ब्रेस्ट एनगॉर्जमेंट काय आहे?
ब्रेस्ट एनगॉर्जमेंट ही बाळाच्या जन्माच्या सुरुवातीच्या काळात उद्भवणारी महिलेसाठी वेदनादायक आणि तणावपूर्ण स्थिती असते. यामध्ये स्तन अधिक प्रमाणात दूध, रक्त आणि द्रवपदार्थांनी भरलेले असतात ज्यामुळे स्तनांवर सूज आणि स्तनाग्र चपटे होतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ब्रेस्ट एनगॉर्जमेंट संबंधित सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत
- सूजलेले, टणक, आणि वेदनादायक स्तन.
- स्तनाग्र चपटे आणि टणक दिसतात.
- स्तनाग्राण्या आसपासचा भाग खूपच कडक होऊ शकतो, यामुळे आपल्या बाळाला दूध पिणे कठीण होते.
- सौम्य ताप.
- बगलेत लिम्फ नोड्सला थोडी सूज आणि कोमलता.
गंभीर प्रकरणांमध्ये असामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
- सूजलेले, कडक, चमकणारे आणि उबदार स्तन, आणि स्पर्श केल्यास थोड्या गुढळ्या आढळतात (अधिक वाचा: स्तन गुठळ्याची कारणे).
- त्रासदायक वेदना.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ब्रेस्ट एनगॉर्जमेंट सामान्यत:प्रसूती नंतर च्या पहिल्या काही दिवसात होते. बाळाच्या दुधाची गरज भागवण्यासाठी ही शरीराची यंत्रणा आहे.
इतर कारणे खालील प्रमाणे आहे
- अयोग्य आणि अपुरे स्तनपान.
- स्तन शस्त्रक्रियेचा इतिहास.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
ब्रेस्ट एनगॉर्जमेंट ची लक्षणे निदानामध्ये मदतगार ठरतात. या स्थितीचा उपचार करण्यासाठी स्तनपान तंत्राचा इतिहास देखील आवश्यक आहे. हे खालील विकारांपासून विभक्त केले पाहिजेः
- हार्मोनल विकारांमुळे होणारी ब्रेस्ट एनगॉर्जमेंट.
- स्तनदाह.
- जिगॅन्टोमास्टिया ज्यामध्ये स्तनपानाच्या द्विपक्षीय, मोठ्या, सौम्य वाढीचा समावेश आहे.
आपल्या डॉक्टरांनी योग्य स्तनपान करणारी मार्गदर्शक तत्त्वे सांगणे ब्रेस्ट एनगॉर्जमेंट च्या उपचारासाठी आवश्यक आहेत. वेदना आणि सूज दूर करण्यासाठी ॲनेलेजिक्सचा उपयोग केला जातो. विशिष्ट हार्मोनल विकारांची वाढ रोखण्यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असेल.
स्वत: काळजी घेण्यासाठी काही टिप्स:
- वेदना आणि सूज दूर करण्यासाठी थंड शेक, बर्फ वापरणे.
- आरामदायी आणि सईल नर्सिंग ब्रा घालणे.
- स्तनाग्रच्या वरच्या बाजूने आणि उभ्या स्थितीत बाळाला पाजावे ह्यामुळे ब्रेस्ट एनगॉर्जमेंट संबंधित त्रास कमी होतो.
- फीड नंतर जास्तीचे दूध हाताने काढून घ्या. गंभीर प्रकरणांमध्ये, आपण ब्रेस्ट पंप देखील वापरू शकता.