सारांश
अपेंडिक्स हासिकमला (सिकम) चिटकलेला एक सडपातळ नळी-सदृश्य अवयव आहे. सिकम मोठ्या आतड्यांचा एक भाग आहे. तो पोटाच्या (छाती आणि ओटीपोटाच्या मधला भाग) खालच्या-उजव्या भागात असतो. मानवी शरीरात अपेंडिक्स काय कार्य करते हे अजूनही माहिती नसले तरी प्राण्यांमध्ये त्याचा उपयोग पचनासाठी होतो. अपेन्डीसायटीस आणीबाणीची अशी स्थिती आहे ज्यात अपेंडिक्सला दाह होतो आणि पोटाच्या उजव्या-खालच्या भागात तीव्र वेदना होतात. याव्यतिरिक्त अपेन्डीसायटीस झालेले लोक उलटी, ताप, आणि पाठीच्या खालच्या भागातील वेदना अशी इतरही लक्षणे अनुभवतात. निदानाच्या निष्कर्षाप्रत पोचायला डॉक्टर चिन्हे आणि लक्षणांना शोधतात, वैद्यकीय चाचण्या करवून घेतात, किंवा गरज पडल्यास अल्ट्रासाउंड, प्रयोगशाळेतील चाचण्या किंवा सिटी स्कॅन करायचा देखील सल्ला देतात. अपेन्डीक्टोमी किंवा अपेन्डायसेक्टोमी शल्यक्रीयेच्या त्या पद्धती आहे ज्यात पोटाच्या खालील भागाला चिरा देऊन अपेंडिक्स काढला जातो. काही केसेसमधे, प्रतिजैविके उपचार पद्धतीदेखील वापरल्या जाते. जेव्हा अपेंडिक्सची बारीक नळी अन्न किंवा शौचाने बंद होते, तेव्हा ती फुटून, व त्यात असलेले जंतू पसरून, भोवतालच्या उदरातील पेशींमध्ये संक्रमण होते. अशा प्रकरणांत हे संक्रमण वेळेच्या आत नियंत्रणात आणने आवश्यक आहे.