आत्महत्या करण्याची प्रवृत्ती म्हणजे काय?
आत्महत्या म्हणजे स्वतःचे जीवन संपवणे. आत्महत्येचे विचार किंवा कल्पना या मनोवृत्तीला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती म्हणतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्त्येबाबत आपण काही सांगू शकत नसलो तरी काही सूचक चिन्हे जी आपल्याला त्या व्यक्तीत दिसू शकतात :
- एखादी व्यक्ती स्वत: सगळ्यांपासून लांब राहते आणि दैनंदिन कामकाजात असंतोष व्यक्त करते.
- एखाद्याला एकटे, असहाय्य वाटू शकते आणि त्याला आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण सापडत नाही.
- वारंवार होणारे वागण्यातील बदल देखील लक्षात घेण्यासारखे चिन्ह आहे.
- एखादी व्यक्ती मृत्यूविषयी वारंवार बोलते आणि त्यासाठी तयार होऊ शकते किंवा त्याची योजना आखू शकते.
- आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीला ड्रग्स, अल्कोहोल किंवा अन्य व्यसन असू शकतात आणि ती त्या प्रभावाखाली असू शकते.
- आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्यतः अपराधी, असहाय्य आणि नालायकपणाची भावना असल्याचे लक्षात येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कोणालाही स्वतःचे जीवन संपवण्यासाठी कोणतेही एकमात्र कारण असू शकत नाही. मात्र, इशाऱ्याच्या चिन्हांसारखेच, काही धोकादायक घटक देखील आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला असे विचार येऊ शकतात.
- मोठा तोटा, शारीरिक दुखापत किंवा आघात हे आत्महत्येचे कारणं असू शकतात.
- आर्थिक समस्या, व्यावसायिक समाधानाची कमतरता किंवा कामाशी संबंधित समस्या एखाद्या व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त करू शकतात.
- एखादी व्यक्ती शारिरीक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असल्यास किंवा दीर्घकाळापासून एखाद्या आजाराशी झुंजत असल्यास आत्महत्या करावीशी वाटू शकते.
- कौटुंबिक विवाद, कौटुंबिक समस्या किंवा प्रिय व्यक्तीशी झालेले भांडण यामुळे एखाद्या व्यक्तीला असहाय्य आणि आत्महत्या करावीशी वाटू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एखाद्याच्या वर्तनावर, इतिहास आणि वृत्तीवर आधारित, तज्ञ आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीचे निदान करू शकतात. ते तुमच्या वैयक्तिक जीवनाचा, आरोग्याच्या समस्या, औषधांचा इतिहास आणि इतर कोणत्याही संबंधित माहितीचा तपशीलवार इतिहास घेतात.
- आत्महत्या करण्याची प्रवृत्तीचा उपचार करणे म्हणजे विचारांना कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचा उपचार करणे.
- हे विविध प्रकारच्या थेरपीद्वारे केले जाऊ शकते आणि कधीकधी औषधे देखील आवश्यक असू शकतात.
- मनोचिकित्सा आणि संज्ञानात्मक वर्तनात्मक थेरपी हे थेरपीचे प्रकार आहेत जे मदत करू शकतात.
- अंतर्भूत शारीरिक आजाराची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.
- जर आवश्यक असेल तर अँटी-डिप्रेसंटस/ प्रतिरोधक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात.
- एखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणे, व्यसनापासून दूर राहणे आणि छंद जोपासणे, मित्रांसह आणि कुटुंबासह वेळ घालवणे यासारख्या गोष्टी केल्याने असे विचार दूर होऊ शकतात.