लहान मुलांमधील इन्फ्लुएंझा म्हणजे काय?
इन्फ्लुएंझा किंवा फ्लू हा एक प्रकारचा श्वसनमार्गाचा संसर्ग आहे जो एका व्यक्तीकडून दुसर्याला सहज संसर्गित होतो. मुलांमधील इन्फ्लुएंझाची लक्षणे कधी कधी साध्या सर्दीसारखी किंवा अपचनासारखी वाटू शकतात. इन्फ्लुएंझाचा संसर्ग जलद संसर्गित होत असल्याने आणि त्याची लक्षणे तीव्र होण्याची शक्यता असल्याने ती दिसू लागताच लगेच वैद्यकीय निदान करून घेणे गरजेचे आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
तुमच्या मुलामध्ये पुढील लक्षणं दिसत असतील तर त्याला फ्लू झाला आहे हे नक्की समजा:
- तीव्र ताप – 102 डिग्री पेक्षा जास्त आणि 104 डिग्रीपर्यंत चढत जाणारा ताप.
- हुडहुडी भरणे आणि थंडी वाजून ताप येणे.
- थकवा आणि सुस्ती येणे.
- खोकला आणि घसा सुजणे/दुखणे.
- अंग दुखणे, पोट दुखणे आणि मळमळणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
इन्फ्लुएंझाचा संसर्ग हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे होतो. याच्या 3 प्रकारांपैकी टाईपए आणि टाईपबी च्या साथी वर्षातून एखाद्या वेळी येतात तर टाईप सी ची साथ कधीही आणि कुठेही होऊ शकते. संसर्गित व्यक्ती किंवा संसर्गित व्यक्तीच्या लाळ किंवा कफच्या संपर्कात लहान मुलांचा संपर्क आल्यास हा विषाणू पसरत जातो. संसर्गित व्यक्ती शिंकत किंवा नाक शिंकरत असताना त्या व्यक्तीच्या अतिजवळ असणे हे सुद्धा विषाणू पसरण्याचे एक कारण आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
इन्फ्लुएंझा निदान करण्यास अतिशय सोपा असतो आणि बहुतेक डॉक्टर्स लहान मुलांची सर्वसाधारण तपासणी करून त्याचे निदान करू शकतात. कधी कधी फ्लूची लक्षणे इतर आजारांप्रमाणे वाटू शकतात पण अशा वेळी नाकातील कफचा थोडा भाग घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो.
लहान मुलांमधील फ्लूवरील उपचारांसाठी डॉक्टर्स सामान्यत: खाली दिलेल्या गोष्टी सुचवतात:
- ताप आणि इतर वेदनांवर औषधे दिली जातात
- पोटाची स्थिती सामान्य करण्यासाठी औषधे दिली जातात.
- अस्थम्यासंबंधित आजारांवरदेखील औषधे दिली जातात.
- भरपूर विश्रांति घेणे सक्तीचे केले जाते.
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ पिणे सुचवले जाते.
- नाक चोंदणे, नाक वाहणे आणि खोकला यावरही औषधे दिली जातात.
- फ्लू परत होऊ नये म्हणून लस दिली जाते.
- घरगुती काळजी (नाकात घालण्यासाठी औषध, हयुमिडीफायर).
- संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी जसे लहान मुलांनी शिंकताना; किंवा खोकलतांना नाका-तोंडावर हात ठेवल्यास त्याचे हात वरचेवर धुवत राहणे, त्यांचे नाक आणि तोंड जाडसर कपड्यांनी झाकणे; हात धुवून मगच अन्नाला हात लावणे.
सामान्यत: फ्लूचा संसर्ग परत परत होतो आणि त्यामुळे मुलांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागल्यास मुलांना शाळेत किंवा खेळायला पाठवण्याआधी डॉक्टर्स मुलांवर 24 तास लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात.