व्हर्टिगो म्हणजे काय?
व्हर्टिगो म्हणजे तोल जाणे, विचित्र वागणे आणि भोवळ येण्याची ची संवेदना निर्माण होणे. हालचालींच्या संवेदनांवर परिणाम झाल्यावर चक्कर येतात. चक्कर येणें हे तोल सांभाळणाऱ्या, अंतस्थ संवेदना किंवा दृष्टी कार्याच्या संवेदनशीलतेवर परिणाम करणाऱ्या आंतरिक विकृती किंवा अंतर्गत गंभीर आजाराशी संबंधित असते. चक्कर आलेल्या व्यक्ती गोंधळलेपणा आणि आभासी स्पिनिंग संवेदना अनुभवतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हर्टिगोशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कानात गुणगुण आवाज येणे.
- ऐकू न येणे.
- भोवळ येत असताना मळमळ.
- श्वसन प्रक्रियेत आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल होणे.
- घाम येणे.
- चालता न येणे.
- सावधगिरीत बदल होणे.
- डोळ्यांच्या असामान्य हालचाली.
- दुहेरी दृश्य दिसणे.
- चेहेऱ्याचा पक्षाघात.
- बोलतांना अडथळा येणे.
- हात व पायांत अशक्तपणा.
याची मुख्य कारणं काय आहेत?
व्हर्टिगोचे कारण पुढीलपैकी कोणतीही परिस्थिती असू शकते:
- मधुमेह मिलिटस.
- अथेरोस्क्लेरॉसिस.
- अर्धशिशी.
- न्यूरॉलॉजिकल विकृती.
- अँटिहिस्टमाईन्स सारख्या काही औषधांचे अतिसेवन.
- डोक्यावर इजा.
- स्ट्रोक.
- लॅबेरिंथिटीस (कानाच्या आतील भागात सूज येणे).
- कानाच्या आतील बाजूस छिद्र.
- कर्करोगरहित गाठी.
- सीझर्स .
- मेनिअर्स आजार.
- रक्तवाहिन्यांचा आजार.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
डॉक्टर डोक्याची कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सी टी) स्कॅन आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय), इलेक्ट्रोनिस्टागमोग्राफी (डोळ्यांच्या हालचाली मोजणे), रक्त चाचणी आणि मेंदूच्या विद्युत कृतींच्या मोजणीसाठी इलेक्ट्रोएंसिफालोग्रॅम (इइजी) या चाचण्या करतात. तसेच डॉक्टर मधुमेह, हृदयरोग व चक्कर येण्यास कारणीभूत असलेल्या इतर विकृतीच्या तपासणीसाठी रुग्णाचा वैद्यकीय इतिहासही तपासतात.
चक्कर येण्याचे अचूक कारण निश्चित केल्यांनतर उपचार केला जातो. व्हर्टिगोवर पुढील काही सामान्य उपचार केले जातात:
- चिंता विरोधी औषधे
- स्नायूंना आराम देणे
- चाल स्थिर करण्यासाठी व्यायाम (चालण्याची पद्धत)
- अभ्यस्तता व्यायाम
- संवेदनशीलतेच्या व्यवस्थेसाठी प्रशिक्षण
- तोल व्यवस्थित सांभाळण्यासाठी स्थिर आणि गतिशील तोलासंबंधित व्यायाम
- कॅनलिथ रेपोझिशनिंग उपचार (सीआरटी) - हा उपचार अगदी सामान्यपणे चक्कर येण्याच्या स्थितीत केला जातो. (अचानक झटका येणे)
- ॲरोबिक कंडिशनिंग - या प्रक्रियेद्वारे सतत होणाऱ्या तालबद्ध हालचालींमधून स्नायू व अवयवांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होईल या हेतूने फुप्फुस व हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणे.