अँजिओग्राफी - Angiography in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 26, 2018

March 06, 2020

अँजिओग्राफी
अँजिओग्राफी

अँजिओग्राफी म्हणजे काय?

अँजिओग्राफी हे एक एक्स-रे तंत्र आहे ज्यामध्ये डायचा वापर होतो. हा डाय हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांत इन्जेक्ट केला जातो. रक्तवाहिन्या  सामान्य क्ष-किरणांमधे दिसत नाही. म्हणून म्हणून हृदयातून आणि पर्यंत चा रक्तस्त्राव आणि धमन्यांमधील कोणताही अडथळा तपासण्यासाठी विशेष डायचा वापर केला जातो .अँजिओग्राफीदरम्यान रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या डायच्या हालचालीला अँजिओग्राम म्हटले जाते आणि टेलिव्हिजन मॉनिटरवर हे पाहिले जाऊ शकते

अँजिओग्राफी का केली जाते?

एखाद्या अवयवातील रक्त प्रवाह तपासण्यासाठी अँजीओग्राफी केली जाते. रक्त वाहिन्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांच्यातील रक्त प्रवाह तपासायला त्यांचा वापर केला जातो. रक्त वाहिन्यांशी संबंधित विविध विकारांचे निदान करण्यात ते उपयोगी ठरते. एथेरोस्क्लेरॉसिस, परिधीय धमनी रोग, मेंदूचा एन्युरीझम, अंजाइना, रक्तात क्लॉट बनणे आणि पल्मनरी एंबोलिझम यासारख्या रक्तवाहिनीशी संबंधित रोगांचा उपचार करण्यासाठी देखील हे केले जाते. बरेचदा, हा हृदयाच्या आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांना ओळखण्यासाठी वापरला जातो

अँजिओग्राफी ची गरज केव्हा भासते?

अशा अनेक परिस्थिती आहेत जिथे अँजिओग्राफी आवश्यक आहे ते, त्या खाली नमूद केल्या आहेत

  • अंजायना बाधित व्यक्ती - विनाकारण छातीत वेदना किंवा तणाव जाणवतो, जो खांदा, हात, मान, जबड्यापर्यंत पसरते.
  • हृदयविकाराचा झटका आलेले लोक - एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद होऊन थांबल्यास, परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी अँजिओग्राफी केली जाऊ शकते
  • इलेक्ट्रोकार्डियोग्रामचे परिणाम, व्यायामामुळे होणाऱ्या ताणाची चाचणी किंवा इतर चाचण्या केल्याने हृदयरोगाची तपासणी केली जाते.
  • एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास, तातडीने कोरोनरी अँजिओग्राफी केली जाते.

अँजिओग्राफी कशी केली जाते?

अँजिओग्राफी ही सामान्यतः सुरक्षित प्रक्रिया आहे. ही सहसा हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात केली जाते. यास 30 मिनिटे ते 2 तास लागू शकतात. रुग्ण त्याच दिवशी रुग्णालयातून घरी जाऊ शकतो. रूग्ण उपचारादरम्यान जागा राहू शकतो, पण आराम मिळावा म्हणून झोपेची औषधे दिली जातात. कधीकधी, झोप यावी म्हणून सामान्य ॲनस्थेशिया देखील दिला जातो. रुग्णांना टेबलवर बसण्याची परवानगी असते. मांडीचा सांधा आणि मनगट जवळ असलेले क्षेत्र स्वच्छ करून त्याला स्थानिक ॲनस्थेटीकने  बधीर केले जाते. धमनीमध्ये एक लहान नळी घातली जाते जी कॅथेटर म्हणून ओळखली जाते. तज्ञ काळजीपूर्वक या नलिकेला परिक्षण करण्यात येणाऱ्या अवयवाकडे हलवतात. कॅथीटरची पोझिशन तपासण्यासाठी एक्स-रे घेतला जातो. कॅथेटरमध्ये डाय टाकून इंजेक्शन दिले जाते आणि रक्तवाहिन्यांमधून डाय असलेल्या रक्तासहित एक्स रे घेतला जातो. याने रक्तपेशीतील कोणत्याही प्रकारचा अडथळा उठून दिसतो.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Overview - Angiography
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Coronary angiography
  3. Texas Heart Institute. Angiography. Bertner Avenue Houston, Texas. [internet]
  4. Diagnostic Imaging Pathways. Information for Consumers - Angiography (Angiogram). Western Australia. [internet]
  5. American Association of Neurological Surgeons. [Internet] United States; Angiography of the spinal cord
  6. University of Michigan Health System. Coronary Artery Disease: Should I Have an Angiogram?. Michigan. [internet]

अँजिओग्राफी साठी औषधे

Medicines listed below are available for अँजिओग्राफी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.