लहान मुलांमध्ये तापाचा दौरा काय आहे?
तापाचा दौरा ज्याला फेब्रिएल सेझर्स असेही म्हणतात, यात अति तापासह मुलांना झटके येतात. वयाचे 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे दौरे सामान्यतः आलेले आढळतात. 12 ते 18 महिने वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मुलांमध्ये तापाचा दौरा संबंधित सामान्य लक्षणे खालील प्रमाणे समाविष्ट असू शकतात:
- शुद्ध हरपणे.
- हात आणि / किंवा पायांचे अनियंत्रित थरथरणे.
क्वचित आढळणाऱ्या सामान्य लक्षणांमध्ये समाविष्ट असू शकतात:
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- कठोर किंवा ताठ अंग.
- तोंडाला फेस येणे.
- हात किंवा पायचा केवळ एक किंवा एक भाग आखडणे.
- त्वचेचा रंग निस्तेज किंवा निळसर होतो.
- डोळे फिरवणे.
- कण्हणे.
- मुलाला शुद्ध येण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागू शकतात. या दरम्यान, ते चिडचिडे होऊ शकतात आणि परिचितांना देखील ओळखू शकत नाहीत असे दिसते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
तापाचा दौरा अनुवांशिक आणि पर्यावरणाच्या घटकांमुळे होऊ शकतो.
सामान्य कारक घटकांमध्ये हे समाविष्ट असू शकते:
- कोणत्याही कारणाने ताप येणे.
- कोणत्याही आजार ज्यात लहान मुलाचा पटकन ताप वाढू शकतो.
- वरील श्वसनमार्गात व्हायरल संसर्ग.
- कानातील संसर्ग.
- न्यूमोनिया.
- बॅक्टेरियल डायरिया.
- रक्तप्रवाहात संक्रमण (सेप्सिस).
- मेंदू आणि मज्जारज्जू यांना जोडणाऱ्या मस्तिष्कावरणा (मेनिंग्ज) चे संक्रमण, ज्यास मेनिन्जायटिस देखील म्हणतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
हा विकार समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी तापाचे कारण निश्चित करणे महत्वाचे आहे.
वैद्यकीय इतिहासामध्ये मिरगी चा कौटुंबिक इतिहासाचे दस्तऐवज, अलीकडील अँटीबायोटिकचा वापर, सेझर्सचा कालावधी, झटक्यानंतरचा कालावधी, लसीकरण स्थिती आणि लक्षणे यांचा समावेश आहे.
डॉक्टर तुमच्या मुलाच्या शुद्धीचे मूल्यांकन करतील आणि केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या संसर्गाची कोणत्याही चिन्हे तपासतील.
आवश्यक तपासणी समाविष्ट असू शकते:
- लंबर पेंचर.
- इलेक्ट्रोएन्सेफल्गोग्राफी (ईईजी).
- न्यूरोइमेजिंग (सीटी आणि एमआरआय स्कॅन).
- पूर्ण रक्त गणना.
मुलांमध्ये तापाचा दौरा संसर्ग झाल्यास उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- झटके आलेल्या मुलाला शांत करण्यासाठी औषधे. ते फक्त डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेतले गेले पाहिजे.
- अँटि-पायरेटिक एजंट्सचा अचूक वापर, तरी ड्रग थेरपीवर अधिक अवलंबून राहणे चांगले नाही.
या रुग्णांचे व्यवस्थापन आणि काळजी यात समाविष्ट आहेः
- मुलाला जास्त ताप वाढणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अति जास्त कपडे घालू नये, भरपूर द्रवपदार्थ द्यावेत आणि थंड पाण्याने अंघोळ घालणे टाळावे.
- मुलाच्या आसपासचे क्षेत्र सुरक्षित असावे. झटक्यादरम्यान, मुलाला तीक्ष्ण वस्तू किंवा मुलास जखमी होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. मुलाच्या आसपासच्या संभाव्य नुकसानाच्या कोणत्याही वस्तू दूर ठेवावे.
- झटक्यादरम्यान, मुलाला एका बाजूला ठेवले पाहिजे.
- कुणीतरी नेहमी मुलाच्या सभोवती राहणे योग्य आहे.
- झटके येऊन गेल्यानंतर मुलाला सभोवतालचे वातावरण शांत ठेवणे उपयुक्त ठरते.
- झटक्या दरम्यान मुलाला धरून ठेवण्याचा किंवा मुलाच्या तोंडात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करू नका.