मिठाची कमतरता काय आहे?
मीठ नैसर्गिकरित्या खाद्यपदार्थांमध्ये आढळते, स्वयंपाकात मीठ वापरले जाते. मीठ किंवा सोडियम क्लोराईड एक आवश्यक पोषक तत्व आहे जे रक्तदाब आणि रक्ताची मात्रा नियंत्रित करण्यात मदत करते. हे शरीरातील द्रवपदार्थांचे नियंत्रण करण्यातही मदत करते. शरीरातील मिठाच्या कमतरतेच्या स्थितीला हाइपोनॅट्रीमिया आणि / किंवा हायपोक्लोरेमिया असे म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मीठाच्या कमतरतेची मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
- उलट्या आणि मळमळणे.
- संभ्रम.
- कमी ऊर्जा पातळी किंवा सुस्ती.
- कोमा.
- अस्वस्थता.
- थकवा.
- चिडचिडेपणा.
- झटके.
- स्नायूंमध्ये कमकुवतपणा, पेटके, मुरडा किंवा लचक.
- खवीसपणा.
- कमी रक्तदाब.
- पायावर आणि चेहऱ्यावर सूज.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मीठाच्या कमतरतेची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
- शरीरात द्रव किंवा पाण्याची उच्च पातळी.
- शरीरातून मीठ किंवा मीठ आणि द्रव दोन्ही गमावणे.
- निष्क्रिय किडनी.
- कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर.
- विशिष्ट हार्मोन्सचे स्तर बदलणे जसे की कमी थायरॉईडची पातळी.
- औषधे (लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ, पेनकिलर्स आणि अँटिडप्रेसंट्स).
- पॉलीडीप्सिया (प्रमाणाबाहेर तहान).
- तीव्र अतिसार आणि उलट्या.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी करून मिठाच्या कमतरतेचे निदान केले जाते. गॅस्ट्रोइंटेस्टिनल, न्यूरोलॉजिक, हृदय, किडनी आणि एंडोक्राइन प्रणालीमध्ये समस्या विशेषतः दिसून येतात. प्रयोगशाळा चाचण्याबरोबरच क्रिएटिनिन लेव्हल टेस्ट, संपूर्ण चयापचयाच्या पॅनेल, मूत्रमार्गात आणि रक्तात सोडियम आणि क्लोरीन ची पातळी तपासायला चाचण्या आणि आवश्यक असल्यास इतर चाचण्या केल्या जातात.
मिठाची कमतरता तिच्या मूलभूत कारणांवर आधारित आहे. मिठांची कमतरता हाताळण्यासाठी वापरल्या गेलेल्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत :
- सोडियम सोल्यूशन तोंडी किंवा नसांमधून (शिराव्दारे) दिले जाते.
- किडनीला शरीरातुन अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करण्यासाठी डायलिसिस.
- शरीरातील मिठाची पातळी राखण्यासाठी औषधे.
- झटके, मळमळ आणि डोकेदुखी यासारख्या मिठांची कमतरतेची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी औषधे.
- आहारात पुरेसे मीठ घेण्याची शिफारसी केली जाते.
- अल्पाविधीतील उपचारांमध्ये कारणे हाताळण्यासाठी औषधे समायोजित करणे आणि पाणी सेवन प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे.