मानसिक आघात म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात हादरून टाकणारी, घाबरवणारी किंवा धक्का देणारी घटना घडते तेव्हा तिला मानसिक आघात होतो. मानसिक आघात झालेली व्यक्ती फ्लॅशबॅक, समजू न शकणाऱ्या भावना आणि नात्यात तणाव सारख्या प्रतिक्रिया अनुभवू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केली आहेत:
- स्मृतीभ्रंश
- सहजपणे दचकणे.
- खूप सावध राहणे आणि आशंकित धोक्याची चिन्हे शोधत राहणे.
- पॅनिक अटॅक.
- झोपण्यात अडचण.
- भाविनिरित्या निस्तव्ध वाटणे.
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
- राग.
- नैराश्य
- अविश्वास.
- गोंधळणे.
- खूप घाबरवणाऱ्या आठवणी.
- चिडचिड.
- रात्री झोपेत भयावह स्वप्न दिसणे.
- मुडस्वींग्स.
- लैंगिक अक्षमता.
- नकारात्मक मानसिक स्थिती.
- हाताळण्याची क्षमता बदलणे.
- घटनेचे द्रुश्य दिसणे.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
याचे मुख्य कारणं खालील प्रमाणे आहेत:
- नैसर्गिक आपत्ती.
- घरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार.
- दहशतवाद.
- आघातदायक घटना किंवा म्रुत्यु अनुभवणे.
- कारावास.
- गंभीर इजा किंवा आजार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मानसोपचारतज्ञ शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहासाची तपासणी करून रुग्णातील लक्षणांची नोंद करतात.
खालील उपचार मानसिक आघातावर केले जाऊ शकतात:
- कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग: या थेरपीने लोकांना वाईट आठवणी स्वीकारणे आणि विसरणे शक्य होते. आणि लाज आणि अपराधीपणाच्यख भावतेतून सुटकारा मगळतो.
- सायकोथेरपी: याला टॉक थेरपी पण म्हणतात. यात 6 ते 12 आठवड्यांपर्यंत किंवा जास्ण अनेक सेशन्स घेतले जातात. हे सेशन्स मानसोपचार तज्ञाच्या उपस्थितीत होतात. मित्र आणि कुटुंबियांचे समर्थन आणि या थेरपीच्या मदतीने विश्वास, आत्मविश्वास आणि भावना पुनर्स्थापित होतात.
- एक्सपोजर थेरपी: या थेरपीमुळे भय आणि चिंता नियंत्रित होतात. लिहिणे आणि कल्पना हे साधनं या उपचारात वापरले जातात.
- औषधोपचार:
- राग, चिंता, दुःख आणि भावनिक निस्तब्धता नियंत्रित करायला अँटी डिप्रेसंट्ंस दिले जातात.
- अँटी- एंग्झाइटी औषधे/ चिंता अवरोधक औषधे.
- विश्रांतीचे तंत्र: श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान व योग साधना आणि व्यायामाचा दैनंदिन नियम पाळणे यासारख्या तंत्रांनी मानसिक आराम मिळतो आणि मानसिक आघात झालेली व्यक्ती शांत होते.