गॅस्ट्रोसिसिस म्हणजे काय?
गॅस्ट्रोसिसिस पोटाच्या स्नायूंमधील जन्मजात विकार आहे, ज्यामध्ये बाळाची आतडे छिद्रातून बाहेर येतात, जे मुख्यतः पोटाच्या उजव्या बाजूला असते. गरोदरपणात बाळाच्या पोटाबाहेर असलेल्या आतड्यांना इम्यून प्रक्रियेच्या रासायनिक प्रक्रियेने अमनिओटिक द्रव्यामुळे नुकसान पोहोचते. पोटातील स्नायूंची चुकीची वाढ परिणामी आतडे कक होतात व गुंतागुंत होते.
गॅस्ट्रोसिसिस ची मुख्य चिन्हे व लक्षणे काय आहेत?
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- पोटामधून अंबिलिकल कॉर्ड सोबत आतडे एका छिद्रातून बाहेर येतात.
- आतडे एकमेकांमध्ये गुंतून अडकलेली असतात.
- काहीवेळेस इतर अवयव जसे पित्ताशय, मोठे आतडे, किंवा यकृत हे सुद्धा छोट्या अातड्यासोबत असतात.
- पीळ पडलेल्या लहान आतड्यांना पुरेसे पोषण न मिळाल्याने वेळेपूर्वी जन्म आणि अपर्याप्त वाढ सामान्य आहे.
- जन्मानंतर बाळाला खाऊ घालणे कठीण होते.
गॅस्ट्रोसिसिसची मुख्य कारणे काय आहेत?
गॅस्ट्रोसिसिसचे कोणतेही निश्चित कारण नाही आहे. पण काही धोक्याचे घटक खालीलप्रमाणे आहेत:-
- आईचे वय 20 पेक्षा कमी असणे.
- गरोदरपणात धूम्रपान.
- गरोदरपणात दारू चे सेवन.
- गरोदरपणात पोषणाची कमतरता.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
गॅस्ट्रोसिसिसचे निदान करण्यासाठी जन्माच्या आधी वेगवेगळ्या चाचण्या व तपासण्या केल्या जातात.
- रक्त तपासणी:- आईच्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा फेटॉप्रोटीन आढळल्यास गॅस्ट्रोसिसिसचे निदान होते.
- इतर अभ्यास:- अल्ट्रसाऊंड गरोदरपणाच्या 10-14 आठवड्यात व ॲनोमली स्कॅन च्या 18-21 आठवड्यात गॅस्ट्रोसिसिसचे निदान करतो
ओमफॅलोसेल हा गॅस्ट्रोसिसिस प्रमाणे जन्माला येताना झालेला विकार आहे. ज्यामध्ये बाळाची आतडे अंबिलिकल कॉर्ड च्या छिद्रातून बाहेर येतात, जे मुख्यतः पोटाच्या मधल्या बाजूला असते. ओमफॅलोसेलमध्ये अंबिलिकल कॉर्ड भोवती एक सुरक्षित कवच तयार होते जे गॅस्ट्रोसिसिसमध्ये आढळून येत नाही.
गॅस्ट्रोसिसिस च्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो. सुरुवातीला बाहेर असलेली आतडे पुढील धोके टाळण्यासाठी एका सुरक्षित कवचाने जोडली जातात.
गॅस्ट्रोसिसिस च्या उपचारामध्ये 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात:-
- बाहेर आलेली आतडी पोटाच्या आत बसवली जाते व पोट बंद केले जाते.
- बाहेर काढलेली आतडी पोटाच्या आत बसवली जाते.