सर्दी पडसे यांपासुन बचावाचे उपाय
खरेतर शैत्य पडसे पुर्णपणे रोखुन बचाव करणे अशक्य आहे पण काही अशा गोष्टी आहेत कि ज्यांनी आपण व आपल्या कुटुबींयाना हा वायरस च्या संक्रमणापासुन बाधित होण्याच्या शक्यतेला कमी करु शकतात
आपले हात नेहमी स्वच्छ धुवावे हा सर्वात चांगला उपाय आहे सर्दी पडसे होऊ नये म्हणुन विशेषत: कुठल्याही सार्वजनिक ठिकाणांहुन घरी आल्यावर हात जरुर धुवावे
जर आपण लगातार हात धुत असणार तर त्या वायरसला नष्ट करण्यास मदत होते, जो वायरस संक्रमित व्यक्तीद्वारे उपयोग केलेल्या पृष्ठभागातुन संक्रमित झालेला असतो जर आपण कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाणार असाल तर आपल्या सोबत हाताचे सँनिटायजर बाळगा आणि त्याने हात साफ करा त्यामुळे तुम्ही कुठल्याही वायरस च्या संपर्कात जरी आले तरी त्याला मारण्यास मदत होते तसेच आपल्या मुलांना हात धुवण्याचे महत्व सांगा व शिकवा जर तुम्ही कुठे संक्रमित व्यक्तिच्या आसपास आहात किंवा सार्वजनिक ठिकाणी च्या दुषित पृष्ठभागाच्या संपर्कात असाल तर चेहरा विशेषत: नाक तोंड आणि डोळे यांना स्पर्श करु नका अशा करण्याने त्या वायरस ची आपल्या श्वसन संस्थेत प्रवेश करण्याची शक्यता कमी होते
धुम्रपान करु नका, सिगारेट च्या धुरातुन हवा दुषित करुन सर्दी पडसे किंवा अन्य संक्रमणाच्या संवेदनशीलता वाढवु शकतात. जर तुमच्या कुटूंबात कोणी संक्रमित झालेले असेल तर डिस्पोजेबल भांड्याचा वापर करावा डिस्पोजेबल कप अथवा ग्लास प्रत्येक वेळा उपयोग करुन फेकुन दिले जाऊ शकतात अशा करण्याने वायरस च्या आकस्मित प्रसार रोखण्यास मदत होते.
घरातील सर्व पृष्ठभाग स्वच्छ ठेवा दरवाज्याची कडी कोयंडा, ड्रॉअरचा हँडल,कि बोर्ड, इलेक्ट्रीक स्विच, टेलिफोन,रिमोट कंट्रोल,काउंटरटॉप्स,सिंक इत्यादी कोणी संक्रमित व्यक्तिने वापरले असल्यास त्याच्या पृष्ठभाग साबण किंवा जंतुनाशक सोलुशन द्वारे साफ करा
जर तुमच्या मुलाला सर्दी पडसे आहे त्याची खेळणी स्वच्छ धुवून घ्या आणि घरातील नेहमी वापरल्या जाणा-या पृष्ठभाग व त्यावरील वस्तु साफ ठेवा
हात सुकण्यासाठी स्वयंपाकखोलीतील आणि बाथरुम मध्ये पेपर टॉवेल चा वापर करा रोगाणु/जंतु कपड्याच्या टॉवेलवर ब-याच तासापर्यत राहु शकतात त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वेगवेगळा टॉवेल हवा आणि पाहुण्यांसाठी एक वेगळा साफ टॉवेल ठेवावा
उपयोग झाल्यावर टिश्यु पेपर फेकुन द्यावा कारण वापरलेला टिश्यु पेपर ज्या पृष्ठभागावर ठेवणार त्याला तो दुषित करतो आणि वायरस स्त्रोताचे कारण ठरु शकतो
स्वस्थ जीवन शैली ठेवा. स्वस्थ जीवनशैली साठी (पुर्ण शांत झोप,पोषण,व्यायाम) यांनी आपली रोगप्रतिकार शक्ती संक्रमणाविरोधात चांगल्या त-हेने प्रतिकार करु शकते तणाव कमी ठेवा भावनात्मक तणावाखाली असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते असा एक अनुभव आहे.