रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे काय?
रेस्पिरेटरी डिप्रेशन, हायपोव्हेन्टिलेशन म्हणूनही ओळखला जातो. हा एक विकार असून जो मंद आणि असुरक्षित श्वासोच्छवासामुळे शरीरात कार्बन डाय ऑक्साईडचा उच्च स्तर आणि कमी प्रमाणात ऑक्सिजनची पातळी यात आढळून येते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या विकाराची चिन्हे आणि लक्षणे तीव्रतेच्या आधारावर भिन्न असतात. सौम्य ते मध्यम स्थितीत, सर्वात सामान्य लक्षणे अशी आहेत:
- श्वासाची कमतरता.
- थकवा किंवा कंटाळा.
- दिवसभर झोपेची भावना.
- हळू आणि उथळ श्वासोच्छवास (जलद श्वास घेणे क्वचितच पाहिले जाते).
- उदासीनता.
कार्बन डाईऑक्साइडच्या प्रमाणात वाढ झाल्यास खालील गंभीर लक्षणे दिसून येतात:
याची मुख्य कारणं काय आहेत?
रेस्पिरेटरी डिप्रेशन मुख्यत्वे या कारणांमुळे होते:
- जास्त वजन किंवा लठ्ठ असणे, ज्यामुळे श्वासोच्छवासासाठी अतिरिक्त प्रयत्न आवश्यक असतात.
- झोपताना वायुमार्ग संकुचित होतो, याला ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप ॲप्निया म्हणून देखील ओळखला जातो.
- छातीच्या भिंतीशी संबंधित काही विकृती,जे योग्यरित्या श्वास घेण्याची क्षमता कमी करते.
- ठराविक क्रोनिक किंवा अक्यूट फुफ्फुसाचे रोग ज्यामुळे वायुमार्ग अवरोधित होतात [उदा. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टीव्ह पल्मनरी डीझीज (सीओपीडी), सिस्टिक फायब्रॉसिस].
- मेंदूच्या इजेमुळे, श्वासोच्छवासासारख्या मूलभूत कार्यांवर नियंत्रण विचलित होणे.
- न्यूरोमस्क्युलर रोगांमुळे श्वासांवर नियंत्रण ठेवणारे कमकुवत स्नायू .
- ओपिऑइड, सिडेटिव्ह्ज, बार्बिट्युरेट्स, बेंझोडियाझेपिन्स किंवा सेंट्रल नर्व्हस सिस्टम डिस्पेंटंट ड्रग्सचा मोठ्या डोसज सारखी काही औषधे.
- अति मद्यपान.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर संपूर्ण शारीरिक तपासणीनंतर लक्षणांचा संपूर्ण इतिहास विचारतात; यानंतर कारण ठरविण्यासाठी खालील चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो:
- रक्त तपासणी
- रक्तप्रवाहात ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी पल्स ऑक्सीमेट्री टेस्ट.
- रक्तातील ऑक्सिजन-वाहक पेशींची पातळी तपासण्यासाठी हेमाटोक्रिट आणि हेमोग्लोबिन एस्टिमेशन.
- रक्तातील ॲसिड / बेस संतुलनसह कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ब्लड गॅस टेस्ट.
- विकार वगळण्यासाठी चेस्ट एक्स-रे.
- फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी.
- निद्रा-संबंधित विकार(स्लीप ॲप्निया) वगळण्यासाठी झोपेचा अभ्यास.
रेस्पिरेटरी डिप्रेशनच्या व्यवस्थापनमध्ये हायव्हेन्टिलेशनच्या कारणाचे उपचार करणे समाविष्ट आहे. खाली काही उपचार नमूद केले आहेत:
- जास्त वजन किंवा लठ्ठ लोकांसाठी वजन नियंत्रित करणे.
- छातीच्या विकृतीसाठी शस्त्रक्रिया.
- कार्यक्षम श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजन थेरेपी.
- फुफ्फुसाच्या गंभीर रोगाचा उपचार .
- वायुमार्ग मोकळे करण्यासाठी औषधे.
- ट्रिगर्स म्हणून कार्य करणारी औषधे बंद करणे.
- वायुमार्गाची स्थिरता कायम ठेवण्यासाठी कन्टिन्युअस पॉझिटिव्ह एअरवेज प्रेशर (सीपीएपी) किंवा बारलेव्हल पॉझिटिव्ह एअरवेज प्रेशर(बीआयपीएपी) यंत्र.