ताणलेले स्वरतंतू म्हणजे काय?
स्वरतंतू हे मानवी स्वरयंत्रात असलेल्या कंठातील पोकळीत (लॅरेन्क्स)असणारे दोन स्नायूचे टिश्यू बँड आहेत. ज्यावेळी एखादी व्यक्ती बोलते तेव्हा या स्वरतंतू ताणले जातात. एखादी व्यक्ती ओरडते, किंचाळते किंवा हार्ड नोट्स गाते तेव्हा स्वरतंतूवर ताण येतो. घरगुती उपाय आणि मौन धारण करणे (आवाजाला विश्रांती) यामुळे लवकर रोगमुक्तता मिळते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
विकृत स्वरतंतूना वैद्यकीय भाषेत लॅरीन्जायटिस असे म्हटले जाते. यामुळे सामान्यतः व्यक्तीच्या आवाजावर प्रभाव पाडतो, आणि आवाज घोगरा होतो. आवाज कमी आणि कर्कश येत असल्यामुळे व्यक्तीला संवाद साधण्यात अडचण येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, विकृत स्वरतंतूना वेदना होतात. काही दिवस आवाज पूर्णपणे जाऊ शकतो. याबरोबरच गिळायला त्रास होणे आणि कानाला त्रास होणे या अडचणी देखील येऊ शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सतत गायन, निरंतर व्याख्याने किंवा चिडून ओरडून बोलणे या सामान्य कारणांमुळे स्वरतंतू विकृत होऊ शकतात. तीव्र स्प्रे सारखे काही तीव्र गंध हुंगल्या गेल्यामुळे देखील स्वरतंतू प्रभावित होतात. स्वरतंतूंवर नोड्यूल किंवा पॉलीप्स (बिगर कॅन्सर टिश्यूची वाढ) असल्यास तीव्र लॅरीन्जायटिस होतो. इतर कारणांमध्ये पार्किन्सन रोग, बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन, ॲलर्जी आणि स्ट्रोक यांचा समावेश आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
ताणलेले स्वरतंतू या रोगाच्या निदानाला पुष्टी देण्यासाठी संपूर्ण शारीरिक तपासणी आणि तपशीलवार इतिहास घेतला जातो. लॅरिन्गोस्कोप, एक लहान आरसा जो घश्याच्या मागच्या भागाचे कल्पनाचित्र उभे करतो, या चाचणीसाठी वापरला जाऊ शकतो.
हा विकार बऱ्याचदा गंभीर नसतो आणि मौन धारण केल्याने (आवाजाला विश्रांती) बऱ्याचदा ताण दूर करायला मदत होते. अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स, अँटीबायोटिक्स आणि क्वचितच स्टेरॉईड्ससारखी औषधे वापरली जातात. कोमट पाण्याच्या गुळण्या सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शीतपेये आणि अल्कोहोल नेहमी टाळावेत. चघळण्याच्या गोळ्या घशाची अस्वस्थता दूर करण्यात मदत करतात. मधामुळे घश्याचे दुखणे कमी होण्यास मदत होते. कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण प्यायल्याने स्वरतंतूभोवती जमलेला कफ निघून जाण्यास मदत होते.