मधुमेह - Diabetes in Marathi

Dr Vivek SinghBAMS,MD

October 03, 2018

October 09, 2021

मधुमेह
मधुमेह

सारांश

मधुमेह शरीरातील  अन्तःर्गतस्रावांच्या विस्कळितपणामुळे उद्भवणारा सामान्य आजार आहे, जो कुठल्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना प्रभावित करतो. वैद्यकीय परिभाषेत मधुमेहाला “डायबिटीस मेलिटस” असे म्हणतात.  रक्त प्रवाहातील अति रक्तग्लूकोझच्या पातळीवरून याचे निदान केले जाते. मधुमेहाची विभागणी मुख्यतः  प्रकार 1 आणि प्रकार 2 अशी केली गेलीआहे.  इतर विभागण्या किशोरवयीन, गर्भधारणेसंबंधी व प्रीडायबिटीस (पूर्व-मधुमेह) अश्या केल्या जातात. संशोधक मधुमेहाच्या समूळ उच्चटनासाठीप्रयत्न करीत आहेत कारण वेळीच आळा न घातल्यास मधुमेहासोबतच इतरही गंभीर  गुंतागुंती निर्माण होतात आणि परिस्थिती नीट हाताळली नाही,तर अन्य अवयवांचे आजार उदा. आंधळेपणा, हृदयरोग, आणि अंगच्छेद इत्यादी होण्याची शक्यता असते. तरीही,असे लक्षात आले आहे कि जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, व्यायाम, आणि काही उपचार पद्धतींच्या मदतीने लोकांनी या आजाराला सुरुवातीच्या टप्प्यातच अटकाव करून मधुमेहाचे यशस्वीपणे नियोजन केले आहे.

मधमेह प्रकार - Types of Diabetes in Marathi

मधुमेहाचे विविध प्रकार आहेत, परंतु सुरुवातीला आम्ही दोन मुख्य प्रकारांची माहिती देतो, प्रकार १ मधुमेह  आणि प्रकार २ मधुमेह.

  • प्रीडायबिटीस (पूर्वमधुमेह)
    हा प्रथमदर्शनी प्रकार आहे, आणि साधारणपणें "बॉर्डरलाइन मधुमेह" म्हणूनही संबोधले जाते. डॉक्टर याचे निदान, जेवण झाल्यानंतर आणि उपवास केल्यानंतर दोन्ही स्थितींमध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासून करतात. जर सामान्यांपेक्षा शर्करा अति जास्त असेल तर मधुमेह आहे,असे सांगतात. जसे मधुमेहाशी निगडित आहार घेतल्याने, कार्बोदकांचे, प्रक्रिया केलेल्या साखरेचे, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे, बेकरी पदार्थांचे कमी सेवन केल्याने, तसेच  निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास, तसेच शारीरिक उपक्रम उदा. पोहणे, धावणे, जिमला जाणे, सायकल चालविणे आणि या व्यायामांची सुरुवातकरण्यापूर्वी ४५ मिनिटे गतीने चालणे यासारख्या उपाययोजना अवलंबल्यास संशोधन ठामपणे सांगते की पूर्वमधुमेहाचे निदान प्रकार २ मधुमेहाची सुरुवात होणे टाळू शकतो .
  • प्रकार 1
    प्रकार 1 मधुमेह इन्सुलिन आश्रित मधुमेह आहे जो अल्पवयीन मुलांमध्ये आणि ३० च्या आतील तरुणांमध्ये आढळतो आणि मधुमेहाच्या जागतिक जनगणनेत १० टक्के जनता याने प्रभावितआहे.  स्वादुपिंडातील क्षतिग्रस्त बीटा पेशींमुळे अंशतः किंवा पूर्णपणे इन्सुलिन तयार करण्याच्या शारीरिक अक्षमतेमुळे मुख्यतःही स्थिती उद्भवते. यामुळे शर्करा साठवून राहू शकत नाही आणि ऊर्जेच्या रूपात त्याचा वापरही होत नाही, ज्यामुळे रक्ताच्या प्रवाहात अतिप्रमाणात शर्करा जमा होते.

    प्रकार 1 मधुमहाचे आणखी दोन उपप्रकार आहेत. :
    • किशोरवयीन मधुमेह : प्रकार 1 मधुमेहात ज्युव्हेनाईल मधुमेह येतो जो इन्सुलिन आश्रित असून (जी आयुष्यभराची स्थिती आहे). 19 वर्षे वयाच्या आतील मुलांमध्ये आढळून येतो. लहान मुलांना इन्सुलिनच्या लसी मोठ्यांच्या आणि परिचारिकेच्या देखरेखीखाली दिल्या जातात. पौगंडावस्थेतील मधुमेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्वतःही लस टोचून घेऊ शकतात.
    • एलएडीए
      प्रकार 1 अशा लोकांना पण समाविष्ट करतो जे प्रकार 2 चे मधुमेही आहेत परंतु प्रकार १ च्या मधुमेह्यांप्रमाणे त्यांचे स्वादुपिंडातील बीटा पेशी -ज्यांना एलएडीए  (लॅटेन्ट ऑटोइम्यून डायबिटिक अडल्टहूड) म्हणूनही संबोधतात-आंशिक किंवा पूर्णतःइन्सुलिनचे स्रवण करीत नाही.
  • प्रकार 2
    संशोधन सांगते कि प्रकार 2 सर्वात अधिक आणि प्राबल्याने आढळतो. हि परिस्थिती तेव्हा येते जेव्हा शरीर आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार  करू शकत नाही किंवा इन्सुलिन संवेदनशीलतेमुळे शरीर  इन्सुलिनचा वापर करणे बंद करते. या बिघाडामुळे शरीरात अति प्रमाणात शर्करा जमा होते जी रक्ताच्या शर्करेत रूपांतरित होते. प्रकार 2 मधुमेह हा 30 वर्षेवयाच्या वरील लोकांना होण्याची शक्यता जास्ती आहे, परंतु महत्वाचे संशोधन सांगते कि लहान वयाच्यामुलांना देखील तो  होऊ शकतो. प्रकार 2 हा अनेकदा आनुवंशिक असतो आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला तो दिला जातो. जागतिक स्तरावरील वाढत्या प्रकार 2 च्या आजाराला लोक जीवनशैली, शून्य किंवा कमी शारीरिक हालचाली, तणाव आणि चुकीच्या खाद्यसंकृतीमुळे बळी पडतात आणि ह्याच सवयी सुरुवातीला करणीभूतही असतात.
  • गर्भधारणेसंबंधी मधुमेह
    नावावरूनच कळते कि हा प्रकार गर्भधारणेच्या वेळी होतो. गर्भधारणेच्या नंतरच्या स्तरांवर हा आईमध्ये विकसित होतो जिथे रक्तात सामान्यतेच्या  वरच्या पातळीवर शर्करेचे प्रमाण आढळते. असे लक्ष्यात आले आहे कि संतती होताच ही स्थती राहत नाही. असे असले तरी गर्भधारणेतील मधुमेह इतका सामान्य नाही. गर्भधारणेत मधुमेह जर वेळेवर ओळखता आणि बरा नाही करता आला तर आईसाठी आणि बाळासाठी गुंतागुंतीचे ठरू शकते. तुम्हाला महत्वाचा सल्ला असा आहे कि तुम्ही स्वतःहून कुठलेही औषध घेऊ नका आणि आवश्यक क्रिया आणि काळजी घेण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Madhurodh Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for diabetes with good results.
Sugar Tablet
₹899  ₹999  10% OFF
BUY NOW

मधुमेह लक्षणे - Symptoms of Diabetes in Marathi

तुम्ही जर शारीरिक संकेतांप्रती सजग असल्यास, मधुमेहाची लक्षणे चटकन लक्षात येण्यासारखी आहेत. आणि चांगली बाब म्हणजे, लक्षणे सुरवतीलाच  लक्षात आल्यास, त्यावर निर्णायक उपचार करता येतात आणि नियोजनही करता येते. म्हणून जर तुम्ही खालील चिन्हे अनुभवत असाल तर लगेच तुमच्या डॉक्टरांला कळवा.

  • अचानक भुकेने तळमळणें (खायची तीव्र  इच्छा )
  • गरजेपेक्षा जास्तीवेळा लघवीला जायची गरज भासणे खासकरून रात्रीच्या वेळी
  • सतत तहानलेले असणे
  • अचानक अस्पष्ट कारणाने  वजनातील घट.
  • दिसण्यातली अस्पष्टता आणि विकृती
  • सहजपणे थकल्यासारखे जाणवणे
  • परत परत होणारे संसर्ग, खास करून हिरड्यांना, कातडीला, आणि मूत्राशयाला
  • जखमांना आणि कापलेल्याला नेहमीपेक्षा जास्ती वेळ दुरुस्तीला लागत असल्यास
  • चिडचिडेपणा आणि अस्थिर मन
  • तळहात किंवा पायालागुदगुदीच्या किंवा जळजळीच्या संवेदना
  • पुरुषांना लैंगिक अडचणी अनुभवाला येतात

डॉक्टराला कधी भेट द्यावी

 रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असल्यास आणि खालील लक्षणे दिसत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

  • रक्ताचे अहवाल सतत रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण दाखवत असल्यास
  • अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांना आलेले अंधत्व किंवा नजरेतील अस्पष्टता
  • तुम्ही नेहमी लावत असलेल्या मलमांनी जर जखमा ५ दिवसात बऱ्या ना होता आणखी चिघळत असल्यास
  • गर्भधारणेच्या वेळी वाढलेले साखरेचे प्रमाण
  • तळहात किंवा तळपायांची अचानक हरवलेली संवेदना
  • अचानक भुजा, जबडा, छाती, आणि पायांना आकस्मिकपणे सूज येणे व दुखणे
  • कातडीचे तीव्र संसर्ग ज्यात कातडीचा रंग मलीन होतो

मधुमेह कारणे - Causes of Diabetes and Risk Factors in Marathi

मधुमेह कारणे

टाइप 1 मधुमेहाची कारणे :- टाइप 1 मधुमेह होण्याचे नेमका कारण अज्ञात आहे. जी माहिती आहे ते म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक प्रणाली - जे सहसा हानीकारक जीवाणू किंवा व्हायरस ला लढा देतात - स्वादुपिंडमध्ये आपल्या इनसुलिन-निर्मिती पेशींवर हल्ला करते आणि नष्ट करते. हे आपल्याला थोडे किंवा शून्य इन्सुलिन अवस्था आणते . आपल्या पेशींमध्ये जाण्या ऐवजी, साखर आपल्या रक्तप्रवाहात तयार होते

टाइप 1 हे आनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या मिश्रणामुळे होते असे म्हटले जाते, तरीही यापैकी बर्याच गोष्टी अद्याप अस्पष्ट आहेत.

प्री डायबेटिस कारण आणि प्रकार 2 मधुमेह

टाइप 2 मधुमेह मध्ये, तुमचे पेशी इन्सुलिन च्या क्रिये ला  प्रतिरोधी बनतात , आणि आपल्या स्वादुपिंड या प्रतिकार दूर करण्यासाठी पुरेसा इंसुलिन तयार करण्यास अक्षम होतात. जेथे तुमच्या ऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या पेशींमध्ये जाण्याऐवजी, साखर आपल्या रक्तात साचून राहते.

नक्कीच असे का घडते ते अनिश्चित आहे, जरी असा समजला जातो की प्रकारच्या 2 मधुमेहाच्या विकासात अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक भूमिका बजावतात. जादा वजनाच्या स्थितीत टाईप 2 मधुमेहाचा होण्या चा धोका वाढतो.

गर्भधारणेचे मधुमेह कारणे

गर्भधारणेदरम्यान गर्भधारणा टिकवण्यासाठी प्लासिनटा हार्मोन तयार करतो. हे हार्मोन्स आपल्या पेशींना इन्सुलिनच्या अधिक प्रतिरोधक बनवतात.

साधारणपणे, आपल्या स्वादुपिंड या प्रतिकार दूर करण्यासाठी पुरेसे अतिरिक्त इंसुलिन तयार करून देतो. पण काहीवेळा आपल्या स्वादुपिंडास हे करता येत नाही. जेव्हा हे घडते तेव्हा खूपच ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये असतो आणि आपल्या रक्तात बरेच राहते, परिणामी गर्भधारणेचे मधुमेह होऊ शकते.

रिस्क फॅक्टर्स 

टाइप 1 मधुमेह होण्याची जोखीम कारणे

जरी टाइप 1 मधुमेह होण्याचे नेमका कारण अज्ञात आहे तरीही वाढीव धोका दर्शविणारी कारणे खालील प्रमाणे आहेत:

  • कौटुंबिक इतिहास पालक किंवा एकही भावंड यांना जर टाइप 1 मधुमेह असल्यास आपल्या जोखीम वाढते.
  • पर्यावरणाचे घटक. व्हायरल आजारामुळे होणारा धोका हा प्रकार 1 मधुमेह मध्ये काही भूमिका बजावू शकतो.
  • हानीकारक रोगप्रतिकारक प्रणाली पेशी (ऑटोएन्टीबॉडीज) ची उपस्थिती
  • आहार घटक यामध्ये कमी प्रमाणात व्हिटॅमिन डीचा वापर होणे , गाईच्या दुधास लवकर बाळांना देण्यास सुरु करणे.

टाइप 2 मधुमेह होण्याची जोखीम कारणे

हे स्पष्ट आहे की विशिष्ट घटकांसह टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो:

  • वजन. तुमच्यात जितके अधिक फॅट टिश्यू आहेत तितके जास्त प्रतिरोधक आपल्या पेशी इनसुलिनला होतात.
  • जर आपण निष्क्रिय आहात, आपल्याला जोखीम जास्त. शारीरिक क्रिया आपल्याला आपले वजन नियंत्रित करण्यात मदत करते, ग्लुकोजला ऊर्जा म्हणून वापरते.
  • कौटुंबिक इतिहास पालक किंवा भावंडे यांच्यात टाइप 2 मधुमेह असल्यास आपल्या जोखीम वाढते.
  • वय आपण जसजसे मोठे होतो तसतसे तुमचा जोखीम वाढते.
  • गर्भधारणा गर्भधारणामुळे आपल्याला टाइप 2 मधुमेह होण्याचा त्रास होऊ शकतो.
  • पॉलिस्टिकल ओव्हरी सिंड्रोम, ज्या स्त्रियांना, पीसीओएस चा त्रास आहे त्यांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
  • उच्च रक्तदाब. 140/90 mm hg वर रक्तदाब असणे टाईप 2 मधुमेहाचे वाढीव धोका आहे.
  • असामान्य कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचा स्तर आपण उच्च घनतेच्या लिपोप्रोटीन (एचडीएल), किंवा "चांगले" कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी असल्यास आपल्या टाइप 2 मधुमेहाचा धोका जास्त आहे. ट्रायग्लिसराइड उच्च पातळी असलेले लोक टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

गर्भधारणेचे मधुमेह होण्याची जोखीम कारणे

कोणतीही गर्भवती स्त्री गर्भधारणेच्या मधुमेहाची विकृती होऊ शकते, परंतु काही स्त्रिया इतरांपेक्षा जास्त धोकादायक असतात. गर्भधारणेच्या मधुमेह होण्याची जोखीम कारणे खालील प्रमाणे आहेत:

  • वय 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना वाढीव धोका आहे.
  • वजन. गर्भधारणेच्या आधी अधिक वजन केल्याने आपला धोका वाढतो.

मधुमेह निदान - Diagnosis of Diabetes in Marathi

प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेह आणि prediabetes साठी चाचण्या

  • ग्लायकेटेड हिमोग्लोबिन (ए 1 सी) चाचणी. या रक्ताची चाचणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आपल्या सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवते. दोन वेगवेगळ्या चाचण्यांवरील A1C चे पातळी 6.5% किंवा जास्त असल्याचे सूचित करते की आपल्याला मधुमेह आहे. 5.7 खाली सामान्य मानले जाते

मधुमेह निदान करण्यासाठी खालील चाचण्यांचा वापर केला जाऊ शकतो:

  • यादृच्छिक रक्तातील साखरेची चाचणी. रक्ताचा नमुना यादृच्छिक वेळी घेतले जाईल. आपण कधी हि खाल्ले तरी, रक्तातील रक्तातील साखरेची पातळी 200 मिलिग्रॅम प्रति डेसिलीटर (मिग्रॅ / डीएल) किंवा त्याहून उच्च पातळी मधुमेह आहे .
  • उपाशी पोटी घेतलेले रक्तातील साखर:- एखादा उपाशी पोटी घेतलेली रक्तातील साखरेची पातळी जर 100 मिग्रॅ / डेली पेक्षा कमी असते ते सामान्य आहे. जर ते रक्तशर्कराची पातळी 100 ते 125 मिलीग्राम / डीएल पर्यंत आहे तर ते prediabetes म्हणून ओळखली जाते. दोन वेगवेगळ्या चाचण्यांमधे जर ते 126 एमजी / डीएल किंवा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह आहे.
  • ओरल ग्लुकोज सहिष्णुता चाचणी. या चाचणीसाठी, आपण रात्रभर उपास करतो, आणि उपाशी असताना रक्तातील साखरेची पातळी मोजली जाते. मग आपण एक साखरेचा द्रव पिणे, आणि रक्तातील साखरेची पातळी पुढील दोन तासांसाठी नियमितपणे तपासली जाते. रक्तातील साखरेची पातळी 140 एमजी / डीएल पेक्षा कमी हे सामान्य पातळी आहे. दोन तासांनंतर 200 मिग्रॅ / डेलीपेक्षा अधिक वाचन मधुमेहास सूचित करते.
  • जर मधुमेह संशयित असेल, तर आपल्या लघवीची तपासणी केली जाईल.
Karela Jamun Juice
₹439  ₹549  20% OFF
BUY NOW

मधुमेह उपचार - Diabetes treatment in Marathi

मधुमेहाचे उपचार आव्हानात्मक आणि वेदनांदायक असल्याचा गैरसमज आहे,कारण मधुमेह बराच काळ टिकून राहतो. उलट सत्य असे आहे कि  आपण जर योग्य मार्गाने जायचे निवडले तर आपण स्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो.

  • उपचारांतील अंतर
    मधुमेहाच्या प्रकारावरून उपचार ठरतात आणि ते व्यक्तिशः वेगवेगळे असू शकतात ज्यात प्रकार १, प्रकार 2, गर्भधारणा यांचा विचार समाविष्ट आहे.
  • योग्य दिशेने उपचार मिळावा
    मधुमेह हा दीर्घकालीन वाढत जाणारा आजार आहे त्यामुळे औषधोपचार लवकरात लवकर सुरु करावे. गुंतागुंत वाढू शकते म्हणून औषधोपचारांनी सुरुवात करू नये हे गृहीतक खरे नाही. उलटपक्षी डॉक्टर असे सांगतात कि जेवढ्या लवकर औषधे सुरू केली तितके नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होते आणि मधुमेहाशी संबंधित गुंता कमी करता येतो.
  • औषधे नियमित घेणे.
    याचा अर्थ असा कि औषधे रोज घ्यावीत, योग्य प्रमाणात घ्यावीत, आणि योग्य वेळेवर घेतली जावीत ज्यामुळे मधुमेहाच्या नियोजनात उत्तुंग फायदेमिळवता येतात. औषधे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत नाही घेतली गेलीतत,तर मधुमेहाच्या नियोजनात त्यांचा काडीमात्र उपयोग होत नाही, उलटपक्षी रक्तातील साखरेचे प्रमाण टोकाची पातळी गाठू शकते किंवा हायपोग्लिसमीक (यात साखरेची पातळी आकस्मिकपणे घसरते) घटना होऊ शकतात.
  • आहारातील फेरबदल
    ​कमी साखरेचा, कमी कार्बोदके असलेलाआणि जास्त तंतूमय असलेला आहार दिवसातून सहा वेळा थोड्या थोड्या वेळानी घ्यावा. हे म्हणजे मधुमेहासाठी प्राणवायू एवढेच महत्वाचे आहे.
  • शारीरिक उपक्रम
    बैठी आणि निष्क्रिय जीवनशैली मधुमेहाच्या वाढीला कारणीभूत असल्याचे संशोधन दाखवून देते. त्यामुळे पोहणे, धावणे, सायकल चालवणे, योगासने, आणि जिमला जाणे या उपक्रमांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात खूप मदत झाल्याचे पुरावे आहेत.

प्रकार 1 मधुमेहावरील उपचार

प्रकार 1 च्या स्थितीचे उपचार शिस्तीत करण्याची प्रक्रिया आहे ज्यात रक्तातील ग्लूकोझची पातळी वेगवेगळ्या वेळांना मोजली जाते (आदर्शपणे तक्ता तयार करावा). मिळालेल्या आकड्यांवरून गरजेनुसार इन्सुलिनची लस टोचून घ्यावी. सोबतच नियंत्रित आहार आणि व्यायामाचे नियमन करून ते कसोशीने पाळावे जेणेकरून प्रकार 1 मधुमेह नियोजनबद्ध करता येईल.  अनेकदा प्रकार 1 मधुमेह लहान मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये (ज्याला जुवेनाईल मधुमेह देखील म्हणतात) आढळत असल्यामुळे  पालक, काळजीवाहक, आणि परिचारिकांना डॉक्टर काळजीपूर्वक सांगतात कि त्यांनी "लास कशी टोचावी" हे शिकून घ्यावे आणि कमी वेदनामय पद्धतीने योग्य रीतीने उपचार करावे. मुलांमध्ये लास  टोचणीची जागा कमीत कमी जखम करणारी असावी.

प्रकार 2 मधुमेहावरील उपचार

प्रकार 2 च्या मधुमेह्यांना आहाराच्या बदलांनी, व्यायामाच्या मदतीने आणि पोटातून घेतल्या जाणाऱ्या औषधांनी केले जाणारे उपचार सुचविले जातात. असेही लक्षात आले आहे कि डॉक्टर प्रकार 2 च्या मधुमेह्यांना देखील इन्सुलिनच्या लसीचे सल्ले देतात. म्हणून जर प्रकार 2 चा मधुमेह आधीच समजल्यास आपल्या आहाराच्या सवयीआमूलाग्रपणे बदल करण्यासाठी प्रयत्न करावे, शारीरिक हालचाली जसे धावणे, सायकल चालविणे, आणि पोहणे सुरु करावे आणि ठराविक वेळांतरक्ताच्या तपासण्या कराव्या जेणेकरून मधुमेह वाढतो आहे का ते लक्षात येईल आणि नियंत्रणात आणता येईल.

मधुमेह म्हणजे काय - What is diabetes in Marathi?

रक्ताच्या प्रवाहातील अति वाढलेली साखर असलेल्या सर्व शारीरिक स्थितींसाठी मधुमेह ही सर्वव्यापी संज्ञा आहे. मधुमेह हि झपाट्याने पसरणारी जागतिक आजराची साथ आहे, जिचे एकट्या भारतात 7.3 कोटी रुग्ण आढळले आहेत. वेळेच्या आत नियोजन न केल्यास व उपचार न घेतल्यास या आजाराचे पर्यवसान अशा दीर्घकालीन आजारात होते जो बराच काळ त्याच स्थितीत राहतो. पूर्वीचा समज खोडून काढणारे काही तथ्य असे लक्षात आणून देतात की मधुमेह वाढत्या वयासोबत होणारा आजार नाही तर तो कुठल्याही वयात आणि लिंगाच्या व्यक्तीला होणे संभव आहे. तरीही, काही वैद्यकीय अभ्यास असे दर्शवितात कि चाळिशीच्या वरील वयाच्या लोकांना मधुमेहापासून इतरांपेक्षा अधिक धोका आहे.

मधुमेह प्रतिबंध - Diabetes prevention in Marathi

टाइप 1 मधुमेह टाळता येत नाही. पण, चांगले आरोग्यपूर्ण जीवन हे पर्याय जे मधुमेहास बारा करण्यास करते आणि , प्रकार 2 मधुमेह आणि गर्भधारणेच्या मधुमेहास देखील ते टाळण्यास मदत करतात:

  • चांगले पदार्थ खा. चरबी आणि कॅलरीमधील कमी खाद्यपदार्थ आणि फाइबरमध्ये जास्त असले खाद्य पदार्थ  निवडा. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यावर जास्त लक्ष द्या.
  • अधिक शारीरिक हालचाल करा. दररोज 30 मिनिटे मध्यम शारिरीक क्रियांचे व्यायाम करा रोज जलद गतीने चाला. सायकल चालवा.  पोहणे हे सुद्धा चांगला व्यायाम आहे. जर आपण जास्त वेळ व्यायाम करू शकत नसाल तर संपूर्ण दिवसभरात छोट्या सत्रात तो मोडू शकता.
  • वजन कमी करा. आपला वजन जर जास्त असेल आणि जर आपल्या शरीराची काही वजन कमी केली तर मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. आपले वजन एका निरोगी व्याप्तीत ठेवण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि व्यायाम करण्याच्या सवयी यांच्यावर लक्ष केंद्रित करा. वजन कमी करण्याच्या फायद्यांची आठवण करून स्वतःला प्रोत्साहन द्या,

काहीवेळा औषधे देखील एक पर्याय आहे. आपल्या रक्तातील साखर हे वर्षातून कमीत कमी एकदा तरी तपासणी घ्यावी नक्की करावी कि आपण टाइप 2 मधुमेह विकसित केला नाही.



संदर्भ

  1. National Kidney foundation [Internet]. New York: National Kidney Foundation; Diabetes - A Major Risk Factor for Kidney Disease
  2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Diabetes, Gum Disease, & Other Dental Problems
  3. National Health Service [internet]. UK; What is type 2 diabetes?
  4. Diabetes.co.uk [internet] Diabetes Digital Media Ltd; Causes of Diabetes.
  5. Diabetes.co.uk [internet] Diabetes Digital Media Ltd; Juvenile Diabetes.
  6. National Health Service [Internet]. UK; Overview - Gestational diabetes

मधुमेह साठी औषधे

Medicines listed below are available for मधुमेह. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for मधुमेह

Number of tests are available for मधुमेह. We have listed commonly prescribed tests below: