टेस्टोस्टेरॉनची कमतरता काय आहे?

टेस्टोस्टेरॉनची कमतरता हा वयोवृद्ध पुरुषांमध्ये सामान्यत: आढळणारा एक विकार आहे. टेस्टोस्टेरॉनची निर्मिती प्रभावित झाल्यामुळे त्याची कमतरता येते. तरुण पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची कमतरता कदाचित इतर कॉम्प्लिकेशन मुळे होऊ शकते, कारण तो यौवनाच्या प्रक्रियेत आणि शरीराच्या रुपांतर प्रक्रियेत आवश्यक घटक आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

या अवस्थेतील चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळ्या वयोगटानुसार भिन्न असतात. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • अविकसित पुरुष जननेंद्रिय.
  • चेहेऱ्यावर अपुरा लव आणि स्नायूंचा विकास.
  • तारुण्यानंतर खुंटलेली वाढ.

प्रौढांमध्ये, स्वभावात लहरीपणा दीर्घकाळ टिकणारी कमी कामेच्छा आणि लैंगिक कार्यप्रणालीमध्ये अडचण दिसून येतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टेस्टोस्टेरॉनची निर्मिती नियंत्रण टेस्टीज आणि मेंदूवर अवलंबून असते कारण मेंदू हार्मोन्सची निर्मिती नियंत्रित करतो. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेचे सर्वात नैसर्गिक कारण वृद्धत्व आहे. या विकार उद्भवण्याची इतर कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • पिट्यूटरी, हायपोथालेमस किंवा टेस्टीजचा अनुवांशिक विकार.
  • औषधांची सवय.
  • टेस्टीजला कोणताही आघात किंवा नुकसान.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कामेच्छा कमी आणि स्वभावात लहरीपणा आल्यास, डॉक्टर रक्ताचे नमुने घेऊन केलेल्या टेस्टोस्टेरॉन चाचणीचा सल्ला देऊ शकतात. आलेल्या वाचनांची पुष्टी करण्यासाठी या चाचणीची एक किंवा दोन दिवसांत पुनरावृत्ती केली जाते. या विकारासाठी उपचार उपलब्ध आहे, पण, हा पूर्णतः उपचारात्मक नाही आणि औषधोपचाराचा नियमितपणे घ्यावा लागतो. टेस्टोस्टेरॉन प्रतिस्थापन थेरेपी त्याचा स्तर सामान्य पातळीवर परत आणण्यासाठी वापरली जाते. उणीव हाताळण्यासाठी एक टेस्टोस्टेरॉन जेल किंवा इंजेक्शन निर्धारित केले जाऊ शकते.

तरुणांमध्ये, टेस्टोस्टेरॉन थेरपी या आजाराचे निराकरण करू शकते. मात्र, वृद्धांमध्ये ते पूर्णपणे समाधानकारक परिणाम देऊ शकत नाहीत.

टेस्टोस्टेरॉनची कमतरता ही कोणत्याही प्रौढ व्यक्तीसाठी एक आव्हानात्मक स्थिती आहे कारण ती पुरुषांमधील टेस्टीक्युलर वाढीस प्रभावित करते.

 

Dr. Narayanan N K

Endocrinology
16 Years of Experience

Dr. Tanmay Bharani

Endocrinology
15 Years of Experience

Dr. Sunil Kumar Mishra

Endocrinology
23 Years of Experience

Dr. Parjeet Kaur

Endocrinology
19 Years of Experience

Medicines listed below are available for टेस्टोस्टेरॉनची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
myUpchar Ayurveda Urjas T-Boost Capsule60 Capsule in 1 Bottle399.0
Nirvasa Ashwagandha Capsule60 Capsule in 1 Bottle369.0
Herbal Canada Virya Postic Granules 100GM100 gm Granules in 1 Jar368.05
DNSI Pro Fertil O Plus Capsule60 Capsule in 1 Bottle1090.0
DNSI Pro Shila Capsule30 Capsule in 1 Bottle713.0
Shilajit ultra gold capsule + Max man tila (free)1 kit Capsule in 1 Combo Pack1970.0
Aayuheal Night Man Gel50 gm Gel in 1 Jar599.0
Herbelo Organics MenS Health Wellness Megabooster+ Ayurvedic Formula Capsules (60)60 Capsule in 1 Bottle599.0
Nutracology Tongkat Ali Tablet60 Tablet in 1 Bottle899.0
Nutracology Viromex Performance Booster Capsule (30)30 Capsule in 1 Bottle399.0
Read more...
Read on app