क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल कोलायटिस म्हणजे काय?
क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल (सी. डिफिसाइल) हे माती, हवा, पाणी आणि शौच यांच्यात सामान्यपणे आढळणारा एक जिवाणू आहे. ह्याच्या संसर्गामुळे इतर समस्यांव्यतिरिक्त मोठ्या आतड्याला सूज येते. हा एक असामान्य संसर्ग आहे आणि साधारणपणे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागते.
याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?
- सी. डिफिसाइल मुळे मोठ्या आतड्यावर परिणाम होतो, त्याला सूज येऊन ताप येतो.
- ओटीपोटात दुखणे किंवा कळ येणे देखील एक लक्षण आहे.
- इतर लक्षणे जसे अतिसार आणि दिवसातून अनेक वेळा पाण्यासारखे शौच होणे. शौचात रक्त दिसणे सामान्य लक्षण आहे.
- अतिसारामुळे निर्जलीकरण आणि शरीरात खनिजांचे असंतुलन होते.
- गंभीर प्रकरणात, मोठे आतडे फुटून शरीराच्या इतर भागात संसर्ग पसरू शकतो, असे होणे जीव घेणे असू शकते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- सी. डिफिसाइल कोलायटिसचे सर्वात कॉमन कारण म्हणजे अलीकडील अँटीबायोटिक्स वापरुन केलेला उपचार. जेव्हा एखादी व्यक्ती अँटीबायोटिक्स घेते तेव्हा आतड्यामध्ये जिवाणूंचे संतुलन विस्कळीत होते ज्यामुळे सी. डिफिसाइल जिवाणूंची संख्या वाढते.
- अमॉक्सिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, पेनिसिलिन आणि एरिथ्रोमायसीन काही अँटीबायोटिक्स आहेत ज्यामुळे कोलायटिस होतो.
- हे आवश्यक नाही की जिवाणू असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोलायटिस होतो. जिवाणू आधी पासूनच आतड्यात असूनही त्यांचे कोणतेही लक्षणे दिसून येत नाही. असे व्यक्ती केवळ जिवाणूंचे वाहक असतात.
- हा एक हॉस्पिटलमध्ये झालेला संसर्ग देखील असू शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान करण्यासाठी, रुग्णाने अलिकडेच घेतलेल्या औषधांसोबत डॉक्टर संपूर्ण इतिहास तपासतात.
- अशा प्रकारच्या संसर्गामध्ये पांढऱ्या पेशींची संख्या वाढते आणि रक्त चाचण्यांमध्ये हे लक्षात येते.
- काही विशिष्ट शौचाच्या चाचण्या करुन त्यात सी. डिफिसाइल द्वारे उत्पादित विषारी पदार्थांचा शोध घेऊन त्याचे निदान करतात.
- कॉलनोस्कोपी आणि सिग्मोइडोस्कोपी ह्या चाचण्यांनी डॉक्टर आतड्याची स्थिती तपासू शकतात.
प्राथमिक उपचार म्हणजे ज्या अँटीबायोटिक्स संसर्ग झाला त्याचा वापर थांबवणे. मेट्रोनिडाझोल सारखे अँटीबायोटिक्स सी. डिफिसाइल च्या संसर्गावर प्रभावी असतात.
- निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन सुधारण्यासाठी फ्लुईड्स दिले जातात.
- जिवाणूचा अपूर्ण निष्कर्ष झाल्याने जर संसर्ग परत झाला तर अँटीबायोटिक्सचा एक स्ट्रॉंग डोज दिला जातो किंवा विविध औषधे निर्धारित केली जातात. शरीरातून जिवाणू पूर्णपणे नष्ट करेल, असे अँटीबायोटिक्स ओळखणे महत्वाचे आहे.