तींमध्ये, काही संसर्ग रोगप्रतिकार प्रणालीची असामान्यता सक्रिय करतात. यात समाविष्ट आहेः
- एंडोकार्डिटिस, जो हृदयाच्या वाल्वचा संसर्ग आहे.
- हेपेटायटीस बी आणि हेपेटायटीस सी सारखे यकृतातील व्हायरल इन्फेक्शन्स.
- ह्यूमन इम्यूनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही-HIV).
- संभाव्य अनुवंशिकता.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- लक्षणांचा योग्य इतिहास जाणून घेतल्यानंतर डॉक्टर कदाचित पुढील सल्ला देतील:
- रक्त चाचणी
- क्रियाटिनिनची पातळी, जी किडनी विकार असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त असते.
- एस्टीमेटेड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट (ईजीएफआर-eGFR), जे किडनी विकारांमध्ये कमी होते.
- ऑटोइम्युन प्रतिक्रिया सक्रिय करणाऱ्या विविध पदार्थांकरिता अँटीबॉडीज.
- मूत्र चाचणी: मूत्रामध्ये रक्त किंवा प्रथिनांची उपस्थिती तपासण्यासाठी.
- अल्ट्रासाऊंड स्कॅनः जर किडनीत कोणतीही समस्या, किडनीचे आकार आणि अडथळे असेल तर, तपासण्या.
- बायोप्सी: मायक्रोस्कोपखाली किडनीच्या टिश्युचे नमुने गोळा केले जातात आणि तपासले जातात.
ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचे उपचार, रोगाची तीव्रता आणि लक्षणे यावर अवलंबून असतात. सौम्य प्रकरणात, कोणतेही उपचार आवश्यक नाहीत.
काही उपचार पद्धती खलील प्रमाणे आहेत:
- आहारातील बदल: रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी भरपूर प्रमाणात मीठ आणि पोटॅशियम आणि द्रव पदार्थ असलेले अन्न आणि पेय टाळणे.
- धूम्रपान सोडणे: धूम्रपान टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस होऊ शकतो आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
- औषधे, ज्यामध्ये हे असू शकते:
- रक्त दाब कमी करणारे एजंट जसे की एंजियोटेंसीन रिसेप्टर ब्लॉकर्स (एआरबी-ARB), एंजियोटेंसीन-कन्वर्टिंग एंझाइम (एसीई-ACE) इनहिबिटर, डायरेक्टिक्स आणि इतर.
- सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती दडपण्यासाठी, कॉर्टिकोस्टिरॉईड्स (प्रेडनीसन) यांचा सल्ला देण्यात येतो.
- प्रतिरक्षा प्रणालीमध्ये समस्या असल्यास, इम्यूनोसप्रेशंट्स जसे टेक्रोलिमस, सायक्लोस्पोरिन, अजिथीओप्राइन, रित्युसिमाब किंवा मायकोफेनॉलेट मोफेटिल निर्धारित केले जाऊ शकते.
- सायक्लोफॉसफामाइड कमी डोसमध्ये देखील इम्यूनोसप्रेशंट्स म्हणून वापरली जाऊ शकते.
- व्हायरल इन्फेक्शन असलेल्या लोकांमध्ये अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
- ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असलेल्या व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी सामान्यतः जास्त असल्याने कोलेस्टेरॉल-कमी करणाऱ्या औषधांचा सल्ला देण्यात येते.
- गंभीर प्रकरणांमध्ये प्लाझ्मा एक्सचेंज केले जाऊ शकते.