घोरणे म्हणजे काय?
घोरणे म्हणजे झोपेत हवेच्या हालचालीत अडथळे निर्माण झाल्यामुळे होणारा आवाज. घसा आणि नाक किंवा फ्लॉपी मध्ये जास्त टिश्यू असल्यास कंपन निर्माण होतात ज्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आवाज येतो, ज्याला घोरणे म्हणतात.
याची मुख्य चिन्हें अणि लक्षणे काय आहेत ?
घोरण्यामुळे अपुरी झोप, दिवसभर सुस्त राहणे, एकाग्रता कमी होणे आणि काम करण्याची इच्छा कमी होणे इ. परिणाम होतात. यामुळे मानसिक विकार होऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
घोरणे खूप सामान्य आहे आणि सहसा कोणत्याही गंभीर कारणांमुळे होत नाही. आपण झोपतो तेव्हा आपले जीभ,तोंड, वायुमार्ग आणि फुफ्फुसे शिथिल होऊन अरुंद होतात. श्वास घेतांना हे अवयव कंपित होतात अणि परिणामस्वरूप घोरण्याचा आवाज येतो. घोरण्याची काही सामान्य कारणे पुढील प्रमाणे आहेत:
- अॅलर्जी किंवा साइनसचा संसर्ग.
- नाकाची विकृती जसे नाकाचे सेप्टम विकृत असणे किंवा नाकातील पॉलीपमुळे होणारा अडथळा.
- लठ्ठपणा.
- जाड जीभ.
- गर्भधारणा.
- अनुवांशिक घटक.
- दारू आणि धूम्रपान.
- वाढलेले टॉन्सिल्स आणि एडेनॉइड्स.
- काही औषधे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर घोरण्याचे कारण शोधायला नाक आणि तोंड तपासतात. तुमच्या घोरण्याचे वर्णन तुमचे पति किंवा पत्नी सर्वोत्कृष्ट रित्या करु शकतील. जर घोरण्याचे कारण स्पष्ट नसेल तर डॉक्टर तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगू शकतात. तुम्हाला इन होम स्लीप टेस्ट किंवा गंभीर प्रकरणांमध्ये लॅबमधे झोपवून टेस्ट करण्यास सांगितले जाऊ शकते.
स्लीप स्टडी मध्ये शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर सेन्सर जोडले असतात जे मेंदू, हृदयाचा ठोका आणि आपल्या श्वासोच्छ्वासाचे सिग्नल रेकॉर्ड करतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया चे निदान सामान्यतः घरी झोपून केलेल्या टेस्टच्या मदतीने केले जाते. याला पोलिसॉम्नोग्राफी म्हणतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया सोडले तर बाकी झोपेच्या विकारांचे निदान लॅबमधे झोपवून केलेल्या अभ्यासाच्या माध्यमाने निदान केले जातात.
जर या चाचण्या नैदानिक नसतील तर स्लीप एक्स-रे, सीटी आणि एमआरआय स्कॅन ह्या इतर चाचण्या करण्यास सांगितले जाऊ शकते.
घोरणे पूर्णपणे बंद केले जाऊ शकत नसले तरी काही अडथळे मोकळे करून श्वासोच्छवासाची अस्वस्थता कमी केली जाऊ शकते.
धूम्रपान बंद करणे आणि झोपण्यापूर्वी सिडेटिव्ह्स किंवा मद्यपान टाळणे असे काही जीवनशैलीत बदल केले तर घोरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. नाकचा स्प्रे, नोज स्ट्रिप किंवा क्लीप्स, मौखिक उपकरणे, विशेष ल्युब्रिकंट स्प्रे आणि घोरण्याला प्रतिबन्ध घालणाऱ्या उश्या आणि कपडे इत्यादींचा वापर घोरण्याचे प्रमाण कमी करण्यात मदत करतात. सुधारणेसाठी डॉक्टर खालील सल्ले देऊ शकतात:
- कन्टिन्युअस पॉसिटिव्ह एयर वे प्रेशर(सीपीएपी).
- लेझर वापरुन केलेली युव्हुलोपालाटोप्लास्टी(एलएयूपी).
- टाळूचे इम्प्लांट्स.
- सोम्नोप्लास्टी- अतिरिक्त ऊती काढून टाकण्यासाठी लो लेव्हलरेडिओफ्रीक्वेंसीचा वापर.
- वैयक्तिकृत दातांचे उपकरणे किंवा खालच्या जबड्याचे -पोझिशनर्स.
- युव्हुलोपालाटोफॅरंगोप्लास्टी (यूपीपीपी), थर्मल अब्लेशन पॅलेटोप्लास्टी (टीएपी), टॉनसिलेक्टोमी आणि एडेनॉइडेक्टोमी सारख्या शस्त्रक्रिया.
पाठीवर झोपण्यापेक्षा एक कुशीवर झोपून, डोके थोडे उंचावर ठेऊन झोपून आणि घोरणे प्रतिबंधित करणारे तोंडाचे उपकरण वापरुन घोरणे टाळू शकता.