श्वसनाचा त्रास म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या शरीराच्या गरजेसाठी ऑक्सिजन आत घेण्यास त्रास होतो किंवा अस्वस्थ होते, तेव्हा त्या व्यक्तीस श्वसनाचा त्रास आहे किंवा दम लागतो असे म्हणतात. नाक भरले असल्यामुळे ते सौम्य असू शकते किंवा निमोनिया सारख्या कारणामुळे गंभीर ही असू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
श्वसनाच्या त्रासाची घाबरवणारी कारणं पुढील प्रमाणे आहेत:
- आडवे झोपल्यावर श्वसनाचा त्रास होणे किंवा 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ श्वास घेता न येणे किंवा इन्हेलर्सचा वापर करूनही आधीपासून असलेली लक्षणं बिघडत जाणे.
- श्वासोच्छ्वास करताना आवाज येणे (घरघर).
- खूप थंडी वाजून खोकला होणे आणि खूप ताप येणे.
- ओठ आणि बोटं निळे पडणे (ब्लूईश डीसकलरेशन).
- श्वासोच्छ्वास करताना खूप जोराचा आवाज होणे, ज्याला स्ट्रिडॉर असे म्हणतात.
- चक्कर येणे.
- पावलं आणि घोट्यावर सूज येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
श्वसनाचा त्रास मुख्यतः खालील कारणांमुळे होतो:
- चिंता आणि एकदम घाबरून जाणे.
- ट्रॅकिया आणि ब्रॉंकाय सोबत वायुमार्गाच्या काही भागात समस्या येणे.
- ॲलर्जी.
- शारीरिक तंदुरुस्ती कमी असणे.
- फुफ्फुसांचे विकार जसे न्यूमोनिया, दमा इ.
- ज्या व्यक्तींचे हृदय पुरेसे रक्त पंप करून ऑक्सिजन पुरवू शकत नाही त्यांना हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे अशा समस्या येतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरवातीला, तुमचे डॉक्टर तुमची सखोल मेडिकल हिस्टरी आणि इतर लक्षणं याबद्दल माहिती घेतील. त्यानंतर शारीरिक चाचणी केली जाईल. तुमचा इतिहास, वय आणि शारीरिक चाचण्यांच्या निदानावर आधारित खालील अतिरिक्त चाचण्या सांगितल्या जाऊ शकतात:
- रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी रक्तच्या चाचण्या.
- ॲलर्जीच्या चाचण्या.
- छातीचा एक्स-रे.
- घश्याचा नमुना (आपल्या घश्याच्या मागील बाजूचा एक नमुना घेतला जातो आणि संसर्गासाठी त्याची तपासणी होते).
- बॉडी प्लेथिसमोग्राफी.
- डिफ्यूजन चाचणी.
- पल्मनरी फंक्शन चाचण्या.
मूलभूत कारणाचा उपचार करणे महत्वाचे आहे. यात अँटीबायोटिक्स,डाययुरेटीक्स,अँटी-इंफ्लेमेटरी औषधे, स्टेरॉईड्स,इत्यादींचा समावेश आहे.
श्वसनाचा त्रासाच्या उपचारांमध्ये खालील गोष्टींचा सुद्धा समावेश आहे:
-
पर्स्ड-लीप श्वासोच्छवास
या तंत्रात, व्यक्तीला तोंडातून किंवा नाकातून श्वास घेण्यास सांगितले जाते, असे करताना ओठ शिटी वाजविताना असतात तसे ठेवले जातात (पर्सिंग द लिप्स), त्यानंतर फुफ्फुसातील सर्व हवा बाहेर काढण्यासाठी श्वास बाहेर सोडला जातो.
-
पोझिशनिंग
हे तंत्र सामान्यत: दम लागतो तेव्हा वापरले जाते, कारण स्नायू शिथिल असताना श्वास घेणे सोपे होते. पायऱ्या चढताना ते सामान्यतः वापरले जाते. या तंत्रात खालील गोष्टी केल्या जातातः
भिंतीला टेकून विश्रांती घेतल्यानंतर, आपण आपल्या हात आपल्या मांड्यांवर ठेवावे आणि समोरच्या बाजूला वाकावे, ज्यामुळे आपल्या छातीला आणि खांद्याला आराम मिळतो.अशा प्रकारे, जेव्हा ते मुक्त होतात तेव्हा आपल्याला श्वास घेण्यास मदत होते.यानंतर पर्स्ड-लीप श्वासोच्छवास केला जाऊ शकतो.
-
जलद गतीने श्वासोच्छवास
चालतांना किंवा जड वस्तू उचलतांना हे तंत्र वापरले जाते, कारण यामुळे दम लागणे थांबते किंवा कमी होते.
- चालतांना: स्थिर उभे राहून श्वास आत घ्यावा, आणि काही पावले चालून, श्वास सोडावा. थोडावेळ विश्रांती घेऊन परत असे करावे.
- सामान उचलताना: काही सामान उचलत असताना त्याने/तिने ती वस्तू शरीराच्या जवळ पकडून चालावे, ज्यामुळे श्रम कमी लागतात आणि सामान उचलण्या आधी,त्याने/तिने दीर्घ श्वास घ्यावा.
- डिसेन्सीटायझेशन
या तंत्रामुळे आपणास न घाबरता श्वास घेता येतो. यामध्ये :
पोजिशनिंग, पर्स्ड-लीप श्वासोच्छवास आणि पेस्ड श्वासोच्छवास चा नियमित सराव केला पाहिजे ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आजूबाजूच्या लोकांना आपल्या विकाराबद्दल माहिती दिली जावी.