झीरोफथाल्मिया - Xerophthalmia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 11, 2019

March 06, 2020

झीरोफथाल्मिया
झीरोफथाल्मिया

झीरोफथाल्मिया काय आहे?

झीरोफथाल्मिया, ड्राय आय सिंड्रोम म्हणूनही ओळखला जातो. ही एक अशी स्थिती आहे जी सामान्यतः व्हिटॅमिन ए/A ची प्रारंभिक कमतरता दर्शवते. मात्र, हे समजणे आवश्यक आहे की व्हिटॅमिन ए/A ची कमतरता असलेल्या प्रत्येकात झीरोफथाल्मियाची लक्षणे दिसणार नाहीत. काही रोग, औषधे आणि काही इतर घटक देखील झीरोफथाल्मियाला कारणीभूत होऊ शकतात. झीरोफथाल्मियामध्ये, पारपटल, जी डोळ्याची सर्वात बाह्य पातळी आहे, ती कोरडी आणि खवल्यांसारखी होते. प्रभावित डोळा अधिक संसर्ग प्रवण होण्याची शक्यता असते. ही समस्या सर्व वयोगटातील व्यक्तींना येऊ शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

खाली दिलेले चिन्हे आणि लक्षणे झीरोफथाल्मिया संबंधित असू शकतात:

याची मुख्य कारणं काय आहेत?

झीरोफथाल्मियाच्या दोन व्हिटॅमिन ए/A-संबंधित कारणांमध्ये पुढील समाविष्ट आहेत:

  • आहारात व्हिटॅमिन ए/A च्या कमी प्रमाणामुळे झीरोफथाल्मिया होतो, हा साधारणपणे विकसनशील देशांत दिसून येतो.
  • झीरोफथाल्मिया हा आहारातील व्हिटॅमिन ए/A च्या सेवनशी संबंधित नसला तरी व्हिटॅमिन ए/A अयोग्यरित्या घेणे आणि त्याच्या संग्रहामुळे होतो.

झीरोफथाल्मियाची इतर कारणं खालीलप्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर खालील प्रकारे निदान करतात:

  • व्यक्तीचा तपशीलवार वैद्यकीय इतिहास.
  • डोळ्याचे परीक्षण.
  • व्हिटॅमिन ए/A ची कमतरता तपासण्यासाठी रक्त तपासणी.

झीरोफथाल्मियाचा उपचार करण्यासाठी डॉक्टर खालील गोष्टींची शिफारस करु शकतातः

  • शरीरातील व्हिटॅमिन ए/A च्या पातळीला सामान्य करण्यासाठी व्हिटॅमिन ए/A पूरक.
  • डोळा कोरडा पडण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी आय ड्रॉप्स.
  • लूब्रिकंट म्हणून कृत्रिम अश्रू.
  • उबदार संप्रेरक.
  • पापण्यांना मसाज.

खालील स्टेप्स झीरोफथाल्मियाचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करतात:

  • आहारात  व्हिटॅमिन ए/A ची मात्रा वाढवणे.
  • भरपूर व्हिटॅमिन ए/A युक्त अन्न तयार करणे.
  • व्हिटॅमिन ए/A असलेले आहार पूरक.

 



संदर्भ

  1. Feroze KB, Kaufman EJ. Xerophthalmia. [Updated 2019 Jan 13]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  2. National Health Portal [Internet] India; Xerophthalmia
  3. American Academy of Ophthalmology [internet] California, United States; Vitamin A Deficiency - Asia Pacific.
  4. American Academy of Ophthalmology [internet] California, United States; Dry Eye Diagnosis and Treatment.
  5. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Xerophthalmia and night blindness for the assessment of clinical vitamin A deficiency in individuals and populations.