व्हिनस अल्सर म्हणजे काय?
व्हिनस अल्सर वरवरच्या किंवा खोल रक्तवाहिन्यांतील उघडे फोड असतात, हे सामान्यत: खालच्या भागात होतात. जेव्हा शिरा हृदयात रक्त परत न पाठवता त्याच्यात रक्त साठवते तेव्हा व्हिनस अल्सर होते. उपचार न केल्यास प्रभावित भागात दबाव वाढतो आणि आणि द्रव जमा होते आणि फोड होतो. ही जखम जखम हळुवार बरी होते आणि सामान्यपणे घोट्यांच्या वरच्या भागात होते.
याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्हिनस अल्सरचे सर्वात सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
- खाजवणारी पातळ त्वचा आणि त्याचा रंग बदलणे जसे गडद लाल, जांभळा, तपकिरी.
- त्वचा कडक होणे.
- ताप येणे किंवा थंडी वाजणे.
- पायाला सूज येणे.
- पाय दुखणे, जड होणे आणि क्रॅम्प येणे.
- मुंग्या येणे.
- अल्सर होणे.
- हा आकार नसलेला उथळ फोड असतो; लाल जखमेवर पिवळे ऊतक असतात; रंग नसलेली, चमकदार घट्ट त्वचा असते आणि स्पर्श केल्यावर गरम किंवा थंड लागू शकते. संसर्गित फोडांना दुर्गंध येतो आणि त्यातून पस किंवा रक्त बाहेर येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
व्हिनस अल्सरच्या कारणांमधे पुढील समाविष्ट आहेत:
- शिरांमधील वाल्व कमकुवत होणे.
- खालच्या बाजूच्या नसांवर वाढलेला दबाव.
- जखम आणि अवरोधित झालेल्या नसा.
- व्हिनस अपुरेपणा निर्माण करणारी परिस्थिती.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जखमेची आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर सीईएपीवर (क्लिनिकल, एटिओलॉजी, ॲनाटॉमी आणि पॅथोफिजियोलॉजी) आधारित क्लिनिकल सिव्हियरीटी स्कोर काढला जातो जे क्रोनिक व्हिनस डिसऑर्डरचे मूल्यांकन करण्यात मदत करते.
व्हिनस अल्सर चे उपचिर मुख्यतः जखमेची काळजी घेऊन केले जातात , ज्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
- जखम स्वच्छ करा आणि त्याला पट्टीने झाकून ठेवा (संसर्ग टाळण्यासाठी), जे डॉक्टरांनी दिलेले निर्देशाप्रमाणे बदलले पाहिजे.
- ड्रेसिंग करण्यापूर्वी जखम स्वच्छ करा आणि ड्रेसिंग आणि आसपासची त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवा.
- ड्रेसिंग पट्ट्यांने किंवा स्टॉकिंग्सने झाकून ठेवा.
- पायातील नसा उच्च दाब मुक्त करा, जे रक्त जमा न होणे, सूज आणि वेदना कमी करणे आणि उपचारांना प्रोत्साहन देणे यासाठी आवश्यक आहे.
- शक्य असल्यास हृदयाच्या पातळीवर आपले पाय ठेवा (उशीवर पाय ठेवून झोपा).
- शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यासाठी शारीरिक हालचाल वाढवा.
- डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार घ्या.
उपचार न करता येण्यासारख्या अल्सरसाठी, नसांमधील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी काही प्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.